उतारा. utara horror story part-1

www.ghostskk.blogspot.in
  'आई ग... पायात काहीतरी घुसलय , काय घुसलय हे माहीत नाही पन घुसलय हे नक्की , वाईट कळ उठलीय पन थांबून चालणार नाही.. ,
नाही नाही..... आनवानी नाही.. पायात चपला घातल्यात पन झिजून झिजून टाचेखाली चंद्रकोर तयार झालीय... त्यातुनच एखादा दगड टोचलाय.. पन ओरडुनही चालणार नाही, आणी बोलुनही चालणार नाही.. जे बोलायच ते मनातल्या मनातच.
  तसा रस्ता खुपच सुनसान आहे ,
रस्ता कसला ..? आणी सुनसान तरी कसला..?
शेतातील ऊस वहातूक करणा-या ट्रैक्टर, बैलगाड्यानी ये जा करून तयार झालेला कच्चा रस्ता...  चिखलात रूतलेल्या चाकांनी दबलेली जमीन आणी मधे ऊगवलेले खुरटे गवत , एरवी दिवसा इकड नदीला कपडे धुण्यासाठी जाणा-या महीला आणी शेतात काम करणा-या काही लोकांव्यतीरीक्त कोणी फिरकत नाही तर एवढ्या रात्री कोण येईल... तशी रात्र पन बरीच झाली आहे. म्हणजे घरातुन बाहेर पडलो तेव्हा आकरा वाजुन गेले होते. त्यातच हे पावसाचे दिवस . हातामधे पिशवीचे बंध घट्ट पकडलेत आणी त्याच हातात मोबाईल चा टॉर्च लावलाय. त्याच्या पांढ-या बल्ब च्या प्रकाशात वाट गवसतेय..  मघापासुन मुख्य रस्त्यावर होतो तेव्हा काही वाटल नाही पन आता थोडी भिती वाटतेय. थोडी म्हणजे, जरा जास्तच भीती वाटतेय , कारण हा पाच , सात फुटांचा कच्चा रस्ता.. आजुबाजूला कमरेपर्यन्त वाढलेले गवत आणी दुतर्फा दाट झाडी...  त्यातच बर्रर्रर्रर्रर्रर्र कन चिखलात पाय जाताच हळूच पाय बाहेर काढुन जमिनीवर आपटतोय का ते सांगायची गरज नाही. तेवढे तुमच्या लक्षात येत असलच... मंद वारा सुटलाय... त्यातच वा-याची एखादी मोठी झुळूक आली की ती उंच उंच झाडांच्या काळ्याकुट्ट आकृत्या एका संथ लयीत डोलायला सुरवात करतात... जसे मान डोलाऊन आपल्याकडे येण्यास खुनावत आहेत... मघापासुन गंम्मत वाटत होती पन आता मात्र या सगळ्या वातावरणाची भिती वाटतेय.  कपाळावर जमा होणारे घामाचे थेंब आणी क्षणाक्षणाला वाढत जाणारी काळजाची धडधड मला पुढ जाण्यापासुन थांबवायचा प्रयत्न करताहेत , त्यात भरीत भर म्हणुन ही भयान काळी रात्र. म्हणजे ती रोजच असते पन आज तीची भिषणता सपशेल जाणवतेय.
        खरतर मला एका ठिकानी पोहोचायचय, म्हणजे सोबतच हे जे साहीत्य आहे ते एका ठिकानी द्यायच आहे.... द्यायच नाही...!तर ठेवायच आहे...
गावाबाहेरून जी नदी वहाते, तीच्या काठाजवळ एक भल मोठ पिंपळाच झाड आहे.. तशी नदिकाठी झाडाझुडपांची बरीच गर्दी आहे पन त्या पिंपळाच्या झाडाखाली किंचीत रिकामी जागा आहे...
Utara
तीथच हे साहीत्या ठेवायच, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे... तीथच कोणीतरीे माझ्या योण्याची वाट पहात बसलय, त्या ठिकानी...! जीथ सहसा कोणीही जात नाही...
साहीत्या म्हणजे काय...?
तर बघा.... उजव्या हातात बांबूच्या लहानसहान काड्यांनी विनलेली ही छोटीशी टोपली आहे... त्यात पांढरा भात आणी त्यावर विस्कटुन टाकलेला 'गुलाल'.... गुलाल ...! तोच जे विजयी झाल्यावर तोंडाला लावतात आणी मयत झाल्यावर छातीवर टाकतात...
तोच तो....
डाव्या हातात एक कापडी पिशवी ज्यात एक देशी दारूची बाटली आणी मस्त मसाला वगैरे घालुन तयार केलेल मटन, जे पळसाच्या पानांमधे गुंडाळी करून त्यात ठेवलय... त्याचा खमंग वास न रहावुन तोंडात लाळ आणतोय... तसा या मोकळ्या वातावरणात वास नाही येत आहे पन ते मटन भरायला मीच होता... म्हणुन... आणखी एक दोन पुरचुंड्या आहेत ज्यात काळी हळद आणी काही काळे दाणे, जे तीथ पोहोचल्यावर त्या जागी ठेवायचे आहेत...
एक एक मिनीट...! अस वाटतय की कोणीतरी माझ्या मागुन येतय... कदाचीत माझा पाठलाग होतोय... पन सक्त ताकीद आहे की मागे पहायच नाही त्यामुळे काय करावे सुचेनास झालय... कारण मागुन येणा-याची चाहुल स्पष्ट जाणवतेय... पन मागे बघु शकत नाही...   मला सांगितलय वळुन पहायच नाही आणी बोलायचही ना...............
बाप रे.......! हे मी काय करतोय......?
म्हणजे , बोलायच नाही अस बजावलय तरी मी बडबड करत निघालोय....!
पन माझी ही बडबड मनातल्या मनात सुरू आहे... मनातल्या मनात बोललेल चालत असेल कारण मनात तसेही हजारो विचार येत असतात.....
पन कोणीतरी येतय, मागुन....
मला जाणवतय की या वाटेवर मी एकटा नाही ..
पन कोणी नसेल... एवढ्या रात्री कोणी इकड येईल ....?  पन असेलही... म्हणजे मी हे साहीत्य ठेवतोय की नाही हे पहायला कोणीतरी आलय, की ज्याच्यासाठी हे साहीत्य आहे तोच मागे येतोय....? हे पहायला की मी चुकून त्यातल काही उष्ट तर करीत नाही याची खात्री करायला....
        असो मला माझ काम संपऊन लवकर परत जायचंय.... कारण माझ्या ही पोटात उंदरांनी भुकेन झिंग झींग झींगाट घालायला सुरवात केलीय..
आता मी हे काय आणी का घेऊन निघालोय हा प्रश्न पडला आसेल ना....?
हम्म.... सांगतो हो... त्याच अस झाल ... मागच्या एक दोन आठवड्यात म्हणजे गणेश चतुर्थी आधी शेजारची छोटी मुल आपापल्या आईंसोबत नदीला आली होतीत... आता सर्व महीला कपडे धुण्यात मग्न होत्या तर मुल लपंडाव खेळत होती.... त्यातच मगदुमांची छोटी 'प्रांजल'.. ती ही होती.... बराच वेळ झाला पन कुठच दिसत नव्हती.... सर्वांना वाटल मुल घरी गेलीत तीही गेली आसेल , पन ती गायाबच होती.... सा-याजणी आवरून घरी आल्या पन पोरगी कुठच दिसेना... मग काय.... बोंबाबोंब.... इकड तीकड शोधाशोध झाली पन काहीच सुगावा लागेना... त्यात चौगल्यांचा छोटा निक्कू , म्हणजे निखील... तो म्हणाला  नदीजवळ खेळताना लपुन बसती ती परत दिसलीच नाही.... मग काय.....सायंकाळी 6 ला सर्वच नदीकाठी... 'ती' सापडली पन बेशुद्ध.... त्याच पिंपळाखाली.... घरी आणली ...... बेडवर शांत पडुन होती... तीच्या आजोबांनी तोंडावर पाणी मारल तशी शुध्दीवर आली...  मी बाजुलाच उभा होतो... तीनं खाडकन डोळ उघडले तर ते रक्तासारखे लालबुंद झाले होते... झटकन उठून बसली आणी आपली नजर तीथ जमलेल्या प्रत्येकावर रोखुन धरू लागली... चेह-यावर विस्कटलेले केस आणी रक्ताळलेले डोळे..  ती सात, आठ वर्षाची निरगस मुलगी पन काळजाचा थरकाप उडवणारी रखरखती नजर... घरघरणारा श्वास आणी बिछाण्याला घट्ट पकडुन प्रत्येकाला भुकेल्या वाघीणीसारखी पहात होती. माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता....
बघा.. अजुनही आठवल तरी काटा येतोय.. तीला अस पहून सर्वांनीच ओळखल की हे काहीतरी वेगळ आहे... आम्ही तीथुन बाहेर पडलो आणी चार दिवस सायंकाळची कट्ट्यावर हीच चर्चा रंगली...
          आठ दिवस असेच गेले, त्या रात्री मंडळाचे सर्व कार्यकर्ते गणपतीचे स्टेज घालत होतो... आकरा वाजले असतील... मगदुमांचे घर स्टेजपासुन हाकेच्या अंतरावर... अचानक एका बाईच्या किंकाळीने आम्ही सर्वच हादरून गेलो...  आवाजाच्या दिशेने पाहील तर मगदुमांच्या घरातले लाईट पटापट लागले आणी पुन्हा तशीच किंकाळी कानावर पडली... आम्ही धावत गेलो आणी दरवाजा वाजवायला सुरवात केली. त्या आजोबांनी दरवाजा उघडला पन ते ही थरथर कापत होते...
त्यांनी आतल्या रूमच्या दिशेने बोट केल तसे आम्ही दोघे आत शिरलो....  प्रांजल ची आई बेशुध्द जमिनीवर पडली होती तर तीचे बाबा सुन्न होऊन एकटक डाव्या बाजुच्या लैप्टवर पहात होते... आम्ही काही बोलणार तोच  माझीही नजर तीकडे गेली तसा मी ही दोन पावल मागे सरकलो...
प्रांजल... अंगावर पांढरा फ्रॉक होता तर मोकळे केस चेह-यावर पसरलेले... लैप्टवर बसली होता... पाय खाली मोकळे सोडुन मागे पुढे झोके देत होती आणी तीची क्रुर भेदक नजर आमच्यापैकी प्रत्येकावर पडत होती.. पाटलांचा आतुल आणी मी दोघेच पुढ होतो... म्हणजे आमच्यात धाडशी तो अतुलच... माझ्या बद्दल सांगायला नको....
तशी मलाssss,  भीती वाटत नाही..  पन थोडा घाबरतो... इतकच.
मी तसाच उभा होतो की मघाच्या त्या किंकाळीने जागे झालेले आजुबाजूच्या घरातले लोक आत आले...
' ती ' प्रत्येकाला  पहात होती . अगदी रागाने..  जशी चवताळली आहे.. एखाद्याच्या अंगावर झेप घेऊन नरडीचा घोट घ्यावा असे तीचे हावभाव... प्रत्येकाला पहात जोेरजोरात पायांना झोके देऊ लागली... ' प्रांजल' म्हणुन तीच्या बाबाने हाक दीली तसे झटकन तीन पायांची हलचाल बंद करून खाली मान घालुन बसुन राहीली... पुर्ण मिनीटभर सर्वत्र एकदम शांतता होती...  प्रत्येकजन लैफ्टवर बसलेल्या प्रांजल कडेच पहात होता..  आणी अचानक ती जोरात किंचाळली... पन तो आवाज वेगळा होता.... भरडा...... जसा कोणी करड्या आवाजाच्या आणी धिप्पाड शरीरयष्टी असलेला पुरूष रागाने वेडा होऊन ओरडेल असा तो आवाज होता... त्या आवाजाने उपस्थीतांपैकी प्रत्येकाच्या अंगावर शहारा आलेला...
      काय घडलं असेल प्रांजल बरोबर. प्रांजलला कुणी झपाटलं तर नसेल पाहूया आपण पुढच्या भागात.
.............to be continue.
        Next part click here
Story writer-sanjay kamble 

0 comments: