मृत्युचा जबडा. Marathi horror story part-2

त्यावर गुरव म्हणाले, " हीतन पाच कोस लांब . 'भुताच्या जाळीत.' तुझ धाडस तुला तारल, तुझ भ्या तुला मारल." 
एवढ बोलून गुरव शांत झाले. (भुताची जाळी हे इथल्या जंगलातील पिशाच्च्याचा ताबा असलेले ठिकान, जिथ इतकी गर्द झाडी आहे की दिवसा देखील सुर्य दिसत नाही)
ghost

'भुताची जाळी' नाव ऐकल्यावर सर्वच भयभीत नजरेन एकमेकाकडे पाहू लागले. काय कराव कोणालाच समजत नव्हत. तीथ जाणं म्हणजे मरणाच्या दाढेत स्वता:हून जाण...  रात्र पुढे सरकत होती. सगळे आपसात कुजबूजत होते, तेवढ्यात आजोबा ताडकन उठून उभे राहीले
" कोन यणार माज्या संग...?"
थोरला भाऊ बोलतोय म्हणजे चौघे भाऊ पण उठले तसे आजोबांचे दाजी व गावची दहा ते बारा गावकरी पण जाण्यासाठी तयार झाले.
" समद्यानी देवी म्होर साकड घाला. आण निघा. रात मध्यान व्हायला आलीया. तुमी परत इयीस्तवर म्या देवीला गा-हान घालीन."
देवीसमोर नतमस्तक होऊन आणि गुरवांच्या पायाला हात लाऊन देवळातुन बाहेर पडले. आजोबा सर्वाना उद्देशून म्हणाले ,
" तयारी करुन लगेच निगूया".
सगळे आपापल्या घरी परतले आणि निघण्याची तयारी करू लागले. आजोबा पुन्हा बहीणीच्या घरी परतले. स्त्रीयांना काहीच न बोलता हातातली काठी दारा मागे ठेवली. आजोबांनी डोक्यावरचा फेटा काढला आणी डोके आणि चेह-या भोवती असा बांधला जेणेकरून फक्त डोळे उघडे राहतील, डाव्या हातात मशाल पेटवून घेतली आणि उजव्या हातात तीन फूट लांबीचा धारधार कोयता.
त्यांच्या दाजीनी कु-हाड कमरेला लावली आणि कंदिल पेटवून घेतला. रात्र मध्यावर आली होती. ठरल्याप्रमाण पारा जवळ सर्वजन एकत्र आले,पंधरा ते सोळा जण आसतील, झाकलेले चेहरे, हातात पेटत्या मशली, कंदिल, कु-हाडी, धारधार कोयते आशा तयारीने गावाबाहेर पडले. सर्वजण एकमेकाशी काही न बोलता चालत होते. वातावरण कमालीच गंभिर बनलेल, गाव थोड मागे पडल तशी जंगलातून जाणारी एक चिंचोळी पायवाट लागली... आजुबाजूला दाट, गर्द झाडी, मध्यरात्रीची निरव शांतता, प्रत्येकाच्या पायातील चामड्याच्या कोल्हापुरी चपलाचा कर्र कर्र असा येणारा आवाज, रात किड्यांच्या किर्र आवाजाने भेदत चाललेली शांतता, आणी रात्रीच्या त्या भयान काळोखाला मागे सरकायला भाग पाडणा-या पेटत्या मशाली घेऊन त्या घनदाट जंगलात शिरणारे ते लोक.
सर्व काही एखाद्या military rescue operation सारखे सुरू होत.
                   *****
सर्व डोंगराच्या माथ्यावर पोहोचले , मध्यरात्री निरभ्र आकाशातल ते टपोर चांदण आणी नदीकाठचा काजव्यांनी एकदम उजळुन निघणारा परिसर . रात्रीच्या भिषणतेती तीच सौंदर्य खुलुन दिसत होत..  गांव आता खुप मागे राहील.. डोंगराचा चढ उतार सुरू झाला. काही अंतर पुढ येताच यांच्यातला एक जन एकदम थांबला...
" थांबा... कसलासा आवाज यतोय.."
सर्व जागेवर थांबले...
" व्हय... कोणतरी हाक देतय..."
"शिरपा, कोणतरी मदत मागतय..." 
सर्व जागेवरच थांबले आणि आवाजाची चाहूल घेऊ लागले. खरोखरच आवाज येत होता. कोणीतरी कन्हत असाव असा आवाज होता. सर्वजण शांतपने कान लाऊन ऐकू लागले, पण आवाजाची दिशा समजत नव्हती..
हळुहळू ते शब्द स्पष्ट होऊ लागले..
" आगा ये, मला वाचीव की गा... म्या हीत , हीत हाय." कन्हत कन्हत तो आवाज पुन्हा घुमला तसे सर्वच चक्रावले. तेवढ्यात आजोबांचे दाजी म्हणाले.
" कुनीबी जागच हालू नगा, ह्यो चकवा हाय. आपली वाट धरा, न्हायतर ह्यो आपल्याला रातबर हीतच फिरवील."
सर्व पून्हा चालु लागले पण तो आवाज त्यांच्या पाठोपाठ येतच होता...
" ये.. आर मला वाचवा की र..."
आवाज मागुन येतच होता पन त्या कडे लक्ष न देता सगळे चालत होते. चालण्याचा वेग वाढला तसा तो आवाज मागे पडू लागला. आता समोर काही अंतरावरच भुताच्या जाळीची हद्द सुरू होत होती.. तेच एका आवाजान प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहीला...
"ए.....हीत वाचलासा रे पण तिथ न्हाय वाचनारा."
मागुन आलेल्या या जोराच्या किंकाळीने सर्वच हादरून गेले. एकमेकाकड भयभीत नजरेन पहात एक एक पाऊल पुढ सरकु लागले.. पिशाच्चा ची हद्द सुरू झाली. गर्द झाडी, काटेरी झुडपे अशा या भुताच्या जाळीत सर्वजण पोहोचले. गुरवांनी सांगितलेली जागा आली होती, मशालीच्या प्रकाशात आता मुलीचा शोध सुरू झाला. काटेरी झुडपात कधी एखाद्या घुबडाच घरट दिसायच,तर कधी झुडपातून एखादा विषारी साप सळ सळ करीत वाटेतून बाजूच्या झुडपात शिरायचा... कोल्ह्या लांडग्यांचे चकाकणारे डोळे काळजाच पाणी करायचे... वाट काढत ते आता बरेच आत आले होते. तेवढ्यात त्यांना कसला तरी आवाज येऊ लागला. एखाद्या हिंस्र श्वापदाच आपल्या शिकारीवर झडप घालण्या आधीच गुरगूरण्या आवाज. सर्वच थरारले. हातातील हत्यारे आणि मशाली पूढे करून करवंदाची काटेरी झुडपे कापत वाट करत सर्व त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. घरघरणारा तो आवाज आता वाढू लागला. आणि एकदम सगळ वातावरण शांत झाल. घरघरणारा तो आवाज अचानक बंद झाला तसे सगळेच आपापल्या जागेवर तसेच थांबले. तोवर एका मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ती विव्हळतच बोलू लागली,
" बाबा, कूट हायीस गा. म्या हीत हाय. मला हीतन न्हे की गा..... बाबा. "
ती रडत होती
आजोबांनी आपल्या मुलीचा आवाज ओळखला, त्यांच्या डोळ्यात पाणिच आले. पण काही न बोलता ते आवाजाच्या दिशेने पुढे निघाले. आता आवाज खुप जवळून येत होता. " ए बाबा, आलास व्हय गा."
एवढ बोलून ती गप्प झाली. पुन्हा वातावरण शांत झाल. ती त्यांच्या जवळच कुठतरी होती. सगळे मशालीच्या पिवळ्या तांबुस प्रकाशात ती कुठे दिसते का ते पाहू लागले... इतक्यात आजोबांची नजर समोर ऊभ्या असलेल्या जांभळीच्या झाडावर गेली आणी त्यांच्या सर्वांगावर काटा आला. आजोबांना दरदरून घाम फुटलेला, त्यांची नजर एका ठिकानी स्थिरावलेली..  सर्वाची नजर त्या झाडाकडे गेली. गर्द काटेरी झुडपात ते जांभळीचे झाड. झाडाच्या एका फांदीवर बसली होती..  एकसारख पायांना झोके देत ती एका हाताने झाडाच्या फांदीला नख्यांनी हळुवारपने ओरबडत होती... विस्कटलेल्या केसांनी चेहरा पुर्ण झाकला होता. ती आपल्याच तंद्रीत खाली मान घालून एकसारखी डुलत होती. तीच्या आवाजातील घर घर अगदी स्पष्ट ऐकु येत होती..
धडधडत्या काळजान आजोबा तीच्याकड पहात म्हणाले...
"पोरी खाली उतर आमी तुला न्ह्याला आलोय." आजोबांच शब्द ऐकताच ती एकदम शांत झाली. पाय हालवणे बंद करून काही क्षण तशीच बसली. फक्त झाडावर नखांच ओरखडे सुरु होते. संथपने... सगळे तीच्या दिशेने चालू लागले तशी ती जोराने किंचाळली.
"ए थांो तीतच."
अचानक तीचा आवाज घोगरा झाला. सगळे थबकले. तीने झाडावरून उडी मारली आणि झुडपात तशीच उभी राहीली. पुन्हा तीच्या आवाजातील घरघर्र वाढू लागली,
"आल्या मार्गी परत जा न्हायतर यकाला बी जीत्ता न्हाय सोडणार."
एक सहा , सात वर्षाची मुलगी हिंस्त्र घोग-या आवाजात बोलत होती. सगळे थक्क झाले. थोड धाडस करून आजोबा पुढ गेले, मशालीचा प्रकाश पाडून पाहील आणि काळीजात चर्रर्रर कण झाल , आपली मुलगी समोरच्या झुडपात अवघ्या पंधरा , वीस फुट अंतरावर उभी होती. काटेरी झुडपामुळे अंगावर काही जखमा झालेल्या, अंगातला फ्रॉक थोडा फाटला होता, लाल रक्ताळलेल्या डोळ्यांनी ती पहात होती. काय कराव कोणालाच सुचत नव्हत. आजोबा पुढ जाणार इतक्यात ती दात ओठ खात रागात बोलु लागली..
" ए..... तु हीला न्ह्यायला आलास, माझ्या तोंडातला घास काढून न्हेनार व्हय र.. इsssह इsssह इssssह" 
एवढ बोलुन तीन बोंब ठोकली..  जांभळीच झाड दोन्ही हातानी गदा गदा हालवू लागली.. सर्वाची भितीन गाळण उडाली, पाय जमिनीत रुतल्यासारखा जो तो समोरच ते भिषण दृष्य पहात होता ... जोरात ओरडत एक हात तोंडावर बडवत होती तर दुस-या हाताने गदागदा झाड हालवत होती... सहा सात वर्षाची मुलगी एक दोन फुटांचा घेर असलेल झाड एका हातान हावलत होती आणी हेलकाव घेणार ते ते झाड पाहुन सगळ्यांची बोबडीच वळली. समोरच भीषण दृष्य पाहून सगळेच थरारले... गर्भगळीत होऊन फक्त एकमेकाकडे पहात होते... आजोबांनी आपल्या हातातला कोयता कंबरेला आडकवला आणी सगळ्यांना आपल्या मागे येण्यास खुणावल, आजोबा तीच्या जवळ पोहोचले झाडाला गच्च पकडलेला तीचा दंड पकडला तशी ती थांबली. ओरडण किंचाळण साार काही शांत झाल...  तीचा दंड पकडुन तीला त्या झुडपातुन बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले, तस तीन झटकन आपली मान वळवली आणी रक्ताळलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहील...
केसांनी झाकलेल्या जखमी चेह-यावरून रक्त येत होत...  स्वता:च मरण स्वता: पहाव तसे सर्व थरारले. तीने जोराचा हिसडा मारून हात झटकला आणि जमीनीवर बसुन झाडाखालच्या एका दगडावर आपल डोक आपटू लागली. सर्वच घाबरले, आजोबा सगळ्यांकडे पाहून म्हणाले
" समद्यांनी हत्यार कंबरला लावा, यका हातात पलीता (मशाल) धरा. समद्यांनी जोर लावून हीला ह्यातन भाइर वडायची आण झटक्यात माग परतायच."
सगळे तयार झाले. ती अजुनही त्या दगडावर डोक तसच आपटत होती. जखमी होऊन डोक्यातून रक्त वाहत होत. आजोबांनी मन घट्ट केल. हळुच तीच्या मागे आले, तीचा हात पकडला तशी तीन आपली मान गर्रकन वळवली आणि हसु लागली, पेटत्या मशालीच्या लाल तांबड्या प्रकाशात तीचा चेहरा अधिकच भिषण वाटत होता. कपाळावरील जखमेतून येणार रक्त तीच्या पुर्ण चेह-यावर पसरलेल.  तीच भयान हास्य काळजाचा थरकाप उडवत होत. आजोबांनी जोरात तीला बाहेर ओढायला सुरवात केली तसे सोबतच्या लोकांनीही तीला खेचायला ताकत लावली... तशी ती जोराने किंचाळली,
" तुमच मराण तुमास्नी हीथ घीऊन आलय..." डोळे विस्फारून सर्वांकडे पाहु लागली जशी ती एका एकाला कच्चा खाऊन टाकेल... झटकन तीन मागे एका हातान ते झाड पकडल आणि या सर्वाना आत खेचू लागली तसे ते सर्वजन तीच्याकडे ओढले जाऊ लागले, एक लहान मुलगी पंधरा ते सोळा पुरूषांना भारी पडत होती. पण हे सर्व पिशाच्य करत होत.  आजोबांनी अंगातली सारी शक्ती एकवटली. तीच्या रक्ताळलेल्या डोळ्यात डोळे घातले
आणी ओरडले..
" ए सैताना, काय वाटल तुला. तु माज्या पोरीच लचक तोडून खायाला म्या पैदा केलय व्हय तीला, हे चामुन्डा देवी धाव ग....धाव." 
आजोबांच्या आवाजान सार गगन भेदल, तोंडावर बांधलेला फेटा काढुन तीच्या चेह-यावर टाकला आणी झटकन तीचा दंड पकडला.. एखादी शक्ति अंगात संचारावी तसा सगळ्यांनी जोर लावला आणि एका झटक्यात तीला बाहेर खेचल.ती किंचाळू लागली, हात झटकून पळायचा प्रयत्न करत होती. पण आता ते शक्य नव्हत.. सर्व गावच्या दिशेने धावत सुटले आणी मागे पडत चाललेल्या ' भुताच्या जाळीतुन ' गगनभेदी किंकाळ्यांनी सार जंगल हादरून जाऊ लागल... सर्वांचच काळीज भितीन धडधडत होत... पन आता गावचा रस्ता दिसु लागलेला... आजोबा सर्वांना म्हणाले..
" कुणीबी माग बगु नका...कोंबड आरवायला थोडाच यळ -हायलाय, हीतन भाइर पडा लवकर"
हातातील मशाली धरून गावाच्या दिशेन निघाले. त्या रात्रि पहाटे सर्व परतले ते गावच्या हद्दीत आले आणि कोंबडे आरवले....
     सगळे जन तसेच धावत देवळात पोहोचले, गुरव अजुन देवी समोर बसुन मंत्र पुटपुटत होते... आजोबानी आपल्या मुलीला देवी समोर ठेवली तसे सर्वानीच देवीपुढ लोटांगन घातल... तीच ओरडण, किंचाळण सार काही थांबलेल..
गुरव शांत पने म्हणाले...
" तुझी मुलगी गावात आलीच नव्हती.. तीला त्या पिशाच्च्याने जंगलातूनच आपल्या सोबत नेल होत..."
आजोबांनी आपल्या मुलीच्या तोंडाभोवती गुंडाळलेला तो फेटा काढला.. ती डोळे बंद करून पडली होती, शांत. स्थीर... सकाळी तीला जाग आली... पन जे घडल त्यापैकी तीला काहाच आठवत नव्हत... सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला...
... अशा त-हेने एका भीषण युद्धाचा अंत झाला....
समाप्त..
story by sanjay kamble 
      तुम्हला ही स्टोरी कशी वाटली ते आम्हला कॉमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा 

0 comments: