शापित रात्री. marathi Horror story part-2

www.ghostskk.blogspot.in
काही न बोलता पुजा बेडवर आडवी झाली पन आपल्या बेडरूम मधे सर्वत्र तीची नजर फिरत होती ... तीला जाणवत होतं... ती सावली इथच आहे.. कुठेतरी... आपल्याला पहातेय...


               *****
दुस-या दिवशी सुमित ला खुप त्रास झाला होता...डोक इतक दुखत होत की दोन वेळा तर चक्क त्यान भिंतीवर आदळल... डॉक्टरांच्या औषधाचाही काही फरक पडला नव्हता.. डॉक्टर देसाई नी मुंबई ला पाठवलेले सुमित चे टेस्ट रिपोर्ट आले होते... पन सर्व काही सामान्य होत.. पुजा बाहेर सोफ्यावर शांत बसुन होती. पण तीच्या डोळ्यातील आश्रु काही केल्या थांबत नव्हते..
" पुजा.." नंदामावशी समोर उभ्या होत्या... त्यांना पहाताच दोन्ही हातानी डोळे स्वच्छ करत पुजा म्हणाली..
" बोला ना मावशी..."
" काही दिवसापासुन खुप वाईट गोष्टी घडत आहेत.  " मावशींचे शब्द ऐकताच पुजा निराश , हताश पने शुन्यात पाहु लागली...
" मावशी मला ही आता काहीच सुचेनास झालय.. "
"माझ्या जवळ एक उपाय आहे... "
मावशीचे बोलने ऐकताच पुजाच्या निराशेन भरलेल्या चेह-यावर एक प्रकारच तेज झळकल...
"कसला उपाय.."
पिठाने माखलेले हात वॉशबेसिन वर स्वच्छ करत मावशीने आपल्या नऊवारी लुगड्यात कमरेला खवलेली कसलीशी पुरचुंडी काढत पुजाच्या हातात दिली...
"हे काय मावशी..." पुजान आश्चर्यान विचारले
तश्या विनंती स्वरात त्या म्हणाल़्या
" आता कोणताच प्रश्न करू करू नको . जितक सांगेल तितकच कर...रात्री सुमित साहेबांच्या उशीखाली ठेव... ते अस का करत आहेत ...? खरच ते आजारी आहेत की बाहेरची बाधा झाली आहे ते समजेल... पन एक गोष्ट लक्षात ठेव... "
बोलता बोलता मावशी थांबल्या आणि पुजा च्या चेह-यावर गंभीर , चिंतेचे भाव दाटले...
"कोणती गोष्ट मावशी..."
" घाबरू नकोस..."
एवढ बोलुन मावशी आपल्या कामाला लागल्या
ती पुडी पुजा आपल्या मुठीत गच्च पकडली.. संजिवनी बुटी मिळावा तसा आनंद तीला झाला होता... सांगितल्या प्रमाण तीनं केल..

रात्री कसल्याशा तीला अचानक जाग आली.. घड्याळाकडे लक्ष गेल तर दोन वाजुन गेले होते... बाजुला पाहील तर सुमित बेडवर नव्हता. ती झटकन उठली आणि सुमित ला शोधु लागली.. सुमित जागेवर नव्हता पन कसलासा आवाज मात्र येत होता...
ख् ट्ट....खट्ट .... खट्ट .... खट्ट ....
एखादी जाड काठी कठीण जागेवर आपटतय अस वाटु लागल...अंगावरच पांघरून बाजुला करत ती उठली आणि आवाजाची वेध घेऊ लागली... बेडरुम मधुन बाहेर हॉल मधे आली पन काहीच हलचाल नव्हती...हॉल मधे पसरलेल्या मंद प्रकाशात तीची नजर सर्वत्र फिरू लागली... पन आवाज बंगल्याच्या टेरेस  वरुन येत असल्याच जाणवल तशी ती घाबरली...  तीनं हलकेच आवाज दीला
" सुमित.."
पन काहीच प्रतीसाद नाही... मन घट्ट करत पुजा टेरेसवर जाऊ लागली... भितीन तीच सर्वांग थरथरत होत ... ओठ सुकले .घशाला कोरड पडली...  भिंतीचा आधार घेत ती एक एक पायरी चढुन वर जात होती तसा त्या आवाजाची त्रिव्रता वाढु लागली...  वरच्या उघड्या दरवाजातुन किंचीत चंद्राचा प्रकाश आत येत होता...तीन दरवाजा हलकेच पुढ ढकलला तसा कुईईई आवाज करत दरवाजा उघडला... पुजा ची व्याकुळ नजर सुमित ला शोधु लागली... पन त्याला साद घालायच धाडस होत नव्हत... दबक्या पावलांनी ती दरवाजा तुन आत गेली तशी गोठवणा-या थंडीची जाणिव झाली... चंद्र कोर क्षितीजापासुन वरच होती ... त्याच शितल तेज सर्वत्र पसरल होत.. त्यामुळे सर्वकाही स्वच्छ आणि स्पष्ट दिसत होत... त्या नितळ प्रकाशात ती त्या आवाजाचा वेध घेऊ लागली... आवाज तर येत होता..   समोर लोखंडी झोपाळा आजुबाजूला कुंड्यांमधे लावलेली झाडांची रोप... डाविकडे मोठी पाण्याची टाकी होती.. तीची नजर सर्वत्र फिरत होती पन तो आवाज कुठुन येत होता तेच समजत नव्हत... खट्ट .... खट्ट .... खट्ट पन कोणीच दिसत नव्हत...पन कोणीतरी आपल्या शेजारी उभ आहे याची जाणीव प्रत्येक क्षणाला होत होती... तीन सर्वत्र शोधल पन काहीच नाही... .त्यावेळी तीच्या लक्षात आल की कोणीतरी आपल्या माग उभ आहे... तो घरघरणारा श्वास मागुन तीच्या मानेवर स्पष्ट जाणवत होता.. ....

तीन ओळखल तीची भीती जवळ जवळ नाहीशी झाली....
" सुमित... तु पन ना... रात्रीचे तीन वाजलेत.. उद्या ड्युटीवर जायच नाही का..."
बोलता बोलता ती मागे वळली तशी सुन्न झाली... मागे कोणीच नव्हत... ती शहारली त्यातच हल्क्याशा वा-याने झाडांच्या पानांची होणारी सळसळ काळजाचा थरकाप उडवीत होती... ती स्वताला थोड सावरत होती तोच
समोरील भिंतीवर एका अस्पष्ट सावलीची हलचाल होत असल्यासारख वाटु लागल... ती थबकली... जागेवरच थांबली... आपली नजर तीन त्या भिंतीवरील सावलीवर रोखली... गडद्द...आणखी गडद्द .... आता ती सावली स्पष्ट दिसत होती...  उंच, लांब मोकळे सोडलेले केस , भक्कम शरीर रचना, गुडघ्यापर्यंन्त लांब हात एका हातात भल मोठं कु-हाडीसारख हत्यार .. समोरच ते आक्राळ विक्राळ रूप पाहुन पुजाच्या काळजाचे ठोके वाढले... पाय जमिनीत रुतल्यासारखी ती सुन्न झाली इतक्यात त्या आकृती समोर आणखी एक सावली उमटली... आपल्या गुडघ्यावर बसलेली.. मान खाली झुकवलेली आणि दोन्ही हात जोडुन आपल्या प्राणांचा भिक मागणारी ती सावली.... जशी त्याची गुलाम असावी... ते दृष्य पाहुन पुजा पुरती शहारली ....गर्रर्रर्रर्रकन ती मागे वळली पन मागे कोणीच नव्हते... पुन्हा समोर पाहील तर त्या दोन्ही सावल्या भिंतीवर तशाच होत्या...  हळु हळू त्या विचीत्र ऊभ्या सावलीने आपल्या हातातील ते धारदार शस्त थोड वर उचलत त्या गुलामाच्या कवटी वर खट्ट कन प्रहार केला.. पुन्हा दुसरा ... तीसरा... खट्ट...खट्ट... खट्ट... आणि मग त्या ऊभ्या विचित्र सावलीने वर आकाशाकडे आपल तोंड करत मोठी आरोळी ठोकली. एखाद अजस्त्र रानटी जनावर ओरडाव तसा तो घोगरा आवाज एकुन कानाचे पडदे फाटतात की काय अस वाटु लागल....डोळे मोठे करुन पुजा त्याच्याकडे पहात होती... त्या अजस्त्र सावलीन हातातील शस्त्र हवेत उंच नेले आणि त्या गुलामावर जेरदार प्रहार केला .. खस्स्स्स कन धारधार पात मानेवरुन फिरल तस ते शिर धडावेगळे झाले...  त्यासरशी पुजा जिवाच्या आकांतान ओरडली. पन तीच्या तोंडातुन शब्द फुटत नव्हते .. जशी तीची वाचा गेली हेती.... समोर ते धड जमिनीवर लोळु लागले आणी तुटलेले शिर पुजाच्या पायाजवळ येऊन पडले ... ते मस्तक सुमित चे होते... आणि झटकन तीला जाग आली  . अंग घामान अगदी भिजल होत. ..घसा कोरडा झालेला... घड्याळात पाहील तर तीन वाजायला आले होते.... पन तीची नजर बाजुला वळली तशी पुन्हा शहारली .... सुमित बेडवर नव्हता....
"सुमित. " त्या साद घालतच पुजा बेडरुम मघुन बाहेर पडली.. सर्वत्र शोधल.... तो कुठेच नव्हता..
" टेरेसवर तर नसेल..." ती धवतच वर गेली.... सुमित दिसला..... वर.... बेशुध्द. ...
सुमित ला शुद्धीवर आणल.. पन तीच्या डोक्यात हजार प्रश्नांच जस काहुर माजल होत..
                     ******
सकाळ झालेली... नवा दिवस उगवलेला...  आज पुजाच लक्ष कशातच लागत नव्हत.. डोळ्यात प्राण आणुन ती कोणाची तरी वाट पहात होती...
मन बेचैन होत आपल्या नव-यासाठी...
' कुईईई' गेटचा दरवाजा उघडलेले आवाज आला तशी ती सोफ्यावरून उठली...  नंदामावशी आत आल्या... पुजा काही बोलणार तोच मावशी म्हणाल्या...
" साहेबांची तब्बेत कशी आहे..."
पुजा काहीच न बोलता मावशी ना घेऊन बेडरूम मधे गेली... सुमित शांत झोपलेला.... पन खुप अशक्त वाटत होता...
" तुम्ही येण्या आधीच झोप लागली त्यांना... डोक ठणकतय म्हणुन रात्रभर जागा आहे...."
नंदामावशींचा चिंताग्रस्त चेहरा पाहुन पुजाचे डोळे पाणवले.. मावशी तडक चालत किचन मधे गेल्या तशी पुजा ही मागोमाग गेली...
" रात्री काय घडल. ..?" ओट्यावरची भांडी बाजुला करत मावशी नी विचारले... पुजाने घडलेली सर्व घटना सांगितली तसे मावशींच्या चेह-यावर गंभिर भाव उमटले...
दिर्घ श्वास घेत त्यांनी विचारले...
" मागिल काही दिवसात कोणी भेटायला आलेल....? कोणाशी वाद ...भांडण...."
"नाही मावशी... इथ येऊन सहा महीने झालेत.. पन कोणाशी कसलाच वाद नाही..." पुजा पाणावलेल्या डोळ्यातील आश्रु टीपत म्हणाली़...
तशी मावशी पुन्हा विचारु लागल्या....
"मग.....नातेवाईकांशी काही वाद..."
त्यांचे शब्द कानावर पडताच पुजाचे डोळे चमकले...
" हो....तुम्ही आमच्याकडे कामाला लागण्याच्या थोड आधी... म्हणजे आतापासुन  महिनाभरा पुर्वी..."
पुजा त्याना सांगु लागली....
" सकाळचे दहा वाजुन गेलेले त्या दिवशी सुमित ला सुट्टी होती.. आम्ही दोघेही किचन मधेच होतो... कांदा कापताना माझ बोट कापल म्हणुन मला मलम पट्टी केली आणि मदत करताना स्वताच पन बोट कापुन घेतल...तोच आमच गेट उघडल्याचा आवाज आला तशी मी किचनच्या खिडकीतुन पाहील... तसा कोणीतरी अनोळखी पती पत्नी दिसले.. नव-यान मळकट पांढरा सदरा आणि तशीच पांढरी वीजार घातलेली , उंच , किंचीत सावळ, पायात चामड्याच चप्पल... साधारण ४५ च्या वयाचे इसम आणि सोबत एक महीला होती... चाळीशीची... हिरवं लुगड नेसलेल.  गडद्द हिरव्या बांगड्या, डोक्यावर पदर जो दातांमधे घट्ट पकडलेला... कदाचित डोक्यावरुन खाली सरकु नये यासाठी असेल... कपाळावर भल मोठ कुंकू.. आणि पायात तसच चामड्याच चप्पल..."
नंदा मावशी शांत पने ऐकत होत्या तशी पुजा पुढे बोलु लागली. ..
" त्यांना पहाताच आम्ही दोघे बाहेर आलो.. ती बाई सुमितची आत्या होती आणि तीचा नवरा.. ते आत आले सुमित त्यांच्याशी बोलत बसला  तशी मी चहा नाष्ता करायला आत आले .."
बोलता बोलता मंद हसत पुजा बेलु लागली
"आमच्या लग्नासाठी विरोध होताच. त्यांनी मला सोडुन दील तर भावकीत जागा मिळेल अस काही सांगत होते..पन सुमित चा चढलेला आवाज स्पष्ट ऐकु आला..."
बोलता बोलता पुजा थांबली... नंदा मावशी सगळ मन लाऊन ऐकत होत्या..
पुजा पुन्हा सांगु लागली...
" सुमीत त्यांना म्हणाला...तुमच्या मुलिचा नवरा दारू पिऊन तीला मारहान करतोय.. तीचा छळ करतोय . मग तुम्ही का तीला त्या नव-याला सोड म्हणुन सांगत नाहीत... त्यावर
सुमित ची आत्या म्हणाल्या..' बाईच घर तीच सासर आसतया. न्हवरा काय बी करो.. तीन तीतच जगायच आणी तीथच मरायच...'
त्यावर किंचीत हसुन सुमित बोलला होता की.
' हो ना...मग आता ही माझी बायको आहे .. आणि बायकोच कर्तव्य आता तुम्हीच सांगितल..' त्यांच्यात वाद झाला तसे सुमित रागाने घरातुन निघुन गेले.. ते दोघे तसेच काही वेळ थांबले आणि न सांगताच निघुन गेले..."
तीच बोलन ऐकुन मावशी म्हणाली
"म्हणजे ते त्यासाठी आले होते तर...."
"कशासाठी,,,,,?"
"याचा उलघडा होईल..पन त्यासाठी तुला आणी सुमित ला गावी जाव लागेल..."
तोच एका आवाजाने दोघीही शहारल्या... सुमित जोरात ओरडला..
पुजा बेडरूम कडे धावली
सुमित बेडवरच होता असह्य वेदनेन कन्हत होत... रक्त शोषुन घ्याव तस शरीर निस्तेज पांढर पडु लागल होत...पुजाला समोर पहाताच तो गयावया करू लागला..
" पुजा... खुप त्रास होतोय ग.. आधी फक्त डोक दुखत होत आता अस वाटतय की संपुर्ण शरीर आतुन कोणितरी कुरतडतय...आई ग.."
जोरात किंचाळत तो बेशुध्द झाला...
पुजा त्याच्या जवळ जात तोंडावर पाणी मारत उठवु लागली... नंदामावशी चौकटी बाहेर ऊभी सर्व पहात होती.. सुमित झोपलेल्या ठिकाणी डाविकडील भिंतीवर एक अस्पष्ट सावली उमटताना त्यांनी पाहीली...
......to be continue
Next part
story writer- sanjay kamble 
         काय झाल असेल सुमीत ला सुमीत असं का करतोय ही मोठ्या संकटाची चाहूल तर नसेल ना ? पाहूया आपण पुढच्या भागात.

1 comment:

  1. khupach mast aani pratek veli kathet navin kahi n
    kahi vachayala milal khupach chan bhitidayak aani manoranjak katha
    Creepy

    ReplyDelete