प्रपोज़. Propose marathi horror story part-8

आवाजात घरघर वाढली
" प्रेम आहे म्हणुन तर सोबत न्यायला आलोय.." आणी ती क्रुरपने हसु लागली
" तीच्या मनात नसताना...? " मी ही त्या क्रुर नजरेला नजर भडवली... तसा तीच्या
चेह-यावरचे भाव आणखी रागीट होऊ लागले... घरघरत्या आवाजात झटकन आपला चेहरा माझ्या चेह-याजवळ आणत म्हणाली
" माझ प्रेम आहे ना तीच्यावर... आणी जे मला आवडत ते मिळवतोच.... मग त्यात कोणाची मर्जी असो वा नसो..... समजलास... " आणी दिर्घ श्वास आत घेत वर छताकडे पहात डोळे विस्फारून बेशुद्ध होत बेडवर पडली.. मावशी धावतच आत आल्या... तीची जखम स्वच्छ करून पट्टी बांधली तशी पुन्हा शुद्धीवर आली , पन यावेळी बोट तुटल्याने झालेल्या जखमेन तीला भयंकर वेदना होत होत्या ... रडत कण्हत बेडवर पडून ती आपल्या यातना सहन करत होती... तीला धीर देता देता मला गहीवरून येत होत... तीच्याकड पहात मावशींना विचारल...
Proposed story

"डॉक्टरांना फोन केलात....?"
" हो.... उद्या सकाळीच शॉकट्रीटमेंटसाठी घेऊया म्हणालेत..."
" शॉक ट्रिटमेंट.....? " त्यांच बोलण ऐकताच मला धक्का बसला...
" हो.... तीला बेडसोबत बांधुन ठेवायला सांगीतलय आणी तु ही जा आता...." तशी त्यांनी सोबत आणलेली इलास्टीकची पट्टी बाहेर काढली... मी प्रियाकड पाहील, हतबल असहाय्य पने डोळ्यातुन घळाघळा अश्रु येत होते... आपला जखमी हात एका हाताने दाबून धरत मला म्हणाली,
" संजु..... जा तू.... जे नशीबी लिहीलय ते भोगायलाच हव.... तु वाईट वाटुन घेऊ नको..."
ती हुंदके देऊन रडु लागली तशा हातातला बेल्ट घेऊन मावशी पुढ आल्या...
" मावशी...... प्लीज...... ती भोगतेय त्या यातनही खुप आहेत आणखी त्या जिवाला देऊ नका हो... प्लीज... थोडा वेळ द्या... तीला या अवस्थेत सोडुन जायची हिम्मत होत नाही हो..." मी हाथ जोडुन विनंती करत होतो तशा आम्हा दोघांकडे पहात त्या म्हणाल्या..
" प्रेम करतोस तीच्यावर....?"
" न..... नाही.... मित्र आहे फक्त...."
" दिसतय ते....... जखम झालीये तीला, आणी त्रास होतोय तुला....हं... ठीक आहे मी आहे बाहेर..."
बोलुन त्या बाहेर पडल्या तस मी प्रियाकड पाहील...
" घाबरू नकोस.... काहीतरी उपाय शोधेन मी..."
माझ्या बोलण्याचा काहीच फरक तीच्यावर पडला नाही कदाचित तीला आपला शेवट दिसला होता... कारण त्या खोलीत आमच्या व्यतीरीक्त कोणीतरी होत जे प्रियाला अस तळमळताना पाहुन खुश होत त्याच्या खदखदण्याचा मंद आवाज या भिंतींमधे घुमू लागला....
" उद्या सकाळी पौर्णीमा संपण्याआधी तो तीला सोबत नेईल...."
प्रियाच्या रुमसमोरच्या एका अंधा-या खोलीतुन कुण्या वयस्क स्त्रीचा आवाज आला...
" ए काळ्या जिभेचे...... तोंड बंद कर नाहीतर उद्या तुलापन करंट देईन....."
आपल्या खुर्चीवरूनच मावशी तीच्यावर खेकसल्या... माझी नजर त्या आवाजाच्या दिशेला स्थिरावली, आपली जखम दाबून धरत प्रिय बेडवरून उठली आणी दरवाजातुन दिसणा-या त्या खोलीकडे पाहु लागली..
त्या खोलीच्या गडद्द काळोखान माखलेल्या
कोप-यातुन कोणीतरी सावकाश पुढ चालत आल... आणी बाहेरच्या बल्बच्या किंचीत प्रकाशात तीचा चेहरा दिसला... एक साठी पासष्ठी पार केलेली वयस्क स्त्री समोर होती... केस बरेच पांढरे पडलेले, तीच्या चेह-यावरची पांढरी सुरकूतलेली त्वचा हाडांच्या कवटीला चिकटेल्या कागदाप्रमाणे वाटत होती इतकी बारीक ती म्हातारी , लांब पोपटाच्या चोचीसारख नाक, डोळ्यांवरच्या चष्म्याची एका बाजुची काच फुटल्याने कोष्ट्याच्या जाळ्यासारखी दिसत होती..
सुरकुतलेल्या चेह-यावर किंचीत हासु पसरताच तोंडातल्या बोळक्यातले दोन तीन दात पडलेल लक्षात आल.
" तुम्ही कोण..... आणी काय बोलताय....? " मी जरा रागातच म्हणालो... तसा बाजुच्या खुर्चीवर डुलकी घेत बसलेल्या मावशी म्हणाल्या,
" ती 'सुजाता' आहे.... तीला क्रुर भटकणारे आत्मे दिसतात म्हणे... आम्हालाच का ही भुत दिसत नाही काय माहीती....काय काय नमुने या हॉस्पीटल मधे भर्ति होतात....?" आणी पुन्हा खुर्चीवर डुलकी घेऊ लागल्या..
" जरा स्पष्ट सांगाल.....?" मी दबक्या स्वरात म्हणालो...
" तो हीला आपल्या सोबत न्यायला आलाय..." सुजातांचा गंभीर आवाज आमच्या दोघांच्या काळजातल उरलासुरला धीर ही संपवत चालला...
" तीला अशाच यातना देऊन पौर्णीमेला लागलेल ग्रहण संपण्याआधी ठार करेल.. तीचा आत्मा शरीरातुन बाहेर पडताच त्या आत्म्यावर कब्जा करेल आणी मग एका गुलामाप्रमाणे यातना देत राहील , वर्षानुवर्ष.. एक क्रुर लिंगपिसाट नराधम शेवटी हेच करू शकतो..."
" हे सगळ तुम्हाला कस माहीती... त्याच्या क्रुरपनाबद्दल...?"
प्रिया आश्चर्यान विचारू लागली... तस त्यांच्या चेह-यावर गुढ हास्य पसरल...
" त्याचा आत्मा तुझ्याभोवतीच घुटमळतोय.. अखंड बडबड करत या रात्रीच्या आधी तुझा अंत होईल हे सांगतोय..." त्या क्लिष्ट हास्यानंतर सुजाता एकदम शांत गंभीर आवाजात म्हणाल्या.
"त्यान 'प्रपोज' केलेल ना तुला...? तुझ शरीर हव होत त्याला... पन त्याला नकार ऐकण्याची सवय नव्हती ... आणी आपली झाली नाही म्हणुन तीला नरकयातनेन तडफडण्याची वेळ आणणारा क्रुरच असतो... आणी तो लिंगपिसाट आहे हे तुला चांगल माहीत आहे...."
सुजाता बोलता बोलता थांबल्या.
त्यांच बोलन ऐकुन प्रिया हादरून गेली...
" मी आता काही क्षणांचीच सोबती आहे रे... पन तुला सगळ सांगते..."
मी प्रियाकड प्रश्नार्थी नजरेन पहात होतो...
" हे वयच अस असत ना.... आपल्या मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवायचा. दंगा , मस्ती , आयुष्य मनमुरादपने जगायच... ....."
बोलता बोलता प्रियान माझ्याकडे पाहील...
" पन सगळच मनासारख होत नाही ना...?"
ती मागे फिरून आपल्या बेडवर बसत शुन्यात पहात म्हणाली
" 'संजय' नावाचा मुलगा माझ्या लाईफमधे आला आणी असच सार जग बदलुन गेल... मी कॉलेजची ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली तेव्हा तो आपल्या 'नगरसेवीका' आईसोबत गेस्ट म्हणुन आलेला.. उंच ,देखनाा, त्याच्या फिट्ट कपड्यातुन पिळदार शरीर स्पष्ट जाणवायच.. स्ट्रेट काळेभोर केस, खुरटी कोरलेली दाढी.. कुठलीही मुलगी सहज अॅट्रॅक्ट व्हावी असाच तो मला पाहताच माझ्या प्रेमात पडला.. खुपच उतावीळ स्वभावाचा एका दिवसात माझा मित्र बनला आणी दोन दिवसांनी मला 'प्रपोज' केल...."
प्रिया अगदी शांतपने बोलत होती...
" मग काय झाल....?"
तशी माझ्याकडे पहात म्हणाली
" मी नाही म्हणाले. कारण मी त्याला नीट ओळखतही नव्हते...आणी तिथच माझ आयुष्य बदलुन गेल... त्यान माझा पाठलाग सुरू केला... एकदा काही गुंडानी माझी छेड काढली तेव्हा त्यानच मला वाचवल... पन नंतर समजल की ते त्याचेच मित्र होते... मला आपल्या जाळ्यात खेचण्याचा प्लान होता. मी नाही बोलतेय हे त्याच्या पचनी पडेना...नाना शक्कल लढवत होता...असच एक दिवस एका मैत्रिणीन मला मेसेज करून कॉलेजच्या मागच्या इमारतीत बोलावल... कन्स्ट्रक्शन च काम बंद पडलेली ती इमारत पडीक झालेली...मी पोहोचले पन तीथ माझी मैत्रीण नव्हती ...."
"मग.......?" मी तीच्या खिन्न चेह-याकडे पहात म्हणालो..
" सर्वत्र शोधले पन कुठेच दिसत नव्हती ... मी मागे फिरले तसा मागे संजु तीथ उभा दिसला... त्याला पहाताच मी घाबरले.. माझा हात पकडून त्याने जवळ खेचले आणी प्रेमाचा होकार ताकतीच्या जोरावर मागु लागला..., अचानक घडलेल्या प्रकारान पुरती हादरून गेले... त्याला प्रतीकार करत होते पन त्यान माझ्यावर जबरदस्ती करायला सुरू केली..."
प्रियाला आता अश्रु अनावर झाले... पन आवंढा गिळत तीन डोळे पुसले आणी पुन्हा सांगु लागली...
" आमच्यात झटापट सुरू झाली, पन मी दुबळी ठरू लागले . त्यान मला जमीनिवर पाडल आणी माझ्या अंगावर झेपावला... माझ शरीर निर्दयीपने कुस्करत वासनेन भरलेल्या नजरेन आधाशासारखा पहात म्हणाला...
' काय औकात आहे ग तुझी. तुझ्यासारख्या कितीतरी पोरी वापरून फेकून दिल्या मी.. कारण मला जे आवडत ते मी मिळवतोच. मग ते समोरच्याच्या मर्जीने किंवा मर्जी विरूध्द..'
मी प्रतिकार करत होते ओरडण्याचा प्रयत्न करत होते पन माझ तोंड त्यान दाबुन धरलेल... वेदनेन मी रडत होते पन त्याला दया येत नव्हती ... त्या झटापटीत माझ्या हाताला एक लोखंडी सळी लागली, कदाचीत बांधकामातली असेल... जोराने त्याच्या मस्तकात घातली... तसा कळवळत माझ्या अंगावरून बाजुला झाला... मी रागान वेडी झालेेले.. एका मगुन एक प्रहार करत होते . तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर लोळत होता... मी तिथुन धावत बाहेर सुटले आणी तुटलेल्या चौकटीतुन पुन्हा मागे वळुन पाहील तर तो जमीनीवर पालथा पडलेला.. रक्तान माखलेल्या चेह-यावर धुळ, माती चिकटली होती
त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेल आणी तसाच रखरखत्या नजरेन मला पहात होता..."
" मग..... तु पोलीसात नाही कळवलस...?"
" पोलिसात...हं..... ज्या ज्या मुलींनी त्याच्या विरूध्द पोलिसात तक्रार दिली त्यांच घरातुन बाहेर पडणही संजयच्या मागे तुकड्यासाठी शेपटी हालवत फिरणा-या कुत्र्यांनी मुश्कील केल रे... एका मुलीन तर गळफास घेऊन आत्महत्या केली आणी राजकिय ताकत वापरून त्यान ती केस दाबून टाकली... पोलिस खिशात घेऊन फिरणारा युवा नेता होता तो.. हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेल.. आणी मी ही केस केली असती तर...? ही गोष्ट समाजातील त्या लोकांना समजली तर काय होईल...? त्या नराधमान एकदा रेप करायचा प्रयत्न केला पन या समाजातले नरपिशाच्च रोज , येता जाता, दिसेल तीथे वासनांध नजरांनी , काटेरी बोच-या शब्दांनी दररोज 'रेप' करत रहातील..''
"मग कॉलेजमधे.. घरी कोणाला बोललीस..?"
" नाही... मी रिक्शा पकडून घरी आले.. कुणाला काहीच बोलले नाही.... खुप रडले.. खोलीत एकटीला कोंडुन घेतल.. माझी निरागस स्वप्नांची राख , राख झाल्यासारखी वाटलीत... मी पंधरा दिवस कॉलेजला गेले नाही.. त्या इमारतीत कोणीच जात नव्हत... दोन चार दिवसात शहरातली काही भटकीा कुत्री त्याच प्रेत फरफटत रस्त्यावर आणुन फाडुन खात होते त्याच्या हातापायाची बोटे , चेहरा शरीर उंदरांनीही कुरतडून खाल्लेली आणी त्यावेळी सगळ्यांना समजल 'संजय' सारख्या राक्षसाचा खुन झालाय...."
ती काहीशी शांत झाली आणी पुन्हा बोलु लागली....
" मला वाटल सगळ संपल पन नाही , काही दिवसातच मला विचीत्र भास होऊ लागले. कदाचीत मानसिक धक्का बसलेल्याचा परिणाम असेल म्हणुन मी गप्प राहीले... पन ते भास जिवघेणे ठरू लागले... कोणीतरी शरीर आतुन कुरतडून टाकत असल्यासारख्या वेदना होऊ लागल्या..... स्वताःला इजा करून घेऊ लागले पन एकदा त्यान आपल अस्तीत्व दाखवुन दीलच .....''
ती ऊठली आणी माझ्या गळ्यात पडुन रडू लागली...
" जे केलस ते योग्यच होत... आणी तो आता जिवंत असता तर त्याही पेक्षा भयानक मरण मी त्याला दील असत.. आणी हो मी आहे तुझ्या सोबत 'जीव गेला तरी'...."
" या नावाचा मला तीटकारा आलेला , तीरस्कार वाटत होता... पन त्याच नावाचा एक छान मित्र भेटला तुझ्या रूपात, पन तु मला 'प्रपोज' केलस आणी मी हादरून गेले.... पुन्हा सगळ डोळ्यासमोर उभ राहील...आणी दुर राहु लागले.."
मी तीच्या डोक्यावरून हात फिरवत धीर देऊ लागलो
" तुला मित्र हवा ना.... मग आयुष्य आहे तोवर तुझा मित्र राहीन......"
तसा समोरच्या खिडकीतुन थंड हवेचा एक झोका अंगाला स्पर्श करून गेला तशी प्रिया शहारली. अचानक तीन मला जोराने मागे ढकलुन दीलं...
मी आश्चर्यान तीच्याकड पाहू लागलो... तीन आपली नजर भिंतीवरच्या बल्बवर नेली... चर्रर्रर्रर्रर्रर्र चर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज करत फट्टकन फुटला आणी त्या खोलीत पुन्हा काळोख पसरला झटकन तीन आपली मान माझ्याकडे वळवली तसे तीचे विस्कटलेले केस चेह-यावर पसरले... ती समोर ऊभी होती आणी तीच्या मागे खिडकीमधुन मावळतीला गेलेल्या चंद्राचा मंद प्रकाश तीच्यावर पडलेला पन त्यामुळे जमीनीवर पडलेली प्रियाची सावली वेगळी होती.... एक आक्राळ विक्राळ श्वापदाची सावली होती.... अचानक तीच्या आवाजातली घरघर वाढली..
" तीनं माझ प्रेम लाथाडुन टाकल आणी तुला चिकटचेय..." तीच्या रागीट चेह-यावर विचीत्र हास्य पसरल. माझ्याकडे पहातच ती उजव्या हाताच करंगळी तोंडात घालु लागली तसा मी पुढ धावलो... तीचा हात गच्च पकडुन धरला तसे एका झटक्यासरशी तीचे केस चेह-यावर आले...
"मावशी ....." मी जोरात ओरडलो तशी त्या खडबडून जाग्या झाल्या....
"बेल्ट घेउन या लवकर..."
" फक्त थोडा वेळ आणी इथ एक देह निश्प्राण होऊन पडणार...ही ही ही...."
"गप ग सट्टवे... काळ्या जीभेची सटवी.." मावशी त्या समोरच्या बाईवर ओरडत आत आल्या... प्रियान आपल्या रक्ताळलेल्या डोळ्यांनी माझ्याकड पाहील तशी माझ्या पायाखालची जमीन सरकली... मी तीचे हात घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत होतो पन विचीत्र हास्य करत तीनं माझा हात घट्ट पकडला.. एक राक्षसी शक्ति तीच्या शरिरात होती.. माझ्याकडे पहात तीनं माझा हात हळुहळू आपल्या जबड्याजवळ घ्यायला सुरवात केली तसा माझ्या काळजाचा थरकाप उडाला..
"मावशी... प्लीज लवकर या....." माझा आवाज ऐकुन धावत आलेल्या मावशी त्या काळोखात हतबल पने पहात ऊभ्या होत्या.. काय करावे सुचत नव्हते...मी स्वताचा हात सोडवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत होतोच की इतक्यात खट्टकन आवाज आला.... आडकित्त्यात घालुन सुपारी मधोमघ फोडावी अशा आवाजासोबतच शरीरात लाल मुंग्यांच जस वारूळ उठल..
भयंकर वेदनेन एक आर्त किंकाळी माझ्या तोंडातुन बाहेर पडताच आपल्या घोग-या आवाजात खदखदणार हास्य प्रियाच्या तोंडातुन बाहेर पडल... आणी धाडकन ती जमिनीवर पडली.... शुध्द हरपुन....
...to be continued 
Next part
Story by sanjay kamble

0 comments: