रक्तपिशाच्च Sanjay kamble raktpishaachya part-1

रक्तपिशाच्च...
sanjay kamble
           बुधवार असल्याने गावच्या आठवडी बाजारात नेहमीसारखाच गोंधळ, गडबड,
घाई सुुरू होती..
पहाव तीकड समोर मांडलेल्या हिरव्यागार पालेभाजा , लाल लाल टमाटे , काळी पांढरी
वांगी , शेवगा ,पालक, मेथी यांचा ढीग च्या ढीग दिसत होता...
लोक कधी नुसतच पहात पुढ सरकत होतीत तर कोणी 'भाव' विचारून 'भाव ' खात निघुन
जात होता...पहाव तीकडे आपापल साहीत्य विकण्यासाठी लोकांना साद घालणारे
विक्रेते दिसत होते..
त्यातच कडेवर लहान पोराला घेतलेली माय भाव विचारू लागली...
"वांगी कशी हायती ....? पोकळा कसा दिला .?"
सागळ्या माळव्याच दर विचारून घेतल पण काहीच पसंतीस पडत नव्हत.. तीच्या कडेवरच
पोरग मात्र बेकरीतल बटरांच पाकीट पाहीजे म्हणुन रडुन गोंधळ घालत होत...
" गप की कार्ट्या , आसल कुनाच्या आवलादीच झालईस..? एकद बगीतल की पायजे म्हंजे
पायजेच.."
Raktpishaachya

अस अस्सल गावराण शब्द उच्चारत एक धप्पाटा पाठीत घातल पुन्हा म्हणाली..
" जा तुज्या 'बा' कड.."
पोरग्याला खाली उतरवल तस ते धावतच त्याच्या वडलांकडे गेल पन भोंगा मात्र चालुच
होता...
इकड भिकाजी मात्र भाजीचा खप हवा तसा होईना म्हणुन जरा नाराजच होता. दुपार होता
होता शिरपाचे बोंबील ,मासळी , बांगडा संपत आलेले तर गणपाची आंबा फणसाची रास
देखील कमी झालेली, राहीले ते हानमा आणि भिकाजी यांच्या भाज्या मात्र अजुनही
फारशा खपत नव्हत्या ....जो तो भाव विचारून नाक मुरडत निघुन जाई..
'बाजार भोगाव' गावाच्या नावावरूनच समजत की आजुबाजूच्या कित्येक गावातील
लोकांच्या आर्थिक उलाढालीच केंद्र असाव...आणि होतच... कोल्हापुर शहराच्या
पश्चिमेस साधारण ३५ किमी अंतरावर उंच डोंगर दाट जंगल आणि वनराईने नटलेल गाव..
आजुबाजूच्या अनेक गावातील लोक आपल्या संसारूपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी या
ठिकाणी येत तर आपल साहित्य विक्रीसाठीही छोटे मोठे शेतकरी आणि व्यापारी ही येत
असत. त्यातच भिकाजी, हानमा , शिरपा आणी गणपत ही एकाच गावची चौकडी आपापल
साहीत्य विक्रीसाठी या ठिकाणी येऊन दिवसभरात झालेल्या मिळकतीतुन आपल्या
संसाराला लागणा-या चिजवस्तु घरी नेत... यांच गाव तस दुर होत पन एकमेकांची सोबत
असल्यान वाट कधी सरते ते लक्षात येत नसे.. आज ही ते दर आठवड्याप्रमाणे आपापल
साहीत्य घेऊन आले होते.
         सांज व्हायला आली तरी भिकाचा माळव्याचा ढीग काही उतरत नव्हता.
लोकांची ये जा कमी होऊ लागली.. पुरेसे पैसेही मिळाले नव्हते त्यामुळे पुढच्या
आठवड्याचा गुजारा कसा करायचा याचा विचारही त्याला पडलेला...
बाकी तीघांनी घरी परताण्या आधी लागणार साहीत्य खरेदी केल..
" आगा ये भिक्या.. रात व्हयाला आली.. निगायच का रात हीतच घालीवतुस..."
शिरपान हातातली पिशवी उचलत साद घातली..तसा भिकजी म्हणाला...
" थांब गा... भाजीच्या चार पेंड्या इकतो मग निगु.. तवर हे दुकानातल सामान घे..
"
पोरान लिहुन दिलेली चुरघळलेली पांढरी चीठ्ठी खिशातुन काढत शिरपाला कामाला
लावल...
भिकाजची भाजी विकता विकता चांगलाच वेळ झाल... आणी बाजारात लोकांची गर्दीही
नाहीशी झाली... जो तो आपापली शिल्लक राहीलेली भाजीची पोती , ठीक्की दुरड्या
डोक्यावर घेऊन परतीच्या मार्गाला लागला.
" हानम्या ... ते बग... त्या दुकानातल्या घड्याळात...साडेआट वाजुन गेल आजुन
वस्तीची गाडी कशी न्हाय आली गा.." भिकाच्या या प्रश्नाने हानमा आपल्या जवळची
पिशवी खांद्यावर घेत उत्तरला..
" लेका नीट बग..साडेआट न्हाय... साडेनव वाजल्याती.. तुज्यापाई एसटी बी
चुकली...वडाप बी गावना झालय...''
तोवर शिरपा आणि गणपत चालत समोरून आले. मान तीरकी करून तोंडातल्या पानाचा
पिचकारी बाजुला मारत म्हणाला
" आगा वडाप बी न्हाय.. चालतच जायाला लागणार..."
सुपारीचा खांड तोंडात टाकत पिशवी ऊजव्या खांद्याला अडकवत गणपत म्हणाला...
" आता कुनाची वाट बगायची...? चला ... वाटला लागू.."
दिवस भर विक्री करताना घडलेल्या मजेशीर गप्पा मारत चौघांचा पायी प्रवास सुरू
झाला.. त्याच गाव त्या ठिकाणाहून आठ ते नऊ किमी असेल पन गावच्या त्या रांगड्या
गड्यांना याची सवयच होती...
उन्हाळ्याचे दिवस ... आभाळ चांदण्यात न्हाऊन निघाल होत.. चंद्राची कोर आकाशात
बरीच वर आलेली... पौर्णिमा दोन चार दिवसांवर असेल अस नितळ चांदण पडलेल...
गावचा तो मुख्य रस्ता धरला तर पोहचायला बराच वेळ लागेल त्यामुळे त्यांनी
डोंगरातुन जाणारा दुसरा कच्चा रस्ता पकडला..
एक जाड लांब काठी आणी बाजाराच्या पिशव्या घेऊन त्या चिंचोळ्या पायवाटेवर
पसरलेला पाला पा़चोळ पायाखाली तुडलत चालताना कोल्हापुरी चपलांचा
कर्रर्रर्रर्रर कर्रर्रर्रर्रर असा आवाज चोहोबाजुने घुमत होता. चौघांच्या
गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. त्यातच भिकाजीचा मजेशीर स्वभाव असल्याने एक
विनेदी किस्सा सांगितला तसे तीघेही पोट धरून हसु लागले... चालता चालता ते बरेच
दुर आले... भिकाजी ला काहीतरी वेगळेच जाणवले तसे हसत असणा-या आपल्या मित्रांना
गप्प रहाण्यास सांगुन जागेवर थांबला... सर्वच एकदम शांत झाले... शिरपा आणी
हानमा दोघ भिकाजीकड पहात हाताने खाणाखुणा करत काय झाल विचारू लागले तसा
हातानेच स्वताच्या काना कडे बोट दाखवत कसलासा आवाज ऐकण्याचा इशारा केला...
तीघांच्या गंभीर चेह-याकडे पहात गणपत मात्र भितीन अर्धा झाला... आता चौघेही
श्वास रोखुन ऐकु लागले... आजुबाजूच्या दाट झाडीतुन रातकिड्यांची
किर्रर्रर्रर्रर्र किर्रर्रर्रर्रर्र आणी घुंsssss घुंssss असा घोंघावणारा
वारा इतकाच आवाज येत होता. तीघेही गंभीरपने भिकाजीकडे पाहुन आजुबाजूच्या
परिसराकडे पाहु लागले. भिकाजीन त्या समोरच्या चिंचेळ्या पायवाटेकड पाहील.
"कोणीतरी आपल्या संग चालत यत आसल्यावाणी वाटतया र.."
भिकाजीच्या त्या वाक्याने तीघेही थोडे घाबरले..
" गड्या.. जंगली जनावर आसतील.. बीगी बीगी पाय उचला न्हायतर इपरीत व्हायच.."
त्यासरशी चौघही झपाझप पावल टाकु लागले..
दोन्ही बाजुला झाडांच्या आकृत्या वा-याच्या मंद झोक्याबरोबर हालत होतीत. शुभ्र
चांदण्यात उजळुन निघालेली ती वेडीवाकडी पायवाटेने एका गुढ रहस्याकडे घेऊन जात
असल्या सारख वाटत होत...
" ये शिरपा.. रस्ता चुकलाय का बगा की र.. कीती यळ झालाय पर आजुन बी कंच गाव
दिसना.. आणं भुक बी जोरात लागलीया."
चालुन चालुन सर्वच थकले होते. बाजुच्या एका दगडावर बसत शिरपा न हातातली पिशवी
खाली ठेवली तसे गणपत आणी हानमा त्यांच्या जवळ जाऊन बसले. भिकाजी मात्र तसाच
त्या वाटेवर ऊभा आजुबाजूला पाहू लागला.. त्याला दुरवरून निघणारी एक धुराची
पांढरट रेषा आकाशात वर वर सरकताना दिसली.
"गड्यांनो.. गाव तरी जवळ आल्यासारख वाटतय.."
म्हणतच तरातरा चालत थोडा वर गेला आणी आपल्या मित्रांना वर येण्यासाठी साद
घातली.. तीघेही डोंगरमाथ्यावर पोहोचले तसे भिकाजी पहात असलेल्या ठिकाणी पाहु
लागले. डोंगराच्या माथ्यावर अगदी तुरळक झाडे होती आणी तीथेच साधारण ५० ते ६०
पावलांवर एका छोटीशा झोपडीमधुन लुकलूकणारा दिव्याचा किंचीत प्रकाश बाजुच्या
खिडकीतुन दिसत होता.. झोपडीवर असलेल्या छोट्या धुराडीमधुन निघत असलेली धुराची
पांढरट रेषा मोकळ्या आकाशात उंच पसरत वेगवेगळ्या आकृत्या तयार करत होती...
भुकेने व्याकुळ झालेले चौघेही त्या झोपडीच्या दिशेने चालु लागले.. पायाखाली
सुकलेला पाला पाचोळा तुडवत चौघेही झोपडीजवळ पोहोचले, तीघे बाहेर छोट्याशा
अंगणात थांबले तर भिकाजी पुढे झाला, हातातल्या बटव्यातुन सुपारीच एक खांड
तोंडात टाकुन चघळत मान किंचीत उंच केली आणी कवाडा शेजारी हात ठेवत हाक दिली..
"कुणी हाय का घरात"
सर्वत्र निरव शांतता पसरली प्रत्येक जण आतुन काही प्रतीसाद येतो का हे श्वास
रोखुन ऐकत होते..
आणखी तीन चार हाका दिल्या तशी आत काहीतरी हलचाल होत असल्यासारख जाणवल..
खळखळणा-या बांगड्याचा आवाज जाणवला
"कोण हाय.."
आतुन ऐकु आलेले ते एका वयस्कर स्त्रीचे जड  मोजकेच शब्द आतुन कानावर पडले तसा
सर्वाना धीर आला..
आवाजावरून वयस्कर स्त्री असावी अस वाटत होत.. तीच्या प्रश्नाला भिकाजीने लगेच
उत्तर दिले
तसे हल्केच तीने कवाड बाजुला केले...तशी एक अतीशय वयस्कर वृध्द स्त्री समोर
उभी होती.. किंचीत पांढरे केस, अंगावर मळकटलेल नऊवारी लुगड, पांढरी सुरकुतलेली
त्वचा जी हाडांना पुर्णपणे चिकटलेली,
बाहेर पहात ती म्हातारी बोलु लागली.. डोळ्यांच्या खोलवर गेलेल्या खोबनीतुन
किलकील्या नजरेन पहात तीन विचारल
" तुमी चोर ,डाकु आसलासा तर माज्या घरात तुमास्नी कायबी गवसायच न्हाय."
"आमी चोर न्हाय ग म्हातारे.. वस्तीची गाडी चुकली म्हणुन चालत गावाला निगालोया.
हे घे.. (हातातल्या पिशवीत हात घालुन प्लास्टीक कागदात बंधलेले तांदुळ दीले )
चुलीवर यवड तांदुळ शिजवुन आमास्नी खायाला दे.. मजे आंगात वाइस ताकत यईल...आजनं
रस्ता लय दुर हाय."
क्रमशः 
story by sanjay kamble 

0 comments: