पुनर्जन्म punrjanm by somnath kale part-2

 त्या रूम मध्ये सर्वत्र तिच्या भयानक हस्यचा आवाज घुमू लागला.
' मी हिला घेऊन जाणार माझ्याबरोबर '
मी नlही सोडणार
कुणालाच नlही सोडणार '
पुनर्जन्म

हा आवाज खोलीमध्ये येऊ लागला
पण याचा माझ्या मुलीवर काहीही परिणाम होत नव्हता. ती शांत बसलेली होती माझा तर आता फक्त जीव जायचा बाकी राहिला होता. मी लगेच रिंकिला उचलले आणी त्या खोली मधून बाहेर आलो. बाहेर येताच मी त्या खोलीची कडी बाहेरून बंद  केली आणि मझ्या हातात बांधलेला असलेला देवाचा धागा मी सोडून त्या काडीवर मी तो धागा बांधला जेणे करून आतमध्ये जी काही दुष्ट शक्ती आहे ती बाहेर  येता कामा नये. माझ्या मुलीच रक्षण करण्याचा तो एक प्रयत्न.
मी ती रूम बंद करून माझ्या मुलीला घेऊन खाली आलो आणि माझ्या रूम मध्ये येऊन झोपलो पण झोप काही लागत नव्हती जरा डोळे लगले की लागले की डोळ्यासमोर त्या बाईचा चेहरा दिसायचा मी ती रात्र जागूनच काढली.
दुसऱ्या दिवशी मी माझ्या सासर्यांना कॉल  करायचे ठरवले कारण त्यांना या अश्या गोष्टी खूप चांगल्या महिती होत्या या गोष्टीचं ज्ञान त्याना खूप होत त्यामुळे मी त्यांना सकाळीच फोन केला
' hallo बाबा
'जावईबापू तुम्ही बोल की काय म्हणता खूप दिवसांनी आठवण काढलीत '
' बाबा मी खूप प्रॉब्लम मध्ये आहे हो
काय झालं जावईबापू काही सांगा तर आधी आणी तुम्ही रडताय का ? काय झालय ?

मग मी त्यांना आत्तापर्यंत जे काही घडलंय ते सगळं सांगितल

' जावईबापू मी लगेच तिकडं यायला नीघतोय
तुम्ही घाबरू नका पण मी येत नही तोपर्यंंत तुम्ही ती खोली उघडू नका
आणी एवढं बोलून त्यांनी फोन कट केला आणी मग ते तिथून निघाले
येताना त्यांच्या मनात एकच विचार येत होता,
कि हे जे काही घडत आहे त्याचा सामना करायचा तो कसा?
 त्या घरात काय आहे हे त्यांना पूर्णपणे जाणून घ्यायचं होत
ते त्या गावात आल्यावर त्यांनी त्या घराच्या इतिहासाची माहिती घ्यायला सुरवात केली.
त्यांना त्या घराची आता बरीच माहिती मिळाली होती

त्या घरात एक कुटुंब राहत होत.
पती पत्नी आणि त्यांची एक मुलगी. एवढं त्यांचे कुटुंब.

एकटी  बाई धुनी-भांडी करून घर चालवायची तिचा नवरा दारू पिऊन इकडे-तिकडे पडलेला असायचा .
तीच नाव दामिनी . दामिनी  बिचारी याच्या-त्याच्या घरी कष्ट करायची आणि हा रात्री पिऊन घरी जाऊन तिला पैशासाठी मारहाण करीत ती दामिनी तिच्या नवऱ्याच्या त्रासाला खूप कंटाळली होती . रोजचंच ते दिवसभर लोकांच्या घरी काम करायचं आणि रात्री नवऱ्याचा मार खायचा . तिला आता हे खूप असहाय्य होत चाललं होत
आज तुम्ही परत पिऊन आलात , अहो का छळताय आम्हाला आम्हाला सुखाने जगू तरी द्या
पण तिच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता
तिच्या डोळ्यातल्या पाण्याची त्याला जराही चिंता राहिलेली नव्हती तो त्याच्याच पिण्याच्या गुंगीत मग्न होता
त्याने खिशातून दारूची बाटली काढली आणि ग्लासात ओतून पिऊ लागला
त्याची चार वर्षाची मुलगी गौरी एका कोपऱ्यात बघून फक्त बघत होती तिलाही वाटत असावं कि सांगावं बाबांना 'बाबा नका पिऊ हो दारू ' पण तिची त्यांच्या बद्दलची वाढत चाललेली भीती तिच्या आणि तिच्या बाबा मध्ये एक खोल दरी निर्माण करून गेली होती त्यामुळे ती फक्त बघत बसण्याखेरीज काहीच करू शकत नव्हती
आणि थोड्याच वेळात व्हायचा तो गोंधळ पुन्हा सुरु झाला.  तो माणूस दारू पिऊन परत त्या बाईला मारू लागला दारूच्या नशेत तो इतका वेडा झाला कि ती एक बाई आहे हे सुद्धा तो विसरला तिला लाथेने बुक्य्याने जे हातात येईल त्याने मारू लागला कोपऱ्यात बसलेल्या गौरीच्या डोळ्यातलं पाणी घळाघळा वाहत चेहऱ्यावरून जमिनीवर पडत होते .
तिच्या आईला तिचे बाबा मारतायत हे बघून ती आईला वाचवावे म्हणून त्यांच्या दिशेने जाऊ लागली
'बाबा सोडा आईला तिला नका मारू'
'बाबा सोडा '
तीन त्यांचा हात धरला पण रागाच्या भरात त्यानं तिचा हाताला एक हिसका दिला आणि तिला भिंतीकाढे ढकलून दिल त्यासरशी ती भिंतीला जाऊन धडकली आणि खाली पडली
पण तरीही तिच्या आईला वाचवायचा केविलवाणा प्रयत्न ती करत होती
ती उठून उभा राहिली आणि परत तिच्या आईच्या दिशेने चालू लागली पण चालता चालता तिच्या पायाने चुकून तिच्या बाबाची दारूची बाटली सांडली
आणि इथेच घात झाला तिच्या बाबाने ती सांडलेली  बाटली पहिली त्याचा राग आता त्याला अनावर झाला त्याने तिला पकडले आणि उचलून भिंतीवर फेकले ती चार वर्षाची मुलगी एका बाहुली प्रमाणे फेकली गेली तिची आई तिला वाचवायला मध्ये आली पण तिलाही त्याने जमिनीवर जोरात आपटलं तिच्या डोक्याला मार लागला तिच्या डोळ्यासमोर अंधार यायला लागला .ती बघत होती तिचे बाबा तिला धरून मारत होते शेवटी त्यांनी तिचा गळा पकडला आणि वर उचललं तिच्या आईची तिला वाचवायची धडपड पण व्यर्थ .
त्याने तिला गळ्याला धरून वर उचलले . तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला ती सुटण्यासाठी धडपड करू लागली पण तो तिला सोडत नव्हता दारूच्या नशेत तो विसरला होता कि ती त्याची मुलगी आहे आणि तो त्याच्याच मुलीचा जीव घेत होता काही वेळ  त्यानं तसच गौरीला उचलून धरलं तिची आई रडत होती तिच्यात आता उठाण्याची हि ताकत उरली नव्हती ती फक्त बघत होती आणि रडत होती शेवटी काही वेळाने गौरीची ती धडपड एका मोठ्या किंकाळीं निशी बंद झाली . गौरीची  हलचाल बंद झाली होती  गौरीचा तिच्याच बापाकडून दारूच्या नशेत खून झाला होता .
मरणा अगोदर तीन विचार केला असेल 'आई जाते ग तुझ्याशी शेवटचे काही शब्द बोलायचे होते पण ते हि माझा गळा दाबल्यामुळे शक्य झाले नाहीत पण आई एव्हडे नक्की सांगेन कि पुढच्या जन्मी पण मी तुझीच मुलगी म्हणून जन्माला येईल, तू तुझी काळजी घे माझं जीवन देवाने इथपर्यंतच लिहिलं होत, पण तू माझी आठवण काढून रडत बसू नकोस आणि बाबांना सांग पुढच्या जन्मी तरी मला असा मारू नका आई माझ्याच नशिबी असा का ग मी कधी बाबांना कापड्यासाठी हट्ट केला नाही कि कधी खेळणी मागितली नाही मग का पण आता विचार करायची वेळ निघून गेलेली आहे आई जाते ग काळजी घे '
पण हे शब्द बोलायचे तिच्या मनातच राहिले तीच खाली पडलेलं ते निर्जीव शरीर बघून दामीनीच  काळीज फाटत होत तिच्या पोटाच्या गोळ्यांचा हा असा अंत होईल तिला कधी असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं गौरीच शरीर बघून तिच्या अंगात एका आईची शक्ती संचारल्यासारखी ती उठली तिचा नवरा ती बाटलीत जी थोडीशी दारू शिल्लक होती ती पीत होता . तीन गौरीच्या प्रेताकडं बघितलं आणि तिथं बाजूलाच असलेला वरवंटा उचलला आणि तिच्या नवर्याच्या डोक्यात मारायचं चालू केलं ती एका मागून एक वार त्याच्या डोक्यावर करत होती. तो संपला होता पण एका आईच मन अजून शांत झालेलं नव्हतं ती त्याला मारत होती तो मेल्याची खात्री पटल्यावर रडत रडत तिने तो वरवंटा बाजूला फेकला आणि तिच्या मुलीपाशी गेली आणि गौरीच्या प्रेतावर ती डोकं ठेऊन ती रडू लागली ती थोडा वेळ तिच्या आठवणीत रमली आणि आता सगळं संपलय हे बघून ती उठली आणि तिने घरातच वर साडी बांधून गळफास घेऊन दमीनीनेही  आत्महत्या केली

हि सगळी कथा ऐकल्यावर रिंकीच्या आजोबांना हळू हळू सगळं समजायला लागलं ज्या दिवशी गौरी चा खून झाला त्याच  दिवशी रिंकी जन्माला आली म्हणजे गौरीच रिंकी आहे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही
गौरीच रिंकीच्या रूपात पुनर्जन्म झालाय आणि म्हणूनच दामिनी तिला तिची मुलगी समजून तिच्याबरोबर घेऊन जायला आली आहे
जोपर्यंत तीन रिंकीच्या पाहिलेलं नव्हतं तोपर्यंत काही नाही पण रिंकी त्या घरात राहायला गेली त्यावेळेस तीन रिंकीच्या पाहिलं आणि ती समजून गेली कि हीच गौरी आहे
म्हणजे ती आता रिंकेला घेऊन जाणार आहे
रिँकिचा जीव धोक्यात आहे
'मला आता लवकरात लवकर तिथं गेलं पाहिजे नाहीतर रिंकीच काहीही बरेवाईट होऊ शकत '
असा विचार करून ते लवकरात लवकर तिथून निघाले

0 comments: