www.ghostskk.blogspot.in
ती ' प्रत्येकाला पहात होती . अगदी रागाने.. जशी चवताळली आहे.. एखाद्याच्या अंगावर झेप घेऊन नरडीचा घोट घ्यावा असे तीचे हावभाव... प्रत्येकाला पहात जोेरजोरात पायांना झोके देऊ लागली... ' प्रांजल' म्हणुन तीच्या बाबाने हाक दीली तसे झटकन तीन पायांची हलचाल बंद करून खाली मान घालुन बसुन राहीली... पुर्ण मिनीटभर सर्वत्र एकदम शांतता होती... प्रत्येकजन लैफ्टवर बसलेल्या प्रांजल कडेच पहात होता.. आणी अचानक ती जोरात किंचाळली... पन तो आवाज वेगळा होता.... भरडा...... जसा कोणी करड्या आवाजाच्या आणी धिप्पाड शरीरयष्टी असलेला पुरूष रागाने वेडा होऊन ओरडेल असा तो आवाज होता... त्या आवाजाने उपस्थीतांपैकी प्रत्येकाच्या अंगावर शहारा आलेला... या परिस्थीतीत काय कराव हे कोणालाच सुचेनास झाली की इतक्यात ती बेशुध्द होऊन खाली पडली, पन माझ्या पुढे असलेल्या अतुलने तीला अलगद पकडले...
बाजुचे जोशी काका तीथच होते... तीला बेडवर झोपवुन आम्ही बाहेरच्या हॉलमधे बसलो. एव्हाना तीची आईही शुध्दीवर आली होती..
जोशी काकांनी तीच्या आईकडे पहील..
"तुला सांगितल होत ना पोरीला नदीकाठची बाधा झालीय ...." काका थोडे रागातच म्हणाले...
" पन 'यांचा' असल्या गोष्टीवर विश्वास नाही, मी तरी काय करू..?" प्रांजल ची आई खाली बसत डोक भिंतीला टेकत रडु लागल तसा काकांनी आपला मोर्चा तीच्या बाबांकडे म्हणजे रमेश कडे वळवला...
"काय रे... तुला सांगितलेल समजत नाही...? तुझ्या बापान कधी आजवर माझा शब्द ओलांडला नाही , आणी तु.....?"
रमेश मात्र मान खाली घालुन भिंतीला तक्या देऊन निमुटपने ऐकत होता
तसे काका पुढ म्हणाले ...
" आठ दिवसापुर्वीच सांगितलेल तुझी साडेसाती सुरू आहे गाडी जपुन चालव , घेतलास ना पाय मोडुन... आता हे पोरीच अस..."
" ये थेरड्या..."
एका भरड्या आवाजाने सर्वच स्तब्ध झालो.. सर्वांनी बेडवर झोपलेल्या प्रांजल कडे पाहीले... कारण ती ज्या भरड्या , पुरषी आवाजात ओरडली तसाच आवाज होता... पन ती तर शांत झोपलेली..... आणी पुन्हा आवाज घुमला..
"म्हातारा झालास पन अजुन माज उतरला नाही तुझा...."
त्या आवाजान तीथला प्रत्येकजन अचंबीत झाला... प्रांजल चे वडील 'रमेश' खाली मान घालुन बसलेले आणी भयंकर रागाने ते जोशी काकांना बोलत होते... तसा अतुल त्याच्या अंगावर धाऊन गेला...
"काय रे....तुझ्या बापाच्या वयाचे ते अस बोलतोस त्यांना.... भो*** मस्ती आलीय काय रे...."
तशी झटकन रमेश ने मान वर केली आणी तीथल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला... लाल रक्ताळलेले डोळे, चेह-यावरच्या क्रुर छटा आणी आवाजातील ती घरघर ... रमेश ताडकन उठुन उभा राहीला, त्याला पाहुन काळजात चर्रर्रर्रर्रर्र कन झालं.. अतुल तर मागेच सरकल मी हळुहळू दरवाजा कडे सरकु लागलो...म्हणजे ऐन वेळी दरवाजा शोधायला नको म्हणुन....
रमेश न समोरच उभ्या अतुलची कॉलर पकडुन त्याच्या डोळ्यात डोळे घालुन पाहू लागला... मी सपशेल अतुलचे हातपाय गळताना पाहीलेत... तो खुपच घाबरून गेला होता.. मी अतुलला मागे खेचु लागलो तशी आपली ताकत एकवटुन अतुलन रमेशला जोराचा धक्का दिला, रमेश मागे पडला आणी अतुलही धडपडत बाजुला झाला पन काहीच न बोलता तो दरवाजा कडे धावला आणी घर गाठल.... जर मी ही तीथुन गेलो असतो तर आजवरचा इथल्या लोकांचा माझ्यावरचा विश्वास सत्यात उतरला असता की मी.... म्हणुन आवंढा गिळुन मी तीथच थांबलो....
"क.....क...... काय झाल......?" रमेश भानावर येत चाचपडत बोलु लागताच तसे काका म्हणाले
" हे असच घरातल्या प्रत्येकात संचारत राहील.... 'अमावस्येच्या' आत सांगितलेल साहीत्य तयार करून तो 'उतारा' घरातल्या प्रत्येकाच्या अंगावरून उतरून रात्रीच्या वेळी पिंपळाजवळच्या दगडावर ठेऊन यावा लागेल... मगच 'ते' परत त्याच्या जागेवर जाईल, नाहीतर अनर्थ ओढवुन घ्याल..."
" पन कोण ठेवणार...? माझी ही अवस्था अशी वडीलांना थोड चालल तरी धाप लागतेय..."
रमेश हताशपने म्हणाला.
"शेजारच्या एखाद्या मित्राला सांग.." म्हणत काकांनी नजर आम्हा सर्वांवर फिरवली ... मी जरा गर्दीत 'आडाला' झालो तसा बाजुच्या खिडकीतुन आत डोकावणारा सागर ओरडुन मला म्हणाला...
" संज्या.... तु लपु नकोस.... तुला कोणी नाही सांगत.... सगळ्यांनाच माहीती आहे तु किती धाडशी आहेस ते...ख्या ख्या ख्या"
आमचे सर्वच मित्र हसु लागले..
चार चौघात आपमान केला नालायकाने.. खरतर चारचौघात अपमान केला, याsssच काही वाटल नाही पन तीथच जोशी काकांची मुलगी 'अस्मिता', हाताची घडी घालुन उभी होती.. तीच्या समोरच माझा... आता कुठ जरा लाईन देत होती, त्यात आमचे दोस्त, तीला समोर बघुनच माझा उध्दार करतात...
मग तावातावात मी ही म्हणालो...
" मी जातो हो काका... तीच्यायला...भितोय काय आपन...."
अस्मितान मात्र माझ्या कडे पाहुन भुवया उंचावल्या.. मी ही छाती फुगवून धाडशीपनाचा दिखावा करत स्माईल दिली, तीनं घडी घातलेल्या हाताचा अंगठा मला दिसेल असा उंचावत शुभेच्छा दिल्या.. तसा मनात म्हणालो बास्स्स... जिंकल मी... आता तो 'उतारा' त्या जागेवर काय...... म्हणाल तर त्या भुताला दोन घास चारुन पन येतो....
मागच्या आठवड्यात गणपती विसर्जन झाल तसा रमेश आणी काकांनी मला बोलवून घेतल... 'उतारा' टाकायचा दिवस आणी वेळ ठरली...
आणी आता हा उतारा घेऊन निघालोय....
खरतर हे सगळ जरा जास्तच विचित्र वाटतय... पन नाईलाज, जबाबदारी घेतलीय म्हणजे काम तर करावच लागणार आहे.. दुरवरून गावठी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज मात्र मघापासुन येतोय.. आणी तो पिंपळही दिसु लागलाय... हिरव्यागार पानांनी अगदी गच्च भरलेल ते भल मोठ पिंपळाच झाड... जराशी वा-याची झुळूक येताच पानांची सळसळ उरात धडकीच भरवतेय... काही अंतरावरच 'पंचगंगा' नदी वहातेय.. नदीच पात्र ही पुर्ण भरलय, ही काळोखी रात्र... त्यात हा निर्जन परिसर. या शांत वातावरणात नदीच्या खळखळणारा आवाज आणी नदीकाठच्या गर्द झाडाझुडपांमधुन रातकिड्यांची किर्रर्रर्रर्रर्रर्र किर्रर्रर्रर्रर्रर्र काळजाचा थरकाप उडतेय... खाली चिखलही खुप आहे..त्यातुन चालताना थोडी कसरत होतेय म्हणजे पाय घसरू नये यासाठी... बेडकांचे अधुनमधून ओरडणे सुरूच आहे... म्हणजे टाॅर्च च्या पांढ-या प्रकाशात दिसतात ही बेडकं... अगदी लहान... गोंडस... हाताच्या पंजातही मावणार नाहीत अशी.... पौर्णीमा होऊन गेली असेल पन ढगाळलेल्या आकाशात चंद्र कुठेतरी लपुन बसलाय.. चालताना वाटेत येणारी ही छोटी छोटी झुडपे अडथळा बनताहेत, त्यातुनच वाट काढावी लागतेय.. शर्टमधे अडकणा-या काटेरी फांद्या जणु पुढ जाऊ नये म्हणून मला मागे खेचताहेत... हात मात्र आता दुखू लागलेत.... किती मोठ आणी भव्य हे पिंपळाच झाड आहे... खुप दिवसांनी इकड आलोय... तुम्ही कधी 'घुबड' पाहीलय का.....? पिंपळाच्या झाडावर बसलय... म्हणजे टॉर्च च्या प्रकाशात त्याची भेदक नजर माझ्या वरच होती हे लक्षात आल.... पन न बोलता आजुबाजूला न पहाता हे साहीत्य त्या ठिकानी ठेवायच आहे... खरतर अजुनही वाटतय की कोणीतरी आजुबाजूला आहे.. या लख्ख भयान काळोखात आजुबाजूच्या झुडपांमधे होणारी सळसळ होताना वाटतय की एखाद श्वापद लपुन बसलय किंवा कोणीतरी दुरून पाहातय...
जाऊदेत...
ही टोपली समोर पकडुन धरलीये आणी खाली ठेवण्यासाठी जागा पहातोय... खाली चिखलान बरबटलेल्या जमिनीवर पालापाचोळा, झाडाच्या तुटलेल्या फांद्या आणी जनावरांची विष्ठा इतरस्त्र पसरली आहे... तसे इथ बरेच 'उतारे' ठेवलेले दिसत आहेत...
टॉर्चच्या प्रकाशात आजुबाजूला खुपशा रिकाम्या टोपल्या इतरत्र पडलेल्या दिसत आहेत. सोबतच मधोमध चिरून कुंकू लावलेले हे पिवळेजरद्द लिंबू... सुटलेल्या पुड्यांमधुन पसरलेले काळे दाणे , रिकाम्या बाटल्या.. आणखी बरच काही दिसतय..
असो...
ही टोपली त्याsss जागेवरच ठेवतो...
हाssss इथच असुदे ...
डोळे झाकुन नमस्कार करतो बाबा.... जो कोणी आहे त्याला...
हम्म... झाल एकदाच... चलाsss... आता थेट घरी....
पन मागे वळून पहायच नाही...
एक मिनीट..................... मागे पिंपळाच्या झाडावर कसलीशी हलचाल जाणवतेय... हो जिथ उतारा ठेवलाय तीथच...... मागे...... जस एखाद मांजर नखांचा आधार घेत खर्रर्रर्रर्रर्रर्रर्र खर्रर्रर्रर्रर्रर्रर्र करत झाडावरुन खाली उतरतय...
जाऊदे.... मागे पहायच नाही... चालत रहायच...चालत रहायच...चालत रहायच...
अरे बाप रे... हे काय....... मटनाची पिशवी आणी हे ठेवायच लक्षात नाही...
आता...?
आता काय करु.......??
मागे पाहु...? की दुरूनच फेकून देऊ..? न....नाही.... मागे जावच लागणार...!
पन आता वर पहायच नाही , खाली जमीनीकडे पहातच मागे वळायच आणी हे ठेऊन इथुन धावतच थेट घर......... होssss... असच करतो....
खाली पहातच मागे फिरतोय , पन काळज धाड धाड करतय.... खुप भिती वाटतेय यार...
अरेच्या... ही टोपली मी आत्ताच ठेवलेली.... बाप रे... कुणीतरी रागात भिरकावुन द्यावा तसा त्या टोपलीतला भात विस्कटुन टाकलाय... सर्वत्र ... एक मिनीटही झाला नाही ठेऊन मग कोणी केल हे...?
बाप रे.... आजुबाजूच्या काळोखात नजर फिरताना अंगावर काटा येतोय.... कोणीतरी इथच आहे...तीच अनामीक शक्ति जी प्रांजल आणी तीच्या वडिलांवर हावी झालेली... मी मागे पाहीलेल त्या 'शक्ती' ला आवडलेल नाही... म्हणजे कोणीतरी आहे...आसपास.....
आई ग... स्स्स्स्स्स्स्स काटा येतोय अंगावर .....
भी ....... भीती वाटतेय..... खरच......
लवकर हे मटन ठेऊन इथुन बाहेर पडतो... तो दगड कुठे गेला.... हा ... दिसला... हाच तो काळा दगड.... त्यावरच हे मटन आणी बाटली ही ठेवतो...
चला.... झाल एकदाच... झटकन निघुया...
हे काटेरी झाड.... मघाशी येताना अडकले आता जातानाही.... फाटलाच शेवटी शर्ट....
एक सेकेंड... कोणीतरी उभ आहे... मागे.... आणी आता मला त्याच्या श्वासातली घरघरही जाणवतेय... अंगावर काटा आलाय... मी स्वता:ला सावरत चालण्याच वेग वाढवतोय पन परतीच्या या वाटेवर आता मी एकटा नाही हे नक्की...
बाप रे.....आता धावत सुटायला हव.... नाहीतर...
एक.... दोन...... तीन.....
धावतोय पन चिखलाने बरबटलेल्या वाटेवर पाय घसरत आहेत ..
आई ग... वाईट पडलोय... हात , पाय अंग सगळ चिखलान माखलय... पन न रहाऊन नजर मागे गेलीच....
बाप रे... मागे त्या वाटेवर अगदी मधोमध कोणीतरी उभ आहे .. एका सावलीसरखी ती काळीकुट्ट पुरषी आकृती .. धिप्पाड. या भयान काळोखात माझ्यावर रोखलेले त्याचे लालसर डोळे मात्र चमकत आहेत... ते कोणतीच हलचाल न करत नाही तरी अस वाटतय की ते माझ्याकडे सरकतय.....
बाप रे....... पळाsssss इथुन.. नाहीतर मेलो...
हsssssss हsssss हssssssss पळताना
धाप लागतेय... पन थांबायच नाही.... धावत खुप दुर आलोय...
आता ते मागे दिसत तर नाही..
हssssss हssssss
म्हणजे ते त्याच्या जागेवर गेल.. बर झाsssssल... मुख्य रस्ता आलाय...
पन अंग खुsssप जड वाटतय... हsssss
म्हणजेsssss पाठीवर मोठ ओझ घेऊन धावतोय अस वाटतय...
आल..... हssssss
घsssssर जवळ आलssss
वाचलो.... देवा..... उपकार तुझे.. हsssss
बर झाल..... हsssss जोशीssss काका.....रमेश बाहेरच आहेत....
काकाss
काकाssssss
काकाsssssssss
"अरे.... संजु....हळु पडशील..... ठेवलास का निट...?"
" हो काका...ठेवल..."
"तुझ अंग भाजतय रे... आणी डोळे...?. हम्म....शेवटी मागे पाहीसच ना... घात करुन घेतलास स्वता:चा..... ! रमेश....! आता याचा उतारा कोण टाकणार.....?"
समाप्त...
तुम्ही कधी किंवा तुमच्यावरुन कधी उतारा टाकलाय का..? नदी , विहरीजवळ चौरस्त्यावर जुनाट पुलाखाली, तलावा शेजारी, एखाद्या झाडाखाली, पडक्या वाड्याजवळ लाकडी दुरड्यांमधे भात त्यावर गुलाल , किंवा मधोमध चिरून त्या हळद कुंकू लावलेले लिंबू.उकडलेली अंडी, मटन, बीडी, सिगारेट, पुडीत ठेवलेले चने वगैरे यापैकी काहीतरी नक्की पाहील असेल...
हे पाहताना काय वाटलेल....?
दुर्लक्ष कराव... निरखुन पहाव...??
की त्यावर मनसोक्त ताव मारावा....???
खर सांगा.......
Story writer-sanjay kamble
ही स्टोरी तुम्हला कशी वाटली ते आम्हला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा
0 comments: