पुजा त्याच्या जवळ जात तोंडावर पाणी मारत उठवु लागली... नंदामावशी चौकटी बाहेर ऊभी सर्व पहात होती.. सुमित झोपलेल्या ठिकाणी डाविकडील भिंतीवर एक अस्पष्ट सावली उमटताना त्यांनी पाहीली...
"पुजा... थोड काम आहे, लगेच येते..." नंदा मावशी बाहेर पडल्या तसा पुजान डॉक्टरांना फोन केला ...
सुमितची परिस्थीती बघता त्याला रुग्णालयात दाखल करुन घेतल... डॉक्टरांनी सर्व टेस्ट करून पाहील्या पन निदान लागत नव्हत...
रात्रभर हॉस्पिटल मधे बसुन ती सुमित ला दरवाजा वर लावलेल्या काचेतुन पहात आश्रु ना वाट करुन देत होती... टीsss टीsss टीsss आवाज करणारी हॉस्पिटल मधली उपकरण न्यहाळु लागली तोच अचानक तीच्या अंगावरुन सर्रर्रर्रर्र कन काटा आला... पुजाच लक्ष त्या काळसर आकारावर गेल.. फिक्कट होता होता गडद्द होत चाललेली तीच सावली.. थोडी. अस्पष्ट झाली पण अस्थीर.. तीथ नाहीशी होत हॉस्पिटल च्या पांढ-या भिंतीवर दुसरीकडे उमटु लागली... आणि मग दिसेनाशी झाली..... पुजाला कळुन चुकल की हॉस्पिटल मधे त्याचा इलाज नाही होऊ शकणार... ती तशीच हतबल बेंचवर बसुन आपल्या सुखी संसाराची वाताहत पहात होती...

सकाळ झाली .. हॉस्पिटल च्या बेंचवर झोपलेली पुजा जागी झाली आणि सुमित च्या रुमकडे निघाली .. दरवाजा उघडाच दिसला... पुढ येऊन पाहील तर सुमित बेडवर बसुन पोहे खात होता... तो चक्क शुद्धीवर समोर नंदा मावशी बसलेल्या दिसल्या.. सोबत दोन मोठ्या बैगा होत्या...
केस नीट बांधत पुजा म्हणाली..
" मावशी...कुठे बाहेर जात आहात का...?"
" बाहेर तर जायच आहे.... पन मला नाही तुम्हाला...."
" म्हणजे..." पुजा थोडी अस्वस्थ झाली... तशा गंभिर आवाजात मावशी म्हणाल्या...
"तुझ्या सास-यांची तब्बेत बिघडली आहे... तुम्हा दोघानाही निघाव लागणार आहे..."

सुमितला थोड बर वाटत होत त्यामुळे नाईलाजाने डॉक्टरांनी काही precaution घेण्याच्या सुचना देत डिस्चार्ज दीला..
डोंगर उतारावरून एक पांढ-या रंगाची इंण्डिका गाडी सामान्य वेगात धावत होती. दिवस पावसाळ्याचे होते त्यामुळे अधुनमधून पावसाच्या तुरळक सरी येतच होत्या. हिरव्यागार झाडांनी वेली- फुलांनी डोंगर व्यापुन टाकलेले. दुरवर कड्या-कपारीतुन पांढरा शुभ्र पाण्याचा खळखळणारा झरा दिसला तस तीच मन भरून आल... बाजुला डोळे बंद करुन पडलेल्या सुमित कडे पाहुन तीचे डोळे पाणावले... त्याचा चेहरा निस्तेज पांढरा पडलेला... डोळे खोलवर गेलेले . एखाद्या दुर्धर , दिर्घ आजाराने ग्रासलेल्या रूग्णासारखी त्याची अवस्था झालेली ती ही मागील एक दोन आठवड्यात...
सुमितच बोलण, हसण, रागावण आणी प्रेमाने पुन्हा जवळ घेण...सार काही आठवत होत... घरच्यांचा विरोध झुगारून त्यान पुजा सोबत लग्न केल...वडिलांनी बाहेर काढल.. गाव सुटल.. रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली... आता दोघांनाच एकमेकाचा आधार होत.. पुजा आणि सुमितचा संसार खुप छान चालला होता... पण त्यांच्या सुखी संसाराला कोणाचीतरी नजर लागली..
तीच्या डोळ्यातील आसवे पहात नंदा मावशी म्हणाल्या....
तीच्या डोळ्यातील आसवे पहात नंदा मावशी म्हणाल्या....
" काळजी नको करू... "
नंदामावशीनी सांगितल्या प्रमाणे सारी ऊत्तर तीला सुमित च्या गावी जाऊनच भेटणार होती.. गाडीच स्टेअरिंग सांभाळत पुजा काचेतुन आजुबाजूला पहात होती. भल्या मोठ्या विशाल डोंगरात कोणीतरी लपुन बसलय आणि आपल्या वर झडप घालण्याची संधी शोधत असल्यासारख वाटत होत, जसा हिंस्त्र श्वापद आपल्या सावजाकडे आधाशासारख पहात आहेत.. रस्त्याकडेच्या खोल द-यांमधुन वर सरकणार धुक, घनदाट जंगल, भयान जीवघेणी शांतता तीच्या मनाची बेचैनी आणखीनच वाढलत होती.... पन तीच जाण अपरिहार्य होत...
त्यांची गाडी गावात आली तेव्हा सायंकाळ झालेली.. आसमंत गर्द काळ्या ढगांनी व्यापुन टाकलेल . एका भिषण वादळाची चाहुल लागावी तशी जिवघेणी शांतता त्या वातावरणात जाणवत होती... गाडी थांबलेल्या ठिकानापासुन उजवीकडे ग्रामदेवतेच मंदिर होत.. मंदिराच्या बाजुला एक मोठा वटवृक्ष होता... हात जोडत पुजा गाडीतुन उतरत म्हणाली...
" देवा.... आम्ही तुझ्या सावलीत आलोय... तारायच की मारायच तुच ठरव..." सुमित ला जागं करत तीघे चालत घराजवळ आले...
" देवा.... आम्ही तुझ्या सावलीत आलोय... तारायच की मारायच तुच ठरव..." सुमित ला जागं करत तीघे चालत घराजवळ आले...
सुमित च घर तस प्रशस्त पन जुन्या पद्धतीच होत.. छोटस अंगण, बाहेर तुळशीकट्टा, तीन चार पाय-या नंतर मोठा लाकडी दरवाजा...
सुमित ला पहाताच त्याचा भाऊ धावतच बाहेर आला.. " दादा ... काय र अस झालय तुला..."
सुमित ला आधार देत आत घेऊन गेला पुजा आणि मावशी ही पाठोपाठ गेल्या...
सुमित ला पहाताच त्याचा भाऊ धावतच बाहेर आला.. " दादा ... काय र अस झालय तुला..."
सुमित ला आधार देत आत घेऊन गेला पुजा आणि मावशी ही पाठोपाठ गेल्या...
रात्र झालेली... बाहेर बैठकीच्या खोलीत सर्व बसलेले पन कोणी शब्द ही बोलत नव्हत. बल्बचा मंद पिवळसर प्रकाशाभोवती चिलट गरगर फिरत होतीत. समोरच्या दरवाजा तुन दिसणारा लख्ख काळोख पहात सुमित एका खुर्चीवर मागे डोक टेकुन शांत बसुन होता... वडिल बरे होते. आणि खोट बोलुन आपल्याला इथवर आणल याचा राग मात्र सुमित च्या मनात होत... पन सुमित च्या आजारपणाबद्दल इकडे कोणाला काही कल्पना नव्हती... वडिल मात्र त्याची ही अवस्था पाहुन खुप अस्वस्थ झालेले... पुजा खाली चटई वर बसलेली तर सुमित ची आई त्यांच्या समोर काही अंतरावर असलेल्या लाकडी 'माच्या' वर बसुन संतापाने पुजा ला पहात होती.
" मला ह्या औदसेच तोंड पन बगायच न्हवत तरी बी का आनलस हीला... मला पुन्यांदा ह्या गुष्टीवर वाद घालायचा न्हाय... उद्या कोंबड आरवल की तुमी निगायच.." संतापाच्या भरात आई बोलली..
सुमित तसाच शांतच होता.. आणी पुजा काही बोलणार तोच नंदामावशी म्हणाल्या...
" ते स्वता:हुन आलेले नाहीत.. त्यांना येण भाग पडलय... "
वडिल मात्र त्याची अवस्था पाहुन पुरते हादरुन गेलेले... ते ताडकन उठले आणि काही न बोलता घाईघाईत बाहेर पडले... त्यांच्या मागे सुमित ही निघाला पन अशक्तपनामुळे तो जमिनीवर कोसळला... तशी पुजा त्याला सावरायला धावली... "काय अवस्था करून टाकली माझ्या पोराची ...ह्या सट्टवीन.." आई बडबड करतच होती...
मध्यरात्र होऊन गेलेली तरी वडील अजुन परतले नव्हते... सुमित असह्य वेदनेने कण्हत जागाच होता आणी त्याच्या जवळ काळजी घेत पुजा ही तशीच बसुन होती... आई दारात ऊभी वडिलांची वाट पहात होती., धावतच वडिल परतले... हताश , असहाय, पुर्णपणे हतबल झाल्यासारखे ते आत येऊन लहान मुलासारखे रडत ते जमिनीवर कोसळलेच...
आईलाही हुंदका आला... काळजीच्या स्वरात ती विचारु लागली.
" आव... काय झालय... आस हातपाय घळुन गेल्यावानी का बसलायसा. आण यवढ्या घईत कुठ जाऊन आलासा...."
" आव... काय झालय... आस हातपाय घळुन गेल्यावानी का बसलायसा. आण यवढ्या घईत कुठ जाऊन आलासा...."
भरल्या डोळ्यांनी बेडवर पडलेल्या सुमित कडे पहात म्हणाले
" देवळात जाऊन आलो.... ( दोन्ही हातानी मस्तक पकडत म्हणाले) स........स.......सपल सगळ....." बोलताना त्यांची जिभ अडखळु लागली...
त्यांची अवस्था पाहुन पुजाला हुंदका आवरण कठीण झाल... "बाबा....काय झालं हो.."
" देवळात जाऊन आलो.... ( दोन्ही हातानी मस्तक पकडत म्हणाले) स........स.......सपल सगळ....." बोलताना त्यांची जिभ अडखळु लागली...
त्यांची अवस्था पाहुन पुजाला हुंदका आवरण कठीण झाल... "बाबा....काय झालं हो.."
ते काही बोलणार तोच घरघरणा-या आवाजाने सर्वच हादरून गेले... सर्व श्वास रोखुन तो आवाज ऐकु लागले.. रात्रीची निरव शांतता भेदत एक विचित्र भयान घरघरणारा आवाज आला...
" तुच संपवलस सगळ... स्वताच्या हातानी..."
" तुच संपवलस सगळ... स्वताच्या हातानी..."
तीघेही त्या आवाजाच्या दिशेन पाहु लागले..
मजघरात पसरलेल्या अंधुक प्रकाशात जमिनीवरून एक सावली हळु हळू बाहेर सरकत येऊ लागली... कोणीतरी बाहेर येत असल्याच जाणवू लागल..
" क....कोण हाय ते.." भितीन थरथरतच आई न विचारल. तसे ते मजघरातुन दरवाजाच्या चौकटीत ऊभ राहील...
विस्कटले काळे पांढरे केस, कपाळावर गडद्द काळ कुंकू, हिरवेगार डोळे, गडद्द काळ्या रंगाची साडी , मनगट भरुन घातलेल्या काळ्या बांगड्या . पांढरी निस्तेज सुरकुतलेली त्वचा जी हाडांच्या सापळ्याला चिकटलेली होती...

एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखा घरघरणारा तो भिषण आवाज ऐकताच आई ची दातखिळीच बसली त्या जागेवरच बेशुद्ध झाल्या... वडिल थरथर कापत जमिनीवरच बसुन समोर पहात होते...पुजा तर डोळे सताड उघडे करून ते अमानवीय दृष्य पहून हादरुन गेली होती...
" नं.....नंदा मावशी..." पुजाच्या तोंडातुन शब्द बाहेर पडले तशी त्यांनी आपली मान गर्रर्रर्रर्रर्र कन मागे वळवली... धड जागेवरच पन मस्तक १८०° कोनात मागे वळल होत... ते अमानवीय हिंस्त्र श्वापद बेडवर तळमळत असलेल्या सुमित ला आधाशासारख पाहु लागल... पांढ-या सुरकुतलेल्या चेह-यावर सैतानी हास्य आणि त्या हिरव्या डोळ्यांमधे शिका-याला आपल सावज गवसल्याची आणि त्याच्यावर झडप घालण्याची व्याकुळता स्पष्ट दिसत होती... त्यान आपला उजवा हात पुढ करायला सुरवात केली तसा तो लांब आणखी लांब होत पंधरा फुट अंतरावरील सुमित पर्यंत आला... पुजाच्या सर्वांगावर भितीने काटा येत होता... त्या अमानवीय दृष्याने तीच्या तोंडातुन बाहेर पडणारी आर्त किंकाळी तोंडातच दबून गेली होती... लांबसडक बोटं पांढरी आणी लालसर काळी पडलेली नख आता सुमित च्या चेह-यावरून फिरत होती.. पुजान तो हात झटकण्याचा प्रयत्न करताच त्या श्वापदाने भयंकर संतापाने पुजाकडे पाहील आणी जोराचा हिसडा मारला तशी पुजा बेडवरून खाली आदळत मागे भिंतीपर्यंत फरपटत गेली....
सुमितच्या वडिलांनी थरथर कापत त्या सैतानाचे पाय धरत आपल्या मुलांच्या प्राणांची भिक मागीतली... ते लहान मुलासारखे रडत होते... तसा त्यांना जोराचा हिसडा दीला ते ही दुरवर फरपटत गेले... पुजा तळमळत होती रडत होती किंचाळायचा प्रयत्न करत होती पन तीचा कंठ फुटत नव्हता..

....to be continue
story writer-sanjay kamble
काय होईल आता सुमीत बरोबर ? सुमीत त्या वाईट शक्तीचा सामना करू शकेल बघुया आपण पुढच्या भागात.
Nice story
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteoo waw apne bahut hi achha likha he, mene yeh article ko pura man se padha or muje bahut hi achha laga, mene bhi apke hi tarah royal Marathi names for girl ke liye likha he
ReplyDelete