'पुनर्जन्म '
By
Somnath kale
' रिंकि ' हळुच पडशील. नाही बाबा माझी मुलगी रिंकि. तीन वर्षाची आहे. सहा महिन्यापूर्वी तिची आई वारली. आज आम्ही नवीन घरात रहायला आलोय रिंकिला हे घर खूप आवडलं आहे. ती खूप खुश आहे. हेच कारण होतं घर बदलण्याचं त्या घरात रिंकिला तिच्या आईची खूप आठवण यायची त्यामुळे आम्ही ते घर बदललं. या घरात आता मी आणी माझी मुलगी रिंकि दोघेच आहोत.
सगळं काही सुरळीत चाललं होतं. माझी मुलगी ही हळू हळू तिच्या आईच्या आठवणीतून बाहेर येत होती.
एके दिवशी
बाबा ती रूम बंद का आहे ? आपण बघायची का उघडून ? हो बघू आपण उघडून, मी येतो चाव्या घेऊन. आणी रिँकिचे बाबा चावी आणायला गेले आणी ते लगेच चाव्या घेऊन आले. त्यांनी सगळ्या चाव्या लाऊन बघितल्या पण एकही चावी त्या रूमची नव्हती. बाबा आता ? बघतो मी नवीन चावी बनवावी लागेल.
रिंकिला खूप ईच्छा होती त्या रूम मधे काय आहे हे बघायची त्यामुळे मी नविन चावी बनवून आणली. आणि मग मी आणि रिंकि ती रूम उघडायला गेलो. मी ती रूम उघडली आणी आम्ही आत गेलो. त्या खोलीत खूप धूळ होती बहुतेक बरीच वर्षे ती खोली बंद असावी.
त्या खोलीत एक बेड, दोन पत्र्याच्या पेट्या, एक आरसा होता मोठा काही पेंटिंग्ज होत्या जे होतं ते सगळं धुळीने माखलेलं होतं ' बाबा आपण ही रूम स्वच्छ करुयात ' मग आम्ही ती रूम साफ करायच काम चालू केलं. माहीत नाही का पण मला त्या खोलीत खूप विचित्र वाटत होत. असं वाटत होत जसं की माझा जीव गुदमरतोय. काळीज धडधडत होत. पण नंतर मी विचार केला की ही रूम खूप दिवस बंद होती त्यामुळे इथे थोडसं अशुद्ध वातावरण निर्माण झालं असेल आणी आम्ही रूम पुसायला सुरुवात केली
त्या पेंटींग्ज पुसल्या तो आरसा ही पुसून स्वच्छ केला
मला रिंकिला बघून खूप आनंद होत होता. ती आता खूप खुश दिसत होती मला रिंकिला असच बघायची इच्छा होती,
आम्ही सगळं साफ केल्यावर त्या पत्र्याच्या पेट्याकडे वळलो
पहिली पेटी मी उघडली तिच्यात काहीच नव्हतं ती पेटी पूर्णपणे मोकळी होती मग मी दुसरी पेटी उघडायला गेलो मी ती पेटी उघडणार इतक्यात माझं लक्ष त्या आरश्यावर गेलं त्यावर काहीतरी लाल पदार्थ खाली ओघळत होता
आम्ही तर हा आरसा आत्ताच साफ केला होता मग हे परत काय पडलय ते बघायला मी आरश्याजवळ गेलो' मी बघितले तर ते रक्त होत पण कुणाचं मला काहीच कळत नव्हतं काय होतय ते . मला राहून राहून असं वाटत होत की मी ही रूम उघडून कही चूक तर केली नाही ना?
मी मागे वळून बघितल तर रिंकि ती पेटी उघडत होती तिनं ती पेटी उघडली आणी काही कळायच्या आत रिंकि जमिनीवर पडली मी पळत रिंकि जवळ गेलो रिंकि जमिनीवर पडलेली होती मी पेटीत बघितल तर त्यात फक्त एक बाहुली होती
मला आता अस जाणवायला लागलं होतं की रूम मध्ये काहीतरी वेगळ घडतय मला जाणवत होत की आम्हां दोघां व्यतिरिक्त सुध्दा रूम मध्ये कोणीतरी आहे
मी तशाच अवस्थेत रिंकिला उचलल आणि बाहेर घेऊन आलो रिँकिच्या तोंडावर पाणी शिम्पडले पण तो प्रयत्न ही व्यर्थ. रिंकि वर उठत नव्हती आता मात्र मी खूप घाबरलो काय झालं असेल मझ्या रिंकि ला
मी खूप घाबरलो होतो कारण माझ मन आता एका पुरुषाचं नसून एका बापाचं होत
मी लगेच तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो
' डॉक्टर ...डॉक्टर ... डॉक्टर ...
काय झालय ,
माझी मुलगी बघा कशी शांत पडलीये हो हिला बघा ना काय झालय ते
मझ्या डोळ्यातून येणारं पाणी डॉक्टरानि बघीतल
त्यांनी लगेच नर्स ला बोलावले आणी रिंकिला अड्मिट करून घेतले
मी काय करू मला काहीच कळत नव्हत
माझ्या मनात हाच प्रश्न निर्माण व्हायचा की
' रिँकिच्या या अवस्थेला मीच तर जबाबदार नही ना? '
सुमारे एक तासाने डॉक्टर माझ्याकडे आले
तुमची मुलगी आता ठीक आहे काळजी करण्याचं काहीही करण नाहीये She is All Right
धन्यावाद डॉक्टर साहेब तुमचे फार फार उपकार झाले
अहो उपकार कसले हेच तर आमच काम आहे
नाही तरी पण thank you.
पण कशामुळे झालं होतं तिला असं कही कळू शकेल
तुमची मुलगी जास्त धुळीच्या ठिकाणी गेल्यामुळे तिला श्वास घ्यायला प्रॉब्लम झाला आणि त्यामुळेच ती बेशुध्द झाली होती
पण आता ती ठीक आहे तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता
धन्यवाद डॉक्टर
रिँकिचे बाबा तिला घरी घेऊन आले,
त्या घटनेनंतर त्यांना रिँकित प्रचंड मोठा बदल जाणवायला लागला. पहिले हसत खेळत राहणारी रिंकि आता एकदम शांत राहू लागली होती. ती माझ्याशी लवकर काही बोलत पण नव्हती. ती तिच्याच विचारात गुंतलेली असायची. ती वेळेवर जेवनही करत नव्हती
एके रात्री रिंकि आणि तिचे बाबा झोपलेले असताना, अचानक रिंकि उठून उभी राहिली आणी दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली रिंकि चालत चालत त्याच खोलीत आली जी त्यांनी साफ केली होती आणी रिंकि त्या आरशासमोर जाऊन बसली. तिच्या बाबांना तितक्यात जाग आली आणी ते उठून बघतात तर रिंकि जागेवर नाही. आता ते खूपच घाबरले. उठून सैरावैरा घरात बाहेर रिंकिला शोधु लगले पण रिंकि काही सापडेना मग शेवटी त्यांनी ती बंद रूम बघून यावी म्हणून ते त्या रूम मध्ये गेले तर रिंकि तिथेच त्या आरश्यात बघत बसली होती
रिंकि! रिंकि तू इथे काय करतेय,
आणि कशाला आलीस इथं
बाबा मी नाही आले, मला या घेऊन आल्या
कोण घेऊन आलं तुला,
रिँकिने आरशात दाखवलं तर आरशात रिँकिच्या चेहऱ्या ऐवजी एका भयानक बाईचा चेहरा मला दिसला तिचा तो चेहरा आणी त्यावरच ते भयानक स्मित हास्य बघून माझी तर बोलतीच बंद झाली त्या रूम मध्ये सर्वत्र तिच्या भयानक हस्यचा आवाज घुमू लागला.
' मी हिला घेऊन जाणार माझ्याबरोबर '
मी नही सोडणार
कुणालाच नही सोडणार '
क्रमश:
Home
horror stories
marathi horror story
पुनर्जन्म Punrjanm marathi horror story by somnath kale part 1

0 comments: