प्रपोज.propose Marathi horror story part-9

तीला उचलुन बेडवर झोपवले बेल्टने घट्ट बांधुन घातले... माझा ऊजव्या हाताचा अर्धा अंगठा तीन दातात धरुन तोडलेला.. मलमपट्टी करुन तसाच भिंतीला टेकुन तसाच बसुन होतो.. असह्य वेदना होत होत्या.. मेंदु बधीर झालेला.. 


Propose story

" मृत्यु अटळ आहे.. तो आलाय.... पन अजुन थोडा वेळ आहे..."
" ए काळ्या जीभेचे.... गप्प....." मावशी तीच्या बोलण्यावर चांगल्याच संतापल्या आणी जीना उतरत बडबडतच खाली जाऊ लागल्या.... तशा 'सुजाता' आपल्या रुमच्या दरवाजा जवळ येत त्या म्हणाल्या...
" तीच शरीर त्या सैतानाच्या आत्म्याच ओझ आणखी सहन करू शकणार नाही.. संपेल ती...."
मी दरवाजा तुन आत पाहील.. प्रिया निपचीप पडलेली.. आपल्या शेवटच्या घटका मोजत, नरक यातना भोगत, मृत्युच्या भयान जबड्यात, एकसारख डोळ्यातुन पाणी येत होत...
त्यानी मला आपल्या रुमजवळ बोलवल...
" तीला वाचवाव आस वाटतय तुला...?"
" हो.." कसलाचा विचार न करता मी उत्तर दील..
"एक मार्ग आहे....."
" कोणता..... ? मी काही करायला तयार आहे..."
त्या एक एक शब्द बोलत होत्या... मी मनापासुन सगळ ऐकत होतो.. त्यांच बोलण थांबल आणी मागे सरकत त्या काळोखात दिसेनाशा झाल्या... मी तसाच उभा होतो... सुन्न....
" घाबरलास.......?"
" हं....... न नाही......." मी भानावर आलो... प्रियाकड पाहील तीच्या शरीरात किंचीत हलचाल होत असली तरी वेदनेन ती अजुनही कण्हत होती.... मी हळूच दरवाजा उघडुन आत गेलो...बेडजवळ जात तीच्या चेह-याकड पाहील... आणी डोळ्यातुन पाणी येऊ लागल.
किती सुंदर निरागस होती.. तीच्यासोबत घालवलेले ते क्षण डोळ्यासमोर उभे राहीले...
हसणारी, हसवणारी, करणारी मस्करी करत पुन्हा सॉरी म्हणनारी.. आता स्वताच्या मृत्युची वाट पहात पडून होती.. पुर्ण हतबल, थकलेली, बेशुद्ध अवस्थेतही तीच्या डोळ्यातुन ओघळणारे अश्रु.... किती भयंकर होत सर्व..
तीेच्या डोक्यावरून हळुवारपने हात फिरवला ... खुप वाटल तीच्या कपाळाच चुंबन घ्याव पन मला तो अधिकार तीन दिला नव्हता...
ताडकन उठलो आणी झपाझप पावल टाकत हॉस्पीटलच्या त्या शेवटच्या रूममधे गेलो... बाथरुम होत ते.. एक मोठा चौकोनी आरसा समोर होता... त्या आरशात स्वता:ला पाहील , तोंडावर पाणी घेतल . थोड पाणी प्यायलो थोडा वेळ तसाच बॉशबेसिनकडे पहात राहीलो... त्या बाईने कोणताच उपाय सांगितला नव्हता फक्त एक वाक्य बोलली होती... फक्त एक वाक्य.... ज्यात खुप मोठा अर्थ लपला होता
'विषाला विषच मारत....'
खिशातला धारदार चाकु बाहेर काढला आणी समोर आरशात पाहील... खिशातुन मोबाईल काढला... हे घटनासत्र तुमच्यासमोर कथन करतोय.. तुटलेल्या आंगठ्यावरची पट्टी काढताना भयंकर वेदना होत आहेत.... रक्ताची धार लागलीय. त्याच रक्तान आरशावर तीन शब्द लिहीतोय.... I Love तीसरा शब्द लिहीण्याइतपत वेळ नाही माझ्याकडे... एक धुसर काळीकुट्ट आकृति बाथरूमच्या उजव्या कोप-यात उमटताना दिसतेय...... मी रखरखत्या डोळ्यानी त्या आकृतिकडे पहातोय...
" ती आज तुझ्या विळख्यातुन मुक्त होईल..बाहेर बघ, सुर्य रात्र संपवायला येतोय...आणी मी तुझ अस्तीत्व संपवायला...."
त्या आकृतिन आपल जबडा पसरला आणी माझ्यावर झेपावणार तोच मी तो चाकु उजव्या हाताने घट्ट पकडुन स्वताच्या गळ्यावर ठेवला, डोळे बंद केले तसा प्रियाचा निरागस चेहरा काळजावर उमटला आणी.............'
युवकाचे शब्द संपताच खस्सकन आवाज आला आणी काही वेळ बाथरूमच्या फर्शीवर तडफडण्याचा आवाज रेकॉर्ड झालेला.. तो मेसेज बंद करत इन्स्पेक्टर शांतपने उभे राहीले आणी मोबाईल एका प्लास्टीकच्या पिशवीत घालुन फोरन्सिक लैबला पाठवायला हवलदारांकडे दिला..
"हं.... या ऑडीओ क्लिपवरून तर वाटत की या मुलान आत्महत्या केलीये... प्रेत आधी कोणी पाहील...?"
" साहेब... हे बाथरूम खराब आहे म्हणुन इकड कोणी येत नाही.... मी दुपारी सफाई करायला आले तेव्हा दिसल..."
"हम्म..... आणी ती मुलगी......?"
" तीला रात्रभर वेड्याच झटक येतच होत. पन आज सकाळी तीच्या रूमच्या खिडकीची काच फुटल्याचा आवाज आला म्हणुन आम्ही येऊन पाहील तर हळुहळू शुद्धीवर येऊ लागलेली.. अंगातला अशक्तपना हळुहळू नाहीसा होऊ लागला... त्यानंतर बराच वेळ यालाच फोन करत होती पन लागत नव्हत, मग आपल्या घरी फोन केला आणी.... पन तीला आम्ही सांगितल नाही अजुन.....अरे...आत्ता आली होती. इथ दरवाजा शेजारी होती..."
मावशी आश्चर्यान आजुबाजूला पाहू लागल्या
इन्स्पेक्टर मावशीकड पहात म्हणाले..
" ठीक आहे... तीचीही चौकशी करावी लागेल...."
इतक्यात खिडकीपलिकडून काहीतरी खाली पडल्यासारखे दिसले... बाहेर गोंधळ माजला
" साहेब...?" पोलीस हवलदार धावत आले...
"काय झाल शिंदे....?"
"साहेब... एका मुलीन टेरेसवरून उडी मारलीये...."
" काय.....?"
" प्रिया.......???" मावशी जोरात किंचाळल्या तसे सर्वच धावत बाहेर पडले.. इमारतीच्या बाहेरील पटांगणात 'ती' खाली जमीनीवर पडलेली. डोक्यावरचे केस जमिनीवर विस्कटलेले
इन्स्पेक्टर साहेब धावतच तीच्या जवळ जात तीच्या हाताची नाडी पहात ओरडले,.. जीवंत आहे.... गाडी घ्या.... . hurry up, hurry up
फास्ट....
*********************
दोन दिवसांनी...
" साधारण पंचवीस ते तीस फुट उंची असेल... एवढ्या उंचीवरून पडुनही तीला काहीच लागलेल नाही... आश्चर्य आहे...."
डाॅक्टर इन्स्पेक्टरांशी बोलतच प्रियाच्या रुमकड निघाले...
" खुप काही आश्चर्यकारकच घडत चाललय.. बाहेर मिडीयान तर तीची स्टोरी फ्रंटपेजवर छापलीये..."
दोघे बोलत रूममधे आले...
" हैलो.... कश्या आहात... "
प्रियान हळुवारपने डोळे उघडत साहेबांकडे पाहील... बाजुला बसलेली तीची आई आणी बाबा उठुन उभे राहीले.. त्यांना बसायला सांगत इन्स्पेक्टर प्रिया सोबत बोलु लागले...
" तुझ्या हातुन स्वता:ची इज्जत वाचवताना एक खुन झाला... त्या नराधमाला वेळीच वचक बसवली असती तर हे सर्व घडलच नसत पन कायद्याप्रमाण तुला अटक कराव लागणार..."
प्रियाच्या डोळ्यात पाणी आल...
" पर्वा नाही साहेब... पन माझ्यावर मनापासुन प्रेम करणारा कायमचा मला एकट सोडुन गेला हे सहन होत नाही..."
प्रियाला अश्रु अनावर झाले...
इकत्यात तीच्या रुममधे तीच्या कॉलेजचे काही मित्र मैत्रिणी आल्या.. सोबत आणलेला बुके प्रियाकड देत तीची मैत्रीण बोलु लागली.
" प्रिया... फक्त आपल्याच शहरात नाही आख्या महाराष्ट्रात तुझ नाव गाजतय... तु केलस त्या बद्दल प्रत्येकजण तुझ कौतुक करतोय... प्रत्येक मुलीन संजय सारख्या नराधमांना वेळीच ठेचल पाहीजे म्हणुन वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लेख येत आहेत. डीबेट होतेय, गावागावात चर्चा होतेय..... आणी हो. त्या नराधमांना पाठीशी घालणा-या पोलिस अधिका-यांनाही सरकारन सस्पेंड केलय....."
एका मित्रान बोलतच खिडकीचा पडदा बाजुला केला...
" प्रिया.... बाहेर तर बघ..."
तीन आपल्या दुस-या मजल्यावरील खिडकीतुन बाहेर पाहील तर खाली संपुर्ण काॅलेज तीच्यासाठी रस्त्यावर उतरलेल... त्या जमावाकडे पहाताना तीच्या डोळ्यातुन घळाघळा पाणी येऊ लागल... मनात त्याचा विचार येताच तीनं डोळे बंद केले आणि सार काही क्षणात थांबल्यासारख वाटल... कसलाच आवाज, गोंगाट नव्हता. अगदी सुखद शांतता पसरलेली इतक्यात समोर शुभ्र प्रकाशातुन उमटणारी एक धुसर आकृती ती न्याहाळू लागली...ती आकृति स्पष्ट झाली तसा तीच्या चेह-यावर समाधानाच हासु पसरल.. त्याला पाहताच धावत त्याच्याकड जाऊ लागली
" प्रिया... " समोर तो उभा तीला साद घालत होता... त्याच्या गालावर हल्की चपाट मारत रडतच त्याच्या गळ्यात पडली...
"मला ही तुझ्या सोबत यायच होत... का मला वाचवलस...? " प्रिया त्याच्याकड तक्रार करत होती....
" मित्र माणतेस ना मला... मग आपल्या मैत्रिणीसाठी मी एवढही करू नये....?"
" माफ कर रे मला... प्रेम नाही समजु शकले.. तुला गमावल रे मी... " गालावरून ओघळणारे तीचे अश्रु स्वच्छ करत त्यान तीच्या डोक्यावरून हल्केच हात फिरवला. ...
" प्रेम म्हणजे काय, हे मलाही नाही माहीत . पन तुझ्या डोळ्यात पाणी मला कधी पहावलच नाही.. आता मी तुझ्या या सुंदर आयुष्यात नाही पन तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आयुष्यानंतरही माझ्या सोबत आहे.. माझ्या आत्म्याला तेवढ समाधान नक्कीच आहे...." एवढ बोलुन त्याची आकृती तीच्यापासुन दुर दूर जाऊ लागली
"प्लीज थांब रे... मला अस एकट नको रे सोडु... मला तु हवा आहेस रे...प्लिज परत ये रे.."
ती साद घालत राहील, त्याच्या अंधुक होत चाललेल्या आकृतीमागे धावत राहीली पन 'तो' मात्र डोळे दिपवणा-या प्रकाशात नाहीसा झाला....
तशी क्षणात प्रिया भानावर आली.. खिडकीतुन खाली पाहील तर बाहेर लोक पुष्पगुच्छ घेऊन तीच्यासाठी उभे होते... त्या गर्दीकडे पहात ती मनात पुटपूटली..
' मला माहीत आहे तु या गर्दीत नसलास तरी माझ्या सोबत आहेस. माझ्या सुखा, दुखा:त. माझ्या स्वप्नात. I love..."
तोच खिडकीतुन आत आलेल्या एक थंड हवेचा स्पर्श तीला जाणवला.. 
समाप्त.....

Story by sanjay kamble 
ही कथा तुम्हला कशी वाटली ते कॉमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा .

0 comments: