प्रपोज. propose marathi horror story part-7

नमस्कार...... आत येऊ का.....?" मी केबिनच दार उघडत विचारल...
" हो.... या ना.... बसा..." मला आत बोलवल आणी आपल्या हातातले रिपोर्ट पाहू लागले... अगदीच छान एसी केबीन होती.. समोर 
Propose story
टेबलवरच्या जाड आणी रूद काचेवर हाथ ठेवत माझी नजर डॉक्टरांच्या खुर्चीमागच्या शरीररचनेच्या आकृतिवर स्थिरावली... काय काय साहीत्या फिटींग करतो परमेश्वर...
" बोल.... काय मदत करू तुझी....? " रिपोर्ट खाली ठेवत म्हणाले
"मला ओळखल असेल तुम्ही...?" त्यानी किंचीत भुवया आकसुन पाहल आणी डोळ्यांवरचा चश्मा काढत टेबलवर ठेवला....
"हो..... ओळखल.....त्या वेड्या मुलीचा मित्र ना..."
" तीला वेडी कशावरून ठरवलत....?"
" तीला मरणयातना होतात... अंग जळाल्यासारख्या वेदनेन ती तडफडते... पन तीच्या सर्व चाचण्या केल्या .. सर्व नॉर्मल..."
" म्हणजे तुम्ही एखाद्या आजाराच निदान करू शकला नाहीत तर तो पेशंट वेडा ठरतो.... असच ना..."
"एकदा तीनं एका कर्मचा-यावर हल्ला केला होत... आणी स्वता:च्या भावावरही.. अशा पेशंटची जागा मेंटल हॉस्पीटलच असते..."
" पन हे तीच्याकडून कोणीतरी करवून घेत असेल तर..?"
" तुला काय म्हणायच आहे....?" ते जरा रागातच म्हणाले..
" ती वेडी नाही.... ती जे भोगतेय ते दिसत नाही पन तीला त्या वेदना होतात... आणी ते खर आहे...."
" ओह..... म्हणजे भुत...? लुक मिस्टर ...?"
" संजय...."
" हा संजय.... या फालतु गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही..... मेडीकल सायंन्स किती प्रगत झालय आणी तुम्ही आजची पिढी या मुर्ख गोष्टींवर विश्वास ठेवताय..."
" सर.... तुमच्या मागे जे शरीराच्या आतल्या रचनेच मॉडेल लावलय.... कधी त्याला नीट पाहीलय..."
" हो अगदी व्यवस्थीत...... त्यातच टॉप केलाय...."
"मला सांगा... किडनी कुठ असते....? हार्ट.....? लिव्हर.......? नेक बोन....? ब्रेन......?"
डॉक्टर एकाएका प्रश्नाच उत्तर देऊन भयंकर संतापले....
" संजय...... नेमक काय म्हणायच आहे तुला....?"
" सर तुम्ही संपुर्ण शरिराचा अभ्यास केलाय पन मग याच शरिराला उभ करणारा आत्मा नेमका कुठ असतो हे सांगु शकाल...? खुपसारे कृत्रिम अवयव मेडिकल सायंन्स ने तयार केलेत पन तुम्ही कृत्रीम आत्मा तयार करू शकाल जो माणुस मेल्यानंतर त्याच्या शरिरात घातल्यावर तो पुन्हा जिवंत होईल...?"
डॉक्टर आवक होऊन माझ्याकड पहात होते....
" आणी हो.. सर...! प्रिया वेडी नाही..."
माझ्याकड पहात त्यानी एक कार्ड काचेच्या टेबलवरून पुढ सरकवल.... मी ते कार्ड उचलुन पाहात वरच्या खिशात घातल..
" Im Sorry sir... जर तुम्हाला राग आला असेल तर..."
एवढ बोलुन मी बाहेर पडु लागलो ते मात्र विचार करत त्या शरीररचनेच्या आकृतिकड पहात राहीले....
*****
कार्ड वर एक पत्ता आणी नंबर दिलेला... मी तो नंबर डायल केला तशी समोरून एका महीलेचा आवाज आला... मी विचारलेली माहीत त्यांनी सांगितली . मला रात्र अशीच वाया घालवायची नव्हती. घरी परतलो आणी किरकोळ साहीत्या बैगेत भरल...
"पुजा... बाहेरगावी जातोय.... उद्या येईन..."
ते मिरज च्या हॉस्पिटलमधे नव्हते गेले... कोल्हापुरजवळच एक मोठे मानसोपचार तज्ञ होते... गाडी त्या दिशेने धावत होती तशी रात्रही आणखी गडद्द होत असल्यासारख वाटु लागल... थंडीच्या दिवसात नितळ चांदण ओढुन येणारी रात्र आज कोळोखान माखली होती जणु काळ्याकुट्ट अजगरासारख्या सावल्या त्या आकाशातील चांदण्या गिळंकृत करत पुढ सरकत होत्या... रात्रीचा गार वारा अंगाला झोंबत होता, पन वेग कमी करून चालणार नव्हत.. प्रत्येक क्षणाला मनावर एखाद दडपन होत कदाचीत मी या सर्वातुन दुर रहाव असा अप्रत्यक्ष संकेतच येत होता... रात्र बरीच झालेली साधारण आकरा वाजलेले, ते हॉस्पीटल समोर दिसत होत अगदी मणुष्यवस्तीपासुन दुरच, बरच लांब जस हायस्कुल असाव , समोर लोखंडी गेट आणी पाच सहा फुटांची भिंत... गाडी बाजुला घेत चालत गेटजवळ बनवलेल्या छोट्या खोलीशी आलो.. दुस-या मजल्यावरील काही खिडक्या बंद दिसत होत्या तर तीथच डाव्या बाजुच्या लोखंडी ग्रिल लावलेल्या उघड्या खिडकीतुन किंचीत प्रकाश येत होता, त्यातूनच डोकावणारी एक मानवी आकृति माझ्याकड पहात असल्याच जाणवल... त्या बंद गेटमागुनच वॉचमनला हाक दिली तस बाजुच्या कट्ट्याजवळून चालत डोक्याला मफलर गुंडाळलेली एक वयस्कर व्यक्ति समोर आली, साधारण साठी ओलांडलेली असेल. सावळा रंग , किंचीत बसक नाक, सुरकुतलेल्या चेह-यावर पांढरी खुरटी दाढी दिसत होती.. मला आणी मागे लावलेल्या बाईकला पाहू लागला..
" कोन पायजे....?" मला बघताच त्यांनी प्रश्न केला..
" डॉक्टरसाहेबांना भेटायच आहे...."
" सकाळी या.... मेन डाक्टर सकाळीच भेटणार...."
" सर.... खरतर मला एका पेशंटला भेटायच आहे... आज सकाळी आणलय..." मी चेहरा केविलवाणा करत म्हणालो..
" आता भेटायला परवानगी न्हाय र बाळ. उद्या ये..." शेवटी त्याच्या हातापाया पडून आत जायची परवानगी घेतली तीथ काम करणा-या एका मावशीसमोर हात जोडले
"फकस्त पाच मींट..."
त्यांनी मला एका रूमकडे नेल... स्त्री विभाग होता. बराच गोंगाट माजलेला... कोण जोरजोरात रडत होत तर कोणी किंचाळत होत... कोण गाढ झोपलेल तर कोणी नुसतच किलकील्या डोळ्यांनी आजुबाजूला पहात होत... अशीच एक रुम दिसली....
*****
दरवाजावर लावलेल्या काचेतुन आत पाहील आणी खळ्ळकन डोळ्यात पाणी आल... पांढरट रंगाचा गाऊन अंगात घातलेला, सार शरीर गोळा करून तीच मुसमूसन सुरू होत..
"प्रिया......." माझा आवाज ऐकताच तीनं झटकन वर पाहील... रुक्ष मोकळ्या केसांना चेह-यावरुन बाजुला करत त्या छोट्याशा बेडवरून ती उठुन बसली... मला समोर पाहुन तीला अश्रु आवरेनासे झाले, बेडवरून खाली उतरुन चालत पुढ आली... रडून डोळे लाल झालेले, माझ्यासमोर हात जोडून ती फक्त रडत होती पन निराशेन भरलेल्या तीच्या चेह-यावर एक समाधान दिसत होत...
" चल रे....... खुप झाला इमोशनल ड्रामा.... सकाळी ये....."
" मावशी सकाळपर्यंन्त मी जीवंत राहीन की नाही माहीत नाही हो... थोडा वेळ बोलतो आम्ही..."
प्रियान विनवणी केली तशा त्या मावशींनी हातातला टॉर्चचा प्रकाश तीच्या चेह-यावर पाडत म्हणाल्या...
" तुला आम्ही मरू देत नाही..."
मावशीचे शब्द कानावर पडले तस मी प्रियाकड पाहील... हातानेच खुण केली... ' काळजी नको करूस... मी आहे तुझ्यासोबत.'
तीलाही खुप बर वाटल... आणी माझी नजर तीच्या मागील खिडकीवर गेली... त्या खिडकीच्या पलिकडे कोणीतरी ऊभ होत .
कदाचित पलिकड दुसरी रुम असावी...
" हा महिलांचा वार्ड आहे ना....?" शंका वाटली म्हणुन मी त्या मावशीला विचारल
" हो .... फक्त स्त्रीया मुली आहेत इथ...."
"मग पलिकडच्या रूम मधे तो मुलगा काय करतोय..." तस प्रिया माग पाहु लागली... पन तोवर तो मुलगा तीथुन गेला होता...
" तीथ मुलगाच काय पण कोणाची सावली पन पडु शकत नाही..." ती मावशी जरा अतीआत्मविश्वासुच वाटली....
" हो का..... ते कस....?"
" सांगते.... प्रिया..... ती खिडकी उघाड...." मावशीचा आदेश येताच प्रिया माझ्याकड थोड भयभीत नजरेन पहात खिडकीच्या दिशेन चालु लागली.. मावशी मात्र भलत्याच आत्मविश्वासात होती.. खिडकीपाशी पोहोचल्यावर तीन फिरून आमच्याकड पाहील
" काही नाही होणार. उगाच कशाला घाबरतेस..?" मावशीच्या आवाजात थोडा राग होता जशा त्या खेकसत होत्या.. प्रियान खिडकीची कडी सट्ट कन खाली खेचली आणी कुईईई आवाज करत ती खिडकी उघडली.. आणी मी समजुन गेलो की पलीकडे रूम नाही तर हीच शेवटची रुम होती, दुस-या मजल्यावरची . आणखी एक एक लक्षात आल की आत येतान खिडकीत दिसलेली आकृती याच रुममधे होती..
" प्रिया... जाऊदे ..मला भास झाला असेल..."
पन ती खिडकीमधे पाठमोरी उभी शांतपने बाहेर पहात होती... मी पुन्हा हाक दिली पन काहीच प्रतिसाद येईना.. तोच एक थंड हवेचा झोका खिडकीतुन आत शिरला तसा सर्रर्रर्रर कन अंगावर काटा आला...
प्रिया म्हणुन मी जोरात ओरडलो तशी ती खिडकी जवळून मागे सरकली आणी पुन्हा घाईघईने खिडकी बंद करून धावत दरवाजाकडे आली...
" तोे मला ठार मारून टाकणार..मला इथुन बाहेर काढा..प्लिज..." ती आमच्या समोर भितीन रडू लागली..
" कोण तो..... कोण मारणार तुला....?"
" तो...... माझ्यावर प्रेम करायचा...."
" तुला काही नाही होणार... मी उद्या डॉक्टरांशी बोलतो..." बोलता बोलता माझी नजर मागे खिडकीवर गेली...त्या पारदर्शी काचेतुन आकाशातील क्षितीजाकडे झुकत जाणारे चंद्रबींब हळुवारपने काळ्याकुट्ट ढगांच्या कवेत सामावून जाऊ लागल. तोच कुईईईईईई असा दिर्घ आवाज करत खिडकी हळुवारपने उघडत होती... प्रियानही आवाज स्पष्ट ऐकला पन मागे पहायची तीची हिम्मत होईना... ती दरवाजावर हात बडवु लागली...
"प्लीज मला बाहेर काढा...प्लिज.."
माझी नजर मात्र प्रियाच्या आठ दहा फुट मागच्या त्या खिडकीवर स्थिरावली . खिडकी बाहेर वरच्या बाजुला कसलीशी हलचाल दिसु लागली.. काहीतरी उलट लटकत होत जे वरूनच आत डोकावत होत... आणी इतक्यातच रूममधील भिंतीवरचा पांढरा बल्ब चर्रर्रर्रर्र चर्रर्रर्रर्रर्र आवाज करू लागला.. आम्हा तिघांची नजर त्या बल्बवर स्थिरावली तसा फट्टकन आवाज आला आणी बल्बच्या काचा सर्वत्र पसरल्या...
" काय बाई. ह्या बल्बला पन आत्ताच जायच होत... थांब रे इथच मी ऑफीस मधुन बल्ब आणते.." त्या मावशी चालत ऑफीसच्या दिशेन निघाल्या.. तसा मोबाईलचा टॉर्च ऑन करत मी प्रियाला धीर देऊ लागलो.. ती पुर्ण खचली होती, त्रासली होती. या अमानुष यातनांनी पिचली होती.. वाईट एवढच वाटत होत की मी फक्त धीरच देऊ शकत होतो..
तीच्यासोबत बोलताना माझी नजर पुन्हा खिडकीवर गेली तस वरच्या दिशेन एक काळी गडद्द आकृती सरपटत त्या रुममधे प्रवेश करू लागली..
भितीने माझ्या अंगावर शहारा आला... प्रियाला सांगितल तर ती काय होईल या विचारानच मी सुन्न झालो...
"प्रिया तु घ...घाबरू नको... मी स.. सोडवतो तुला इथुन... " माझ्या आवाजातही कंप सुटला... मी ऑफीसच्या दिशेन पाहील आणी जोराची हाक दिली...
"मावशी लवकर या..." आणी पुन्हा समोर पाहील तसा भितीन घाम फुटला... डोळे विस्फारले. त्या खोलीत प्रियाच्या अगदी हातभर अंतरावर एक काळी गडद्द सावली उभी होती... काळीकुट्ट धुसर ती आकृतीच्या चेह-यावरील लालसर डोळ्यांसारखे दोन ठिपके जसे माझ्यावरच रोखले होते... प्रिया दरवाजावर डोक टेकून खाली पहात मुसमूसत होती ..
"मावशी ..... या लवकर...... " मी पुन्हा हाक दिली तशा मावशी झपाझप पावले टाकत येऊ लागल्या... त्या आकृतीने आपले दोन्ही हात हवेत पसरले आणी प्रियावर झडप घालणार तोच मावशी दरवाजाच कुलूप उघडू लागल्या... घाईघाईत कुलूप काढून दरवाजा उघडला तशी ती सावली कुठतरी नाहीशी झाली...
मी उंच हाताने तो बल्ब बसवला तशी रूम पुन्हा पांढ-या एलएडीच्या प्रकाशान उजळून निघाली... प्रिया कड ती कोप-यातल्या छोट्याशा बेडवर गुडघ्यात मुंडक खुपसुन बसलेली, लांब विस्कटलेल्या तीच्या रूक्ष केसांनी चेहरा पुर्ण झाकला गेलेला.. अगदी शांत.. मघापासुनच रडण, मुसमुसन सार बंद झालेल...
"प्रिया.....?" मी तीला हाक दिली तस आपल्या उजव्या हातच एक बोट बेडवरील बेडशीटवर वेडवाकड फिरवु लागली जशी ती एखादी आकृती काढतेय...
" प्रिया.... बर वाटतय ना....?"
मी पुन्हा विचारल तशी आपल्या बोटाची हलचाल थांबवली पन मुंडक तसच गुडघ्यांमधे खुपसलेल... हळुच ते बोट आपल्या तोंडात घातल .. मी आणी मावशी तीच्याकड पहातच होतो तोच खट्टकन आवाज आला... आम्ही दोघेही तीची गुढ , शांत हलचाल पहात होतो तस तीन शांतपने तोंडात घातलेल बोट बाहेर काढल तर त्याला रक्ताची धार लागलेली... ते बोट तसच बेडशीटवर फिरवू लागली... आर्ध बोट तीन दातांनी तोडल होत , त्यातून भळाभळा येणा-या रक्ताची धार लागलेली
मी धावतच तीच्याकड गेलो तीच बोट दाबून धरत रक्त थांबवायचा प्रयत्न करू लागलो...
" मावशी .....डॉक्टरांना कॉल करा आणी firstadd बॉक्स आणा.... लवकर...."
तशा त्या पुन्हा ऑफिसकडे धावल्या...
" प्रिया.... काय करतेस हे.....?" मी बोट दाबुन धरतच म्हणालो तस मघापासुन गुडघ्यात खुपसलेल मुंडक वर काढत तीन माझ्याकड पाहील... अर्ध्या चेह-यावर विस्कटलेले केस पसरलेले , पांढरे विस्फारलेले डोळे माझ्यावर रोखलेले तर तोंडातुन ओघळणारी रक्ताने माखलेली लाळ हनुवटीवरून गळ्यावर पसरलेली..तोंडात काहीतरी चघळत जबडा हळूवारपने हलवत होती
तीची अवस्था पाहुन डोळ्याच्या कडा नकळत
पाणावल्या आणी संतापही आला त्या क्रुर पिशाच्चाचा.... तिच्या विस्फारलेल्या डोळ्यात पहात म्हणालो..
" का इतक्या यातना देत आहेस तीला ....? हेच का तुझ प्रेम...? जीच्यावर स्वतापेक्षा जास्त प्रेम कराव, जीला आपल सर्वस्व मानाव, जीच्या पायात काटा रूतला तर आपल्या काळजात कट्यार उतरल्याच्या यातना व्हाव्या त्या मुलीची अशाी अवस्था करून तीच्यावरच आपल प्रेम सिध्द करतोय का....?"
माझ बोलण ऐकताच ती जोरात समोरच्या भिंतीवर थुंकली तस तीच्या तोंडातुन लाल रक्तासोबत निघालेला तुकडा भिंतीवर आपटुन गोल गोल फिरत कोर-यात स्थिरावला. दातांनी तोडलेला स्वता:च्या बोटाचा तुकडा डोळे विस्फारून पहात म्हणाली....
" प्रेम......? हं...." हसत तीची क्रुर नजर माझ्यावर स्थिरावली... तीच्या आवाजात घरघर वाढली
" प्रेम आहे म्हणुन तर सोबत न्यायला आलोय.." आणी ती क्रुरपने हसु लागली 
....to be continued 
Next part
Story by sanjay kamble

0 comments: