अंग
घामान भिजलेल. डोळ्यात मरणाची भिती अगदी स्पष्ट झळकत होती तर जिवंत रहावे
यासाठी धाव घेत होते. झेपा टाकत या सगळ्यातुन दुर दुुर आणखी दुर जायच होत.....

जंगलातील त्या चिंचोळ्या पायवाटेने धावताना एकमेकांचा तोल सावरत ते धावत
सुटले... काट्या कुट्यातुन आपला जिव वाचवण्यासाठी इथुन बाहेर पडायच होत.. पुढे
असलेल गणपत चा तोल गेला तसा शिरपा न झटकन त्याचा हात पकडुन वर उचलला तसा
सर्वानी पुन्हा वेग धरला... इतक्यात सर्वात मागे असलेला शिरपा वाटेत पाय घसरून
पडला.. उतारावरून तसाच गडगडत तो खाली आला. तशी बाजुच्या झाडावर बसलेले एक घुबड
पंखाची फडफड करत आकाशात झेपावले... अंगावर ठिकठीकाणी खरचटलेल आणी पायातुन
रक्तही येत होत... वेदनेण कळवळतच त्यान आपल्या मित्रांना साद द्यायला तोंड
उघडल होतच की कोणीतरी मागुन त्याच तोंड गच्च दाबुन धरल... एक काळकुट्ट
अस्थिपंजर मनगट ज्यावरुन कातड ओघळून पडत होत... मांस सडल्याचा वास त्या
हातातुन येत होता... शिरपाचा श्वास गुदमरत चालला...

त्याच्या पुढे असलेले सोबती धावतच होते.... मागे काय झालय कोणालाच कल्पना
नव्हती.. काही वेळातच त्यांच्या पावलांचा आवाज दुर दुर जात येईनासा झाला तशी
सर्वत्र एक जीवघेणी शांतता पसरली...

त्या पकडीतुन सुटण्याची हात पाय आपटत तो स्वता:ला सोडवण्याची धडपड करु लागला
पन व्यर्थ ... झटापटीत तो पालथा झाला आणी कोणीतरी त्याच्या पाठीवर बसुन त्याच
तोंड आवळत होत... अंगातील सारी शक्ति एकवटुन त्यान जोराचा हिसडा देत मागे
फिरला आणी सुन्न झाला... त्या जागेवर तो एकटाच होता.. काही वेळापुर्वी कोणीतरी
घट्ट आवळुनमागे कोणीच नव्हत... त्याला आश्चर्य वाटल आणी त्याहुन जास्त भिती...
जमिनीवर पडलेल्या शिरपान पायाची हलचाल करताच एक जोराची कळ पायातुन उमटत
मेंदुपर्यंन्त पोहचली... त्याचा पाय दगडात अडकल्यान मोठी दुखापत झालेली...
स्वताच्या हातानीच तोंड दाबुन धरत कळ सहन करू लागला तोच त्याला आपल्या
आजुबाजुला कोणीतरी आहे याची जाणीव झाली... कोणीतरी होत जे दिसत नव्हत पन ते
आपल्यावर नजर रोखुन होत...
इकडे शिरपा भितीन थरथर कापत होता... वाळलेल्या पानांमधुन होणारी सळसळ त्याच्या
दिशेन कोणीतरी येत असल्याच भासत होत.. शिरपा देवाचा धावा करत या संकटातुन
सोडवण्यासाठी प्रार्थना करू लागला..सर्व काही शांत झाल तशी पुन्हा एक जिवघेणी
शांतता पसरली.. फक्त रातकिड्यांचा किर्रर्रर्रर्रर्र किर्रर्रर्रर्रर्र आवाज
कानात घुमत होता... जागेवरून हालता येत नव्हत पन शिरपा आजुबाजूच्या परिसरीतील
प्रत्येक गुढ हलचाल कान देऊन ऐकत होता... काही वेळातच रातकिड्यांचा आवाजही
थंडावला आणी आकाशातील चांदणही काळ्याभोर ढगांनी झाकल जाऊ लागल तशी त्याच्या
काळजाची धडधड वाढली.. लख्ख काळोखान आकाश व्यापुन टाकल आणी दुर कुठेतरी
कोल्हेकुई झाली... खाली पडलेला शिरपा बाजुच्या जंगलात आपली नजर रोखुन
बसलेला... त्याला कळुन चुकल होत क आता तो एकटा नव्हता...मागुन कोणीतरी सावकाश
त्याच्या दिशेन सरकत होत.. काळोख असल्यान काही दिसत नसल तरी जंगलातील
वाळलेल्या पानांवरून काहीतरी सरपटत येत होत... त्याच्या अंगावर सरसरून काटा
येऊ लागला ... अंग घामान भिजल होत... मागे वळुन बघण्याच धाडस होत नव्हत पन न
रहाऊन त्यान मागे पाहील.. त्याची भेदरलेली नजर मागे अचानक एका ठिकानी
स्थिरावली... त्याला एक फिक्कट पांढरी मानवी आकृती दिसली आणी क्षणात पुन्हा
नाहीशी झाली... शिरपाला समजुन चुकल की हे काहीतरी विचित्र आहे. आपन स्वताहुन
एका सैतानाच्या जबड्यात चालुन आलोय आणी इथुन जीवंतपणी सुटका होईल अस वाटत नाही
... ती अमानवीय शक्ति त्याच्यावर नजर रोखुनच असावी कारण एखादाही जंगली प्राणी
त्या परिसरात भटकत नव्हता.. त्या लख्ख काळोखात त्यान आपली व्याकुळ भेदरलेली
नजर फिरवायला सुरवात केली.. तोच मागुन ज्या वाटेने तो धावत आला होता त्या
वाटेवरून कोणीतरी वेगात धावत येत होत... तसा शिरपाचा धीर सुटत चालला... त्यान
आपला पाय त्या दगडातुन सोडवण्याची धडपड सुरू केली... डोळ्यातुन घळाघळा पाणी
येऊ लागल.. वेदना असह्य झाल्या पन पर्याय नव्हता कारण कोणीतरी झपाझप पावल
टाकत, वेगाने धावत येत होत... वाळलेल्या पालापाचोळ्यातुन सळसळ करणारा आवाज
काळजाचा थरकाप उडवत होता... ढग पुढे सरकले तसे चंद्राच्या प्रकाशात तो परिसर
उजळुन निघाला ... शिरपान देवाचा धावा सुरू केला "'देवा...सोडव गा... देवा सोडव
गा..." त्याच्या तोंडातुन बाहेर पडणारे शब्द ही अडखळत होते.. पाय सोडवण्याचा
प्रयत्न करत त्यान माग पाहील.... आणी त्याची बोबडीच वळली... एक आठ दहा फुट
उंच, काळाकुट्ट माणुस आपल्या भरड्या आवाजात ओरडत, किंचाळत त्याच्या दिशेन धावत
येत होत... पंढरे विस्फारलेले डोळे शिरपावर रोखुन धरले होते तर जबडा एखाद्या
अजगरा सारखा पुर्णपणे फासटल्याने निघणारी हिरव्या रंगाची लाळ छातीवर पसरली
होती तर त्याचे आत वळलेले त्याचे सुळे आणखी भिषण वाटत होते... त्याचा डावा हात
खांद्यापासुन तुटलेला तर उजव्या हातात रक्तान माखलेल एक लांब धारधार हत्यार
होत.. आपल्या दिशेने झेपावणार ते आक्राळ विक्राळ पिशाच्च पाहुन मनातुन पुरता
घाबरलेला शिरपाची दातखिळीच बसली... बेंबीच्या देठापासुन एक आर्त किंकाळी
शिरपाच्या तोंडुन बाहेर पडली आणी त्या पिशाच्च्याने त्या अंगावर झेप टाकली तसे
झाडावर बसलेले घुबड पंखांची फडफड करत त्या जागेवर घिरट्या घालु लागले... काही
क्षणात शिरपाच्या देहाची हलचाल थंडावली आणी त्या पिशाच्च्याने आकाशातील
चंद्राकडे पहात एक जोरची आरोळी ठोकली तसे पुन्हा चंद्राची कोर काळ्याकुट्ट
ढगांनी व्यापली गेली...

*****
इकडे गणपत हानमा आणी भिकाजी धावत खुप दुर आले... सुटकेचा निश्वास टाकत एका
ठिकाणी बसले
जमिनीवर आडवा होत हानमा म्हणाला.."सुटलो एकदाचे..."
तसा भिकाजी गंभीर झाला.. तो दबक्या आवाजात म्हणाला..." आजुन आपली सुटका झालेली
न्हाय... सुटका झाली असती तर ती हडळ जोरात किचळुन म्हणाली असती ' 'चुकलासा'...
आजुन तीची हद्द सपलेली न्हाय.."
एवढ बोलुन भिकाजी मागे फिरला आणी घबरून म्हणाला...
"शिरपा कुट -हायला र.."
भिकाजीच्या प्रश्नाला कोणी कडेच उत्तर नव्हत... सर्वच घाबरले... कारण त्यांचा
मित्र त्यांच्या सोबत नव्हता ..
" त्याला शोधाया हव.."
हानमा देखील उठला... पन गणपत तसाच बसुन होता...
" गणप्या... तु नाहाय यणार..."
हानमाच्या प्रश्नाला त्यान काहीच उत्तर दिल नाही... "ये भित्र्या.... लेका हीच
का दोस्ती...."हानमा थोडा रागातच होता
गणपत च्या चेह-यावरचा रंग मात्र उडाला होता... काळीज जोरजोरात धडधडत होते तर
भितीने तोंडातुन शब्दच बाहेर पडेनासे झाले...
" गणप्या.... ये गणप्या... काय झाला.... आर बोल की..." भिकाजी त्याला धीर देत
विचारू लागला पन त्याला काहीच बोलता येईना... आपला उजवा हात पुढे करत खुणावल
तसे भिकाजी आणी हानमा पाहु लागले..
आणी तीघेही हतबल झाल्यासारखे मटकन खाली बसले..
समोर तीच झोपडी होती... जिथुन सुटका होण्यासाठी ते धावत होते... आणी छतावर ती
म्हातारी ऊभी होती...पांढ-या केसांनी चेहरा झाकलेला मान किंचीत तीरकी करून ती
त्याना रखरखत्या नजरेने पहात होती ....
" चकव्यान आपला घात केला र..." एवढेच शब्द भिकाजीच्या तोंडुन बाहेर पडले...
आणी त्यान मागे पाहील तर त्या चिंचोळ्या पायवाटेवर कोणीतरी उभ होत..... आठ ते
दहा फुट उंच.. डावा हात तुटलेला... आणी रखरखती पांढरी बुबळ त्यान आपल्या
सावजावर रोखलेली, पन जस ते गुलाम होत त्या झोपडीतल्या वृद्धेच , नव्हे ,
त्या चेटकीणीच, आणी ते संम्मती मागत होत, झडप घालण्याची.. बाजुच्या
झाडावर बसलेल घुबड खाली चाललेल
भयान नाट्य मोठ्या डोळ्यांनी पहात होत.. भयभीत झालेल्या त्या तीघांकड
पहात त्या चेटणीनीच एक आर्त किंकाळीसारख भेसुर हास्य आसमंतात घुमल तसे ते
घुबड आपल्या पंखांची फडफड करते झप्पकन पुन्हा आकाशात झेपावले.....
आपला जीव वाचवण्यासाठी जो तो वाट दिसेल तीकड धावत सुटला, वेगवेळ्या
दिशांना, जिवाच्या आकांतान, पन मागुन एेकु येत होत्या एकापाठोपाठ एक
भेसुर किंकाळ्या, आणी त्या किंकाळंयानी आरोळ्यांनी आसमंत हादरत राहीला,
रात्र गडद्द आणखी गडद्द होत भीषण झाली त्या गुढ रात्रीच्या गही-या
अंधारात सारे वाटसरू कायमचे हरवुन गेले,

काही दिवसांनी...
डोंगराच्या उताराला वसलेल एक गाव रात्रिच्या कवेत शांतपने झोपी गेलेल,
गावच्या कच्च्या रस्त्यावरून गावठी कुत्र्यांचा झुंड धावत अचानक भुंकत
सुटायचा,
दुर कुठेतरी जंगलात कोल्हेकुई झाली तशी दिव्याच्या अंधारात अभ्यास
करणा-या मुलीकड पहीत विमल बोलु लागली
" किती दा सांगीतल रात व्हायच्या आत घराकड येत जा म्हणुन ...." ती रागातच होती.
" आई... येत आसल ग बा... कशापायी बडबड करतीयास..."
" तु गप ग... आकरा वाजुन गेल्याती , दारू पिऊन पडल आसल कुठतर.. तु झोप
म्या जागते.."

आईन आपल्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवला तशी ती ही अंथरूणावर पडली आणी
दरवाजावर थाप ऐकु आली...
दरवाजावर थाप ऐकु आली...
" आलत बघ
"
म्हणतच ती जागेवरून उठली , लाकडी कुडाचा दरवाजा कर्रर्रर्रर्रर
कर्रर्रर्रर्रर करत बाजुला केला आणी समोर पाहील , पन बाहेर तीचा नवरा
शांतपने उभा होता, अंग घामान भिजलेल, जणु धापा टाकत तो आला होता.. पन आत
न येता तो बाहेरून आपल्या बायकोला म्हणाला,...
"दरवाजा बंद करून घे.. कुणीबी भाईर पडु नगा.... उंबारा वलांडुन भाईर पडु नगा.."
" आव काय झाल...? " विमल घाबरली, पन तो पुढ काही बोलणार तोच त्याच्या
चेह-यामागुन दुसरी एक काळीकुट्ट आकृति डोकावुन तीला पाहु लागली, आणी त्या
दृष्यान विमल भोवळ येऊन जागेवरच कोसळली...

मानवी रक्ताची
चटक लागलेली ती चेटकीन आणी तीच गुलाम पिशाच्च आता जंगलातुन मणुष्य वस्तीत
फिरू लागलय. अंधारातुन गही-या काळोखातुन....
दरवाजावर ऐकु येणारी ती थाप.... कदाचीत पुढच भक्ष
....?

समाप्त.
Story by sanjay kamble
0 comments: