प्रपोज. Propose Marathi Horror Story Part-4

मेडिकल ची स्टुडेंट आहे... आपला प्रयोग कसा झालाय हे एखाद्या प्राण्यावर टेस्ट करून बघायची जणु सवयच झालीये...."
Propose story

त्यावर तीच्या घरात चांगलाच हाश्या पिकला... माझ केविलवान तोंड पहात हळुच स्वताचे कान पकडुन माफी मागितली...
पन राग नव्हता , तीच्या कसल्याच बोलण्याचा, मस्करीचा.... ती काही बोलुदे.. किती मस्करी करूदे छान वाटायच... तीला पाहील की सार जग हरवुन जायचो.. कारण माझ्यासाठी ती आता जगातली सर्वात आवडती होती , स्वताच्या जीवापेक्षा ही.. पन ते इथ आणखी किती दिवस आहेत हे माहीत नव्हत..
*****
तीला प्रपोज करायच ठरवल... तीच्या मनात काय आहे माहीत नव्हत पन ते अचानक हे शहर सोडून गेले तर.....? दिवस फिक्स केला... मेसेज टाकला... 
' रंकाळा. 11, am '
रिप्लाय आला.. ' वाढदिवस आहे वाटत...'
'हो..' मी ही मेसेज चिकटवला..
मी जरा अधिकच उतावळा झालेलो... अर्धातास आधीच पोहोचलो..
एक छानस गुलाबाच फुल शर्टच्या आत लपवुन मी तीची वाट पहात बसलेलो..
ती आली... क्लासवरून थेट ठरलेल्या ठिकानी... नेहमीसारखीच सुरेख दिसत होती... ब्लॅक जीन्स . पिंक टॉप, चमकदार सोनेरी केस जे आजही नेहमीप्रमाणेच मोकळे सोडलेले. कानात छानशा रिंग तर कपाळावर बारीकशी टीकली.. दुरूनच स्माईल करत पुढ आली...
" आज सुट्टी तुला....?" बॅग बाजुला ठेवत बाकड्यावर बसली....
" नाही ग.... एक खुपच Importent काम होत म्हणुन सुट्टी घेतली.."
थोडा वेळ काय बोलाव सुचेनास झाल .. 
ती मात्र नेहमीच्या गमती सांगण्यात दंग होती हसता हसता दोन वेळा माझ्या पाठीवर नेहमीसारखीच चपाट मारली, पन माझ लक्ष कशातच नव्हत.. मी तीच गोड हसण ,बोलण मन लाऊन ऐकत होतो.. पन तीला 'प्रपोज' करायच आहे या विचारान काळीज मात्र धडधडत छातीतुन बाहेर येतय की काय अस वाटु लागल.. 
" काय झालय तुला....असा गप्प का...?" 
शेवटी सारा धीर एकवटला.. डोळे बंद केले , माझ्या शर्टमधे हात घालत ते गुलाबाच फुल बाहेर काढल आणी तीच्या निरागस ,
गोड चेह-याकडे पहात म्हणालो
" प्रिया.......तु....तु...मला खुुप , खुप आवडतेस ग... I love you. प्रिया......" 
आयुष्यातल आजवरच सर्वात मोठ धाडस केल होत...ते म्हणजे 'प्रपोज'... काही काळ जणु सार जगच थांबल होत, मघापासुन होणारी झाडांची हलचाल, संथ हवेचे झोके, पाण्याच वेग काही क्षण सार काही थांबल.. आवाज येत होता तो काळजाच्या धडधडण्याचा. अगदी स्पष्ट , अतिशय वेगाने, तीच उत्तर काय येतय हे श्वास रोखुन ऐकत होतो आणी मला जे आपेक्षीत होत तेच झाल. तीच्या चेह-याचा रंग उडाला, ती अगदी शांत बसुन होती, खाली शुन्यात पहात.. पुढचे काही सेकंद ही जिवघेणी शांतता तशीच राहीली ,
तीच्या अस्वस्थ चेह-याकडे पहात माझ्या डोळ्यात पाणी आल, कारण मला माझ उत्तर भेटल होत. ती काही वेळात निघुन गेली पन मी मात्र त्या तलावातील संथ पाण्याकडे पहात तसाच बसुन राहीलो... किती वेळ, माहीत नाही. पन आता सार काही संपल होत.. काही भावना ह्या मनातच छान , सुंदर , सुरेख स्वप्नातल्या चांदण्यासारख्या असतात..पन जेव्हा त्याच भावना ओठावर येतात तेव्हा त्यांची सत्यता किती वेदनादायी आहे हे समजत पन तेव्हा खुप उशीर झालेला असतो.
रात्रीचे दहा वाजले होते... तलावातील पाणी किती सुरेख वाटत होत.... आजुबाजूच्या लाईटचा प्रकाश परावर्तीत होउन चमकत होत, पाणी... माझ्या डोळ्यातही होत.. खारट पाणी.. एकतर्फी प्रेमात अपयश आल्यानंतर डोळ्यात दाटुन येणार पाणी...
खुप खुप वाईट वाटत होत, ती मला आपला चांगला मित्र समजत होती पन मी.. प्रपोज केल तीला ? गमाऊन बसलो तीला...! माझ्या आयुष्यात तिच सर्व काही आहे.. माझ सर्वस्वच... पन संपल हे सार काही..
घरी आलो पन जेवण्याची ईच्छा नव्हती..
"आई .... मी जेऊन आलोय ग....." एवढ म्हंटल आणी तसाच बेडवर पडलो... मिनीटा मिनिटाला येणारा तीचा मेसेज आज आला नव्हता... झोप येत नव्हती... या कुशीवरून त्या कुशीवर , पन विचार डोक्यातुन जाईना आणी डोळ्यातल पाणी थांबेना... रात्र पुढे सरकत होती फक्त रोजची स्वप्न आजच्या रात्रीत नव्हती, होता तो एकटेपना, आयुष्याला ग्रहण म्हणुन लागलेला एकटेपना.... डव्या कुशीवर झालो इतक्यात दारावर टकटक झाली.. किती वाजलेले माहीत नाही पन बाहेर कोणीतरी आल होत... डोळे नीट पुसले आणी बेडवरून खाली उतरलो... लाईटच बटन ऑन करून दरवाजा उघडला पन बाहेर कोणीच नव्हत.. अगदी निरव शांतता आणी बाहेरचा काळोख किंचीत दुर करणारा सरकारी खांबावरील ट्युबचा पांढरा प्रकाश तेवढच बाहेर होता... कदाचीत भास झाला असेल... मी दरवाजा बंद करून घड्याळ पाहील.. दीड वाजुन गेलेला.. बाजुच्या टेबलवर ठेवलेल्या जार मधल घोटभर पाणी प्यायलो आणी बेडवर आडवा झालो.... भुक लागलेली, त्यामुळे झोप लागेना... डोळे बंद केले तसा तीचा हसरा चेहरा नजरेसमोर आला आणी पुन्हा दरवाजावर टक टक झाली... कोणीतरीे दरवाजा वाजवत होत... पुन्हा दरवाजा उघडला पन कोणीच नव्हत... कोण मस्करी करतय समजेना.... दरवाजा पुढ केला आणी मागेच उभा राहीलो... म्हणजे झटकन दरवाजा उघडुन जो कोणी आहे त्याला फोडायचा या उद्देशाने .. काही वेळ श्वास रोखुन बाहेर काही चाहुल जाणवते का पाहु लागलो. पन अगदी माझ्या संथ गतीन धडधडणा-या काळजाची धडधड ऐकु येईल इतकी ती रात्रीची निरव शांतता पसरलेली..
. भींतीवरील घड्याळाचे काटेही अगदी स्पष्ट ऐकु येत होते.. कानात प्राण आणुन मी बाहेरुन येणारा आवाज ऐकु लागलो.
आणी पुन्हा दरवाजावर 'टक टक' झाली......................
****
भींतीवरील घड्याळाचे काटेही अगदी स्पष्ट ऐकु येत होते.. आणी पुन्हा दरवाजावर टकटक झाली तसा क्षणाचाही विलंब न करता मी दरवाजा उघडला तसा अंगावर सर्रर्रर्र कन काटा आला... बाहेर कुणीच नव्हते.. होती ती एक जिवघेणी शांतता... आता मात्र भीती वाटु लागली.. कसलीच हलचाल न करता मी हळूच दरवाजा बंद करू लागलो तसा एक आवाज कानावर पडला.. कोणातरी कण्हत होत, शरीराला होणा-या असह्या यातनांनी रडत होत.. माझी नजर समोरच्या रस्त्यावर गेली, धुळ मातीन माखलेल्या रस्त्यावर एक सावली पडलेली.. आडवी... जीला शरिर नव्हत पन तरी एक सावली जमिनीवर होती.. दाराच्या चौकटीच्या आत मी उभा त्या सावलीकडे पहात होतो तोवर त्याच्यात किंचीत हलचाल जाणवली... ते अखुड होता होता तडफडत असल्यासारखे शरिराची हलचाल करू लागले... 
जमिनीवर पाय आकडुन घेत सार शरिर गोळा करत पुन्हा झटक्यासरशी सरळ केले . समोरच ते भयान दृश्य पाहुन भितीन अंग थरथर कापत होते, सर्वशक्तिनीशी ओरडाव किंचाळाव वाटत होत पन दातखिळी बसल्यासारखी अवस्था झालेली.. पाय जमिनीत रूतल्यासारखा मला जागेवरून हालता येईना.. संपुर्ण शरिराला जणु लकवाच मारला... उघड्या डोळ्यांनी फक्त पहाण्याशिवाय काहीच करता येत नव्हत. अस वाटत होत की असह्य वेदनेन कण्हत होती, तळमळत होती आणी त्यामुळे रस्त्यावरचे खडे आजुबाजूला सरकत होते.. आता ती सावली माझ्याकड सरपटत येत असल्याच लक्षात आल... इतक्यात चरर्रर्रर्रर्र चर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज करत बाहेरच्या खांबावरची ट्युब फट्टकन गेली तशी बाहेरची ती भयान शांतता दुरवर पसरलेला काळोख आणखी गडद्द झाला... आकाशातल चंद्रबिंबाच्या नितळ प्रकाशात ती सावली आता आणखी गडद , काळीकुट्ट दिसु लागली... तीचा आवाजातली घरघर काळजाचा थरकाप उडवत होतीे... ती काळीतुट्ट आकृति तशीच जमिनीवरून माझ्या दिशेने सरकत पुढ येऊ लागली... मी मागे सरकण्याचा प्रयत्न करत होतो पन व्यर्थ... त्या आकृीतीन दरवाजा जवळ येत माझा डावा पाय घट्ट पकडला... एक घट्ट पकड जस एखाद्या श्वापदाच्या जबड्यात माझा पाय सापडला होत...घट्ट, आणखी घट्ट पकड करत ते मान वर करून माझ्याकड पाहु लागले.. लाल तांबुस रंगाचे डोळे माझ्यावर रोखले होते.. मी डोळे विस्फारुन त्याला पहात होतो की झट्टकन माझा पाय खेचला आणी मी जमीनिवर आपटलो... माझ लकवा मारल्यासारख शरीर कसलीच हलचाल करण्याच्या स्थितीत नव्हत... ते आता माझ्या अंगावर तसच सरपटत येत होत...
.......to be continued 
Story by sanjay kamble

प्रपोज. propos marathi horror story part-3

लाईट लागताच ती आकृती कुठेतरी नाहीशी झाली... मला आपेक्षीत होत की प्रकाशात ते कोण आहे समजेल पन झाल अगदी उलट... घरात जाव की तीथच थांबाव या संभ्रमावस्थेतच होतो की त्या घरात थोडा गोंधळ सुरू असल्या सारख वाटल. घरातुन कोणीतरी घाईतच बाहेर पडल. गोंधळलेल्या मनस्थितीतच होते...
Propos story
. तसे एकाच गल्लीत रहात असल्यान थोडी ओळख होतीच . मला समोर पाहताच हात करून बोलवल... कदाचीत अशा अवेळी हाक मारावी तर आजुबाजूचे लोक जागे होतील याची त्यांना भिती असावी.. मला बोलवुन ते घाईतच घरात शिरले . मी ही झपाझप पावल टाकीत त्यांच्या घरात गेलो ... 
"प्लीज एखादी रिक्शा पहाल का...?" त्यांचा प्रश्न मला समजला, म्हणजे कोणालातरी तातडीन हॉस्पीटलमधे न्याव लागणार होत... 
फोन लावत त्यांच्या घरात गेलो आणी दचकुन जागेवरच थीजलो... 'ती' जमीनिवर पडुन होती, निश्चल, खोबणीत गेलेले सताड उघडे डोळे आणी त्याखाली काळी वर्तुळे तयार झालेली , रूक्ष निर्जीव केस , चेहराही निस्तेज थकल्यासारखा दीसत होता....
"'प्रिया... काळजी करू नकोस बाळा.."
हुंदका आवरत तीची आई जवळ बसुन तीला शुध्दीवर आणायचा प्रयत्न करत होती...
*****
काही वेळातच तीला हॉस्पीटलमधे दाखल केल
तीची आई आणी बाबा दोघे हॉस्पीटल मधे होते तर भाऊ बाहेरगावी पाहुण्यांच्या घरी गेलेला... त्यांना गरज लागेल म्हणुन मी तीथच थांबलो..
डॉक्टर तपासून जायचे आणी नानात-हेचे रिपोर्ट तयार करत होते , मेंदुच काय संपुर्ण शरीर स्कॅन केल, ब्लड रिपोर्ट तपासु लागले... मी मात्र बघ्याच्या भुमिकेत सर्व लांबूनच पहात होतो.. रात्रीचे दोन वाजुन गेले होते.. जांभई देतच मी दोन्ही हात पैंटच्या खिशात घालुन चालत येत दरवाजावर लावलेल्या काचेतुन आत पाहील तर 'प्रिया' अजुनही बेशुद्ध अवस्थेत सलाईनच्या बॉटल मधुन थेंब थेंब ग्लुकोज तीच्या शरीरात जात होत तर बेडच्या मागे ए.सी.जी मशीनचा अखंड बीप बीप आवाज येत होता.. आणी इतक्यात माझी नजर तीथच कोप-यात गेली, रूग्णाची औषध ठेवण्याच्या छोट्या टेबल पलिकडे किंचीत हलचाल जाणवली... माझी नजर तीथच स्थिरावली... अगदी श्वास रोखुन मी पहात होतो.. काहीतरी होत तीथ... भुवया आकसुन मी नजर स्थिरावली आणी काळजात धस्स झाल.. त्या I.C.U. रूमच्या आतल्या ऊजव्या कोप-यात एक सावली दिसत होती... कोणतरी उभ असल्याची सावली आत कोणी डॉक्टर नर्स नव्हत्या पन तरी एक सावली होती , अगदी स्थीर, गंभीर , निश्चल धुसर अशी.... त्या काचेतून माझी नजर सर्वत्र फिरू लागली पन त्या पारदर्शक सावलीच रहस्य उलगडेना, 
मी तीच्या बाबांना सांगायच या उद्देशान त्यांना जवळ बोलवल..
"काका. त्या कोप-यात काही दिसतय का ?''
''कोणत्या कोप-यात...? काय आहे..?''
मी पुन्हा पाहील तर मघापासुन तीथ घुटमळणारी ती सावली आता दिसत नव्हती.. त्यांनी माझ्याकड पाहील.
''तुम्ही आराम करा इथे.. दिवसभर कामाने थकवा आला असेल म्हणुन अस काहीतरी भास होत असतील...''
त्यांनी नम्रतापुर्वक सांगीतल आणी मी ही बाजुच्या बेंचवर आडवा झालो...
*****
"hello..... " 
एका आवाजान हल्की जाग आली.. डोळ्यावर अजुनही झपड होतच... 
"Hello....उठताय का....?"
"आई झोपू दे ना ग... आज सुट्टी आहे...."
कोणीतरी तोंडावर किंचीत पाणी शिंपडल तसा सर्रर्रर्रर्रर कन अंगावर शहारा आला... झटकन उठलो.. तर समोर ती म्हणजे प्रिया उभी होती.. केस मागे बांधलेले तर अंगात पांढरट रंगाचा पंजाबी ड्रेस. हाताला पांढरी चिकटपट्टी सलाईन लावलेल्या शिरेवर.. मी तर पहातच राहीलो
" sorry तुम्ही...! तुम्ही इथ काय करताय....? चला आत बेडवर आराम करा....नर्स...( मी एका नर्सकडे पहात हाक दिली...) यांना आता घेऊन जा..."
" त्यांना डिस्चार्च दिलाय." नर्स म्हणाली 
"काय..... डिस्चार्ज......?"
"हो....." ती नर्स निघुन गेली....
" हो आपन घरी जातोय..." प्रिया म्हणाली 
"हे काय चाललय समजेल का प्लिज...?" मी भारी कन्फुज होतो....पन तीच्या तब्बेतीत बदल मात्र दिसत होता. 
" चला...... रिक्क्षा आणलीय....." तीचे बाबा चालत येत मला बघुन बोलु लागले....
" तुमच बरच जागरण झालय... आमच्यामुळ खुप त्रास झालाय तुम्हाला......"
मी चक्राऊन गेलेलो..... एक मुलगी जी रात्री I.C.U. मधे होती आणी आता घरी जातेय... व्यवस्थीत... इथले बरेच कर्मचारी, नर्स त्यांच्या परीचयाचे होते..
अॅडमीट पेशंटच्या जवळ जात त्यांची विचारपुस करायची तर एखाद्या पेशंटला स्वता:च आय.व्ही. लावायला मदत करायची... मनमोकळी, हसरी , तीचे वडील काऊंटर शेजारी उभे बील भरत होते तर तीची आई आणी मी बाजुला उभे तीला पहात होतो... 
"प्रिया... चल बाळा...."
तीच्या वडीलांनी हाक दिली तशी ती ही नर्स ना बाय म्हणत चालत आली. प्रश्न खुप होते पन विचारू तरी कस....?
" काल तुम्ही इतक्या सिरीयस कंन्डीशन मधे होतात आणी काही तासात पुन्हा व्यवस्थीत जस काही झालच नाही...? "
ती थोडी अस्वस्थ झाली... माझ्याकडे पहात शांतपने म्हणाली
" सांगेन नंतर... तुमचा नंबर द्या ... एकाच गल्लीत रहातो ना... तसेही तुमचे खुप उपकार झालेत..."
" उपकार..? मदत करण म्हणजे उपकार का..?" माझ्या बोलण्याला तीची आई उत्तर देत म्हणाली. 
" हो . उपकारच.. , ज्या अपार्टमेंट मधे रहात होतो तीथ अनुभवलय आम्ही.... ते स्वता:च्या बंद दरवाजाच्या कीहोल मधुन माझ्या मुलीची अवस्था पहायचे, आमची होणारी धावपळ पहायचे..! पन कोणीच मदतीला येत नव्हत....आमच्या मुलीची अशी अवस्था बघुन रक्ताची नातीही दुरावलीत..."
" अवस्था म्हणजे ....? " मी आश्चर्यान , विचारल....
" डॉक्टर म्हणतात तीला....." त्या पुढ बोलणार तोच तीचे वडील समोरून येत म्हणाले....
"चला ... रिक्शा आणलीये...."
सर्व रिक्शाने घरी पोहोचलो... या घाईत प्रियाचा नंबर मात्र आठवणीन घेतला...
*****
व्हॉट्सअॅप बनवणारे पन ग्रेट खरच... म्हणजे तीच्यासोबत आता व्हॉट्सअॅप वर बोलण रोजचच...खुप छान मैत्री झालेली आमची... आमच्या जॉबवर मोबाईल वापरायला बंदी होती पन मी online नसताना ही ती मात्र मेसेज, व्हिडीओ पाठवत रहायची.... मला तर तीची जणु सवयच झाली.. कुणास ठाऊक कस पण ती मला आवडु लागली होती... छान बोलका स्वभाव होता तीचा... बोलायची... मस्करी करायची... रागवायची आणी पुन्हा मी रागात आहे का पहायला पुन्हा मेसेज करून सॉरी म्हणायची... एखादा नवीन पदार्थ केला की तो कसा झालाय बघायला मलाच बोलवायची.. मी एकदा म्हंटल..
" तु खुपच छान जेवण बनवतेस आणी नवीन पदार्थ केलास की मलाच खायला देतेस , मग बाकीच्यांना.. thanks.... खर सांगु का आई..." प्लेटमधला पदार्थ खात तीच्या आईकडे पहात म्हणालो
"एवढा रिस्पेक्ट कोण देत नव्हत मला......" 
त्यावर प्रिया म्हणाली 
" मेडिकल ची स्टुडेंट आहे... आपला प्रयोग कसा झालाय हे एखाद्या प्राण्यावर टेस्ट करून बघायची जणु सवयच झालीये...."
त्यावर तीच्या घरात चांगलाच हाश्या पिकला... माझ केविलवान तोंड पहात हळुच स्वताचे कान पकडुन माफी मागितली...
पन राग नव्हता , तीच्या कसल्याच बोलण्याचा, मस्करीचा.... ती काही बोलुदे.. किती मस्करी करूदे छान वाटायच... तीला पाहील की सार जग हरवुन जायचो.. कारण माझ्यासाठी ती आता जगातली सर्वात आवडती होती , स्वताच्या जीवापेक्षा ही.. पन ते इथ आणखी किती दिवस आहेत हे माहीत नव्हत..
....to be continued 
Story by sanjay kamble

प्रपोज. propos marathi horror story part-1

" काळ्या जिभेची कुठली.... तोंड बंद कर नाहीतर बघ......." हॉस्पीटलच्या शांत वातावरणात महीला कर्मचारी एका पेशंटवर ओरडत होती, तीचा आवाज मात्र हॉस्पीटलच्या दुस-या मजल्यावरच्या संपुर्ण वार्डमधे घुमला......
दुपारची कडक उन्ह आता काहीशी कमी होत सुर्य क्षितीजाकडे झुकत चाललेला... पाय-या चढुन हॉस्पीटलच्या वॉर्ड मधुन इन्स्पेक्टर झपाझप पावल टाकत चालत येत होते त्यांच्या मागे दोन हवलदार आणी सोबतच हॉस्पीटलचे प्रमुख डॉक्टर जोशी त्यांच्याशी बोलु लागले..
" साहेब मी दोन दिवस मुंबईला होतो.. हैल्युसिनेशन या मानसिक आजारावर एक व्याख्यान आयोजित केलेल आणी मुख्य अतीथी म्हणुन मला बोलवलेल...."
Propos story

" बर मग तुम्ही कधी आलात...?"
इतक्यात त्यांच्या कानावर पुन्हा त्याच कर्मचारी स्त्रीचा आवाज पडला
" ए सटवे... काळ्या जीभेची कुठली... अस काहीतरी अभद्र बोलतेस म्हणुनच तुझ्या घरच्यांनी इथ ठेवलय...."
बोलता बोलता ती मागे फिरली आणी साहेबांना पाहुन दचकली... इन्स्पेक्टर तसेच चालत पुढ येत ती कर्मचारी ज्या पेशंटला रागवत होत्या त्या रूमच्या उघड्या दरवाजातुन पाहु लागले... काळोखान भरलेल्या त्या रुममधे कोप-यातुन किलकिल्या डोळ्यांवरच्या चष्म्याच्या पांढ-या काचा तेवढ्याच दिसत होत्या... कोणीतरी पहात होत.. पन तीची मात्र नजर स्थिरावली होती आपल्या समोरच्या रूम मधे...
" साहेब.... हीच रूम....." मावशी उद्गारल्या तसे साहेब मागे फिरले
"हम्म... तुम्ही कोण.....?"
" मी इथली वार्डन... 'मावशी' म्हणतात सगळे..." मावशींनी दाखवलेल्या रुमकडे साहेब पाहु लागले.... तो बंद दरवाजा किंचीत उघडला तशी समोरच्या खिडकीतुन मावळतीला गेलेल्या सुर्याची कोवळी किरणे आत पसरलेली दिसली...ते तसेेच चालत आत गेले.. एक छोटा बेड होता ज्यावर किंचीत रक्ताचे डाग दिसत होते.. समोरील खिडकीच्या पारदर्शक काचा फुटून बाहेरच्या बाजुला पडलेल्या... साहेबांनी खिडकीतुन बाहेर पाहील तर खाली दुरवर काचांचे तुकडे पसरलेले.. इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या हातातल्या त्या छोट्या स्टिक ने खिकडीच दार किंचीत पुढ केल आणी मागे फिरत पुन्हा ती खोली पाहु लागले... फर्शीवर ठिकठीकाणी रक्ताचे सुकलेले डाग पडलेले तर भिंतीवरही रक्त उडालेल.. अचानक साहेबांची नजर एके ठिकाणी स्थिरावली .... कोप-यात... भुवया आकसत ते खाली झुकले... तो मानवी हाताचा अर्धा तुटलेला अंगठा होत.. फॉरन्सिक टीमला नमुने घ्यायला सांगुन ते त्या रुमच्या दरवाजातुन बाहेर पडु लागले तशी त्यांची नजर समोरच्या रूमच्या किंचीत उघड्या दरवाजातुन आतल्या काळोखात दिसणा-या किलकील्या डोळ्यांवर गेली... तसा त्या खोलीतुन आवाज आला..
" अंत झाला शेवटी... पन अंत की सुरवात... की सुरवात होण्याआधी अंत.... त्यान मुक्त केल शेवटी... एक बळी देऊन तीला मुक्त केल..."
मावशी रागाने तो दरवाजा बंद करत म्हणाल्या..
" साहेब, ही सुजाता.... काय त्या आजाराच नाव....हालू.... हालू...."
" हैल्युलिनेशन......" डॉक्टर जोशी उद्गारले....
" हा तेच ते.... भुत बीत दीसत म्हणते तीला..... काय पन नमुणे येतात...."
पन त्यांच्या बोलण्याकड लक्ष न देता इन्स्पेक्टर चालत पुढ निघाले.... दोन्ही बाजुला दिसणा-या रुग्णाच्या खोल्या पहात सर्व डाव्या बाजुला मोडकळीला आलेल्या बाथरुमजवळ पोहोचले... तीथ आधीच उभ्या दोन वयस्कर व्यक्ती बाजुला सरकल्या त्यातला एक वॉचमन तर दुसरा त्या मावशीचा नवरा दोघेही हॉस्पीटल च्या आवारात त्यांना बाधुन दिलेल्या खोलीत रहायचे...
इन्स्पेक्टर बाथरूमच्या उघड्या दरवाजातुन आत आले... बाथरूमच्या . आतल्या पांढ-या फर्शीवर एक प्रेत पडलेल... बाजुलाच पडलेला एक धारदार प्युअर स्टेनलेस स्टीलचा चाकु भिंतीवरील बल्बच्या प्रकाशात चकाकत होता. त्या चाकुच्या धारधार दात-यांमधे त्याच्या मांसाचे बारीक लालसर कण अडकलेले अगदी स्पष्ट दिसत होते. गळा चिरून त्याचा खुन झालेला, त्याच्या जखमेतून भळाभळा वाहणार रक्त हवेच्या संपर्कात आल्यान घट्ट होऊन बाथरूमच्या पांढ-या फर्शीवर पसरल्यान त्याचा लाल रंग खुपच भडक दिसत होता.. त्याचा एक जाडसर थरच तयार झालेला. रक्तात पुरत भिजुन पालथ पडलेल त्याच शरीर निष्प्रान झाल असल तरी डोळे मात्र सताड उघडे एके ठिकानी स्थिरावली होती... इन्स्पेक्टर साहेबांनी समोरच्या आरशाकड पाहील, आरशाच्या त्या काचेवर मोठ्या अक्षरात काहीतरी लिहील होत... दोनच शब्द .. अर्धवट संदेश... पन त्या दोन शब्दांच कोड उलगडेना... कदाचीत खुन करून पसार होण्याच्या नादात तो अर्धवट राहीला असावा.. इन्स्पेक्टर त्या प्रेताकड पाहात म्हणाले ..
" खुन करुन खुनी पसार झाला पन कुणीच पाहील नाही.... वाॅचमन झोपला होता काय...?"
पन सर्व तसेच शांत उभे होते... साहेबांना वॉशबेसीनवर एक मोबाईल ठेवलेला दिसला.. इन्स्पेक्टर साहेबांनी खिशातला पांढरा रुमाल काढुन तो मोबाईल उचचला.... 
'Sound recorder' ऑप्शन सुरू होत... एक रेकॉर्ड केलेला मेसेज.... मोबाईल फ्लाईट मोडमधे टाकलेला ....
मोबाईल हातात घेत त्यांनी एक नजर सर्वांकडे पाहील... डॉक्टर जोशी शांतपने साहेबांकडे पहात होते तर त्यांचा स्टाफ एकमेकांत कुजबूज करीत होता...
त्यानी तो मेसेज प्ले केला.... तशी सर्वांची कुजबूज थांबली... सर्वच तो शांतपने ऐकु लागले... कदाचीत हा खुन करणा-यानच हा मेसेज ठेवलेला असेल...
एका गुढ शांततेनंतर त्या मोबाईल मधुन एका युवकाचा आवाज येऊ लागला...
प्रेम......? हं..... प्रेम.......! 
प्रेम आंधळ असत अस म्हणतात...
प्रेम म्हणजे या जगातली सर्वात सुंदर कल्पना... कधी नुसती कल्पना,तर कधी भयान वास्तव.
कधी सुरेख चांदण, तर कधी भयान काळोख.. कधी आयुष्यभराची सोबत तर कधी अर्ध्यातच शेवट. तो ही भिषण... काळजाचा थरकाप उडवणारा शेवट...
तुम्हीही केल असेल प्रेम .. म्हणजे अजुनही करत असाल.. प्रियकर म्हणुन काय करू शकतो आपण तीच्या साठी... तीच्या निरागस चेह-यावर चांदण खुलवण्यासाठी.. तीच्या आयुष्यात इंद्रधणुषी रंग भरण्यासाठी...
मी ही केल.. त्या आंधळ्या प्रेमाचा अंत असा रक्तरंजीत होऊन संपेल हा विचारही मनात आला नव्हता..
पन हा अंत होता की अंताची सुरवात , की सुरवात होण्याआधीच अंत.
दोन आठवड्यापुर्वीची ती घटना...
'त्या' रात्रीे... म्हणजे साधारण दहा, साडे दहा वाजायला आले होते. ही वेळ म्हणजे सामान्यता: जेवण उरकुन बाहेर कट्ट्यावर गप्पा मारण्याची. चंद्राची कोर अगदी मंदपने ढगांच्या मागुन हळुच डोकावत पुन्हा ढगांच्या मागे लपुन जायची.. थंडी तर कमालीची त्यात अंगाला झोंबणारी छानशी हवा सुटलेली... आम्हा मित्रांच्या गप्पा रंगात आलेल्या...
तोच एका मुलीच्या भयान, ह्रदय पिळवटून टाकणा-या आर्त किंकाळीने आम्ही सर्वच हादरून गेले.. मघापासुन मजेशीर गप्पांनी पिकनारा हाशा एकदम बंदच झाला... सर्वच ताडकन उठुन उभे रहात एकमेकांना प्रश्नार्थी नजरेने पहात आजुबाजुलाही नजर फिरवू लागलो... गल्ली पुर्ण शांत दिसत होती... त्यातच एक दोन विजेचे दिवे तेवढेच शिल्लक होते. तसेच सर्व त्या आवाजाच्या दिशेने पाहु लागलो.. पण आवाज कुठून आला समजल नाही.. त्या आवाजाने आजुबाजूच्या घरातील लोक ही पटापट बाहेर पडत एकमेकांकडे थोडी भिती आणि आश्चर्यान पाहु लागले.
आमची आपसात कुजबूज सुरू झाली तशी पुन्हा ती आर्त किंकाळी ऐकु आली... आवाज ज्या घरातुन येत होता ते साधारण आमच्या गल्लीतच साठ ते सत्तर मीटर अंतरावर असेल...
....to be continue 
Next part 
Story by sanjay kamble

प्रपोज Propos marathi horror story part-2

 एका मुलीच्या भयान, ह्रदय पिळवटून टाकणा-या आर्त किंकाळीने आम्ही सर्वच हादरून गेले.. मघापासुन मजेशीर गप्पांनी पिकनारा हाशा एकदम बंदच झाला... सर्वच ताडकन उठुन उभे रहात एकमेकांना प्रश्नार्थी नजरेने पहात आजुबाजुलाही नजर फिरवू लागलो... गल्ली पुर्ण शांत दिसत होती... त्यातच एक दोन विजेचे दिवे तेवढेच शिल्लक होते. तसेच सर्व त्या आवाजाच्या दिशेने पाहु लागलो.. पण आवाज कुठून आला समजल नाही.. त्या आवाजाने आजुबाजूच्या घरातील लोक ही पटापट बाहेर पडत एकमेकांकडे थोडी भिती आणि आश्चर्यान पाहु लागले.
Propos story

आमची आपसात कुजबूज सुरू झाली तशी पुन्हा ती आर्त किंकाळी ऐकु आली... आवाज ज्या घरातुन येत होता ते साधारण आमच्या गल्लीतच साठ ते सत्तर मीटर अंतरावर असेल... आम्ही तसेच धावत त्या घराकडे निघालो रस्ता तसा कच्चाच होता. आणि त्यात भर म्हणुन रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावरील दिवा गल्लीतीलच काही टवाळखोर , आणि शुद्ध मराठी भाषेत सांगायच तर गल्लीतुन ओवाळुन टाकलेल्या दिवट्यांनी फोडले होते. त्यामुळे खुपच अंधार होता.. पन ज्या घरातुन ती आर्त किंकाळी आली होती त्यांच्या दारात लावलाला बल्ब आपल्या परीन अंधार दुर करण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत होता...
त्या घरात काही दिवसापुर्वी एक कुटूंम्ब रहायला आल होत. पती, पत्नी त्यांचा मुलगा जो बारावीला होता ,आणि मोठी मुलगी एकवीस, बावीस वर्षची असेल.. ती मेडीकलची स्टुडेंट होती.. दिसायला खुपच गोरीपान , लांब आणी किंचीतसे तांबूस केस, निळसर आणि काजळ घातल्या सारखे डोळे, रेखीव चेहरा तर अंगाने नाजुक, अगदीच बारीक होती. पहील्या नजरेतच सहज मनात भरेल अशी. आता हे सगळ वर्णन मला कट्ट्यावर खुपशा मित्रांच्या तोंडुन ऐकायला भेटलेल, पण प्रत्यक्षात तीला पहाण्याचा योग आजवर आला नव्हता... ती आमच्या गल्लीत रहायला आल्यापासुन संपुर्ण गावातीलच मुलांच्या मोटरसायकच्या फे-या आमच्या गल्लीतुन वाढल्या होत्या... 
आम्ही धावतच त्यांच्या घराजवळ आलो आणि दरवाजा वाजवत बाहेरुन आवाज दिला तशी पुन्हा ती किंकाळी आणि वेदनेन कन्हत असलेला आवाज येऊ लागला.. आता मात्र नाईलाज झाला होता. सर्वाना बाजुला करत एक जोरदार लाथ घातली तसा खाडकन दरवाजा कडीमधून तूटला . पटापट आत शिरलो तर घरात वस्तू विस्कटल्या होत्या. समोर तीची आई डोक्याला हात लाऊन भिंतीला टेक रडत ऊभी होती. तर बाजुला तीचे वडिल तीला खुर्चीवर जखडून धरत होते. तीचा भाऊ देखील आपल्या बहीणीला जखडून ठेवण्यायाठी वडीलांना मदत करत होता. काय चाललय हे समजत नव्हत. समोरचे हे दृष्य पाहून आम्ही सर्वच गोंधळुन गेलो होतो. तोच आमच्या तील एकजन ओरडला.
"काय हे..? काय करताय हे...? का स्वता:च्या मुलीसोबत अस करताय. सोडा तीला..." 
तस सगळ वातावरण एकदम शांत झाल.. ती मुलगी ही खुर्चीवर बसुन तशीच रडत होती. तीच्या वडिलांनी हाताची पकड सैल करत बाजुला झाले. तीला पाहुन आम्ही सगळेच चक्राऊन गेलो... पांढरा गाऊन अंगात होता, तीचे केस पुर्णपणे विस्कटून चेह-यावर पसरले होते.. दोन्ही हातानी खुर्ची घट्ट पकडलेली त्यामुळे तीच्या हातावर ऊठलेले ओरखडे आणि त्यातुन वहाणार किंचीतस रक्त, तीच्या नाजुक त्वचेवरुन स्पष्ट दिसत होते. हतबल झाल्यासारखे डोक्याला हात लाऊन तीचे वडिल आपल्या मुलीकडे पहात हुंदका आवरत जमिनीवर बसले . तीचा भाऊ ही शांत पने बाजुला झाला तशी तीची आई पदराने डोळे पुसत आपल्या मुलीजवळ गेली.. आम्ही मात्र तसेच ऊभे राहून फक्त पहात होतो. काय झालय काहीच समजत नव्हत. तीच्या आई ने जवळ जात चेह-यावर पसरलेले केस बाजुला केले तसे मी प्रथमच तीला पाहीले. आजवर मुलांकडुन ऐकलेल तीच वर्णन मिळतजुळतच होत. दिसायला खुपच गोरीपान असली तरी निष्तेज वाटत होती, चेह-यावर ठिकठीकानी नख ओरबडल्याच्या खुणा. लांब केस पन कोणीतरी खेचुन आढुन त्याना रुक्ष केल्यासारखे वाटत हेते, निळसर डोळे पन खुपच थकल्या सारखे. तीला पाहून अस वाटल की ही मुलगी एका भयानक दीर्घ आजारान ग्रासली असवी. तीला पाहुन नकळत एक वाक्य ओठांवर आल ..
" शापित सौंदर्य..."
आमच्या पाठोपाठ धावत आलेल्या मित्रांच्या वडिलांनी काय झालय विचारले, तसे ते म्हणाले
" काहीतरी पाप केल असेल मी मागच्या जन्मात, त्याचीच फळ मी भोगतेय..." पन काय झालय हे त्यानी सांगायच जाणुन बुजून टाळल...
आपल्या आईच्या कुशीत शिरुन ती भितीन थरथर कापत आजुबाजूला पहात होती...
*****
सकाळी ड्युटीवर जायला उशीरच झाला , कदाचीत काल रात्री त्या मुलीचा, म्हणजे तीच्या अवस्थेचा विचार करत होतो त्यामुळे लवकर झोप लागली नव्हती.. हातांवर, गालावर ,मानेवर नख्यांनी ओरबडलेल्या जखमा .. रात्रभर तेच दृष्य डोळ्यांसमोर येत होत... बाईक वरून काही अंतरावर गेलो तस लक्षात आल की मोबाइल घरीच राहीला आहे... बाईक वळवली तशी ती येताना दिसली.. तीचे वडिल गाडी चालवत होते... ती मागे बसली होती , तोंडाला रूमाल गुंडाळला असला तरी तीच्या डोळ्यावरून तीला ओळखल... ते गाडीवरुन पुढे गेले तसे तीच्यावर इंप्रेशन मारण्यासाठी रिकामटेकड्या तरूणांच्या गाड्या त्यांच्या मागे वेडीवाकडी वळण घेत सुटल्या...
*****
या घटनेला दोन दिवस उलटुन गेले होते... काम खुप वाढल्यामुळे आता मला घरी यायला बराच उशीर होत होता त्यामुळे मित्रांच्या भेटी कमी होऊ लागल्या...
रात्री नेहमीप्रमाणेच उशीरा घरी आलो... कट्ट्यावर जायची इच्छा होती पन खुपच थकलो होतो.. जेवण आवरुन झोप येईपर्यन्त टीवी पाहु लागलो.. पन कधी झोप लागली कळलच नाही... जाग आली ती कुत्र्यांच्या भुंकण्याने.. खुपच गोंधळ माजला होता... बाहेर जणु शहरातली सगळी कुत्री एकत्र येऊन जोरजोरात रडत, भुंकत होतीत... कोणीतरी बाहेर येऊन त्यांना हूसकाऊन लावेल म्हणुन वाट पहात होतो पन व्यर्थ , वैताग आला, तडक उठलो आणी दरवाजा उघडुन चालत रस्त्यावर आलो ... आवाजाच्या दिशेन पाहील तर तो दहा, बारा कुत्र्यांचा झुंड भुंकत, रडत होता... माझ्यापासुन काही अंतरावर असलेल्या विद्युत खांबावरील पांढ-या ट्युबलाईटने रस्ता अगदी स्पष्ट द्सत होता पन तो कळप जिथ भुंकत होता तीथल्या खांबावरील ट्युब लहान मुलांनी दगड मारुन फोडल्यान बंदच होती, त्यामुळे ती नेमक कोणावर भुंकत होती हे समजत नव्हत.. मला त्या आवाजान झोप येत नव्हती म्हणुन बाजुचाच एक लहानसा दगड उचलुन हातात घेतला आणी त्यांच्या दिशेने भिरकावला तस कुइssss कुईsssss करत धावतच तो झुंड अंधारात नाहीसा झाला पन भुंकण चालुच होत फक्त आवाज कमी होता... पुन्हा एकदा रस्त्यावर नजर टाकली तर जीथ त्या श्वानांचा गोंधळ चालु होत तीथच घराला लागुन बांधलेल्या कट्ट्यावर कोणीतरी बसल होत. कोण आहे हे स्पष्ट दिसत नसल तरी आकारावरुन आणी किंचीतशा होत असलेल्या हलचालीवरून तरी वाटत होत की कोणीतरी होत... जे त्या घराजवळ घुटमळत होत.. मी तसच चालत पुढ जाऊन पहायचा निर्णय घेतला... एक म्हणजे गल्ली आमची त्यात चोरांचा सुळसूळाट , लक्ष ठेवावच लागत... मोबाईल कानाला लावत मी तसाच पुढ निघालो तसा 'ते' हळूच उठुन उभ राहु लागल, मी ही त्याच्यावरच नजर ठेऊन होतो.. पन मी त्याच्या दिशेन जाताना ते ही घराच्या दरवाजाकडे सरकत गेल.. आता जेमतेम 20 पावलांच अंतर असेल मी त्याच्याकडेच पहात होतो पन दरवाजाची चौकट काहीशी आत असल्यान आणी खांबावरील बंद विजेच्या दिव्यांमुळे तीथ लख्ख काळोख पसरलेला . 
आता तो दरवाजा पाच एक फुटांवर असेल पन मघापासुन घुटमळणार ते जे कोणी होत ते तीथ दिसत नव्हत... मी ही मोबाईलचा टॉर्च सुरू करून त्या काळोखात पुरता बुडालेल्या दरवाजावर पांढरा एल ए डी लाईट पाडला पन काहीच नव्हत. ते जे कोणी होत ते कदाचित तीथुन पळून गेल असाव.. थोडा वेळ मी तीथ आजुबाजूला नजर फिरवली पन व्यर्थ... पन मघाशी मी हाकलुन लावलेल्या कुत्र्यांच्या कळपातील काही दुर रिकाम्या टेकडीवर उभी राहुन भुंकत होतीत. रात्रीच्या या निरव शांततेत कोल्हेकुई व्हावी तसाच काहीसा त्यांचा आवाज वाटत होता... कदाचीत चोर असावा नाहीतर मला बघुन का लपुन बसला असता... मी माघारी फिरत पुन्हा टॉर्च दरवाजावर रोखला पन काहीच नाही. दुरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर येता येता तो ही बंद झाला , राहीली ती निरव शांतता. मध्यरात्रीच्या त्या शांत वातावरणात रातकिड्यांचा मंद आवाज तेवढाच येऊ लागलेला , मी तसाच चालत घराकडे परतू लागलो पन चालत येतान अस वाटल की कोणीतरी माझ्या मागे येतय.... चालत.... ती चाहुल जाणवली तसा मी चालण्याचा वेग कमी केला . मागुन येणारा पावलांचा आवाज अगदी जवळ येत असल्यासारखा वाटला ... कदाचीत मघाशी मला पाहुन लपलेला तो इसम असावा म्हणुन मी ही चौकस राहीलो .. इतक्यात माझ्या मानेवर काहीतरी वळवळत असल्यासारख वाटु लागल मी झटक्यासरशी ते बाजुला केल , लाईटच्या खांबावरील पाखरू असाव म्हणुन मी दुर्लक्ष केल तोच कोणातरी माझ्या खांद्यावर हात ठेवला...मान किंचीत बाजुला झुकवत नजर तीरकी केली तसा एक काळाकुट्ट हात माझ्या खांद्यावरून सरकत मागे गेला.. झटकन मागे फिरून पाहील.... काळजात धस्स झाल... जेमतेम पंन्नास पावलांवर रस्त्याच्या मधोमध कोणीतरी उभ होत. दुरवरील खांबावरच्या त्या ट्युबच्या अंधुक प्रकाशात त्याची काळी आकृती तेवढीच दिसत होती. ते उभ होत पन त्याचे दोन्ही हात जमीनीला स्पर्श करत होते, अगदी शांतपने उभी ती भयान आकृति रखरखत्या क्रुर नजरेन माझ्याकडेच पहात होता.. माझ्याइतकीच साधारणच उंची म्हणजे 6 फुटाला थोडीच कमी अंगानेही जेमतेम. एखाद्या सावलीप्रमाणे धुसर आकृती मी भुवया आकसून पहाताना माझ्या काळजाची धडधड मला स्पष्ट ऐकु येत होती.. इतक्यात त्याच्या समोरच्या घरातल्या लाईट लागल्या आणी काळजात धस्स झाल. म्हणजे अंगावर सरसरून काटा आला तो ही भीतीन... कारण लाईट लागताच ती आकृती कुठेतरी नाहीशी झाली... मला आपेक्षीत होत की प्रकाशात ते कोण आहे 
......to be continued 
 Next part
Story by sanjay kamble

घात. Ghaat marathi horror story part-7

काही करा...पन मी तुमच्यापैकी कुणालाच सोडणार नाही .... पोलिसाना सर्व सांगनार..." रडत , हुंदके देत ती जणु त्यांना चेतावणी देत होती, तसा प्रत्येकजन एकमेकाकडे पाहु लागला. त्यात उमेश रागाने वेडा झाला... गायत्रीला चार शिव्या हासडतच पुढ सरसावला. जोरजोरात तीच्या मुस्काटात लगावल्या, मी पुढ जात त्याच्या समोर हात जोडु लागले पन मला बाजुला ढकलुन लावल...  आपल्या खिशातुन लोखंडी पट्टीसारखी वस्तु बाहेर काढत गायत्रीकड पाहील.. तीच्या अंगात उभ रहायच ताकत उरली नव्हती,  विस्कटलेल्या केसांत जमिनीवरची माती , पालापाचोळ चिकटुन बसलेला, चिंधड्या झालेल्या अंगावरची कपडे रक्त धुळीन माखलेली...
तीच्या गळ्याला गच्च पकडत आपल्या मित्रांकड पहात उमेश म्हणाला....
" शेवटचा राऊंड कोण करणार काय रे...?"
तसा एकजन म्हणाला.... 
Ghaat

" शेवटचा का रे....?"
" कारण इथुनपुढे ही 'सुहानी' सारखी हवी तेव्हा चघळायला मिळणार नाही.."
हातातली पट्टी गायत्री समोर धरत त्यान त्या पट्टीवरच बटन दाबल तस सट्टकन धारधार चाकुच लखलखत पात बाहेर आल...
" पोलीसात जाणार...?"
एवढेच शब्द उमेशच्या तोंडातुन बाहेर पडले आणी खस्स्स्स कन चाकू तीच्या पोटात आरपार खुपसला... हे पाहून माझे हातपायच गळून पडले... गायत्री जीवाच्या आकांतान वेदनेन तळमळत होती उमेश मात्र  एकापाठोपाठ एक असे वार करतच राहीला. "
सगळ शांतपणे ऐकत होतो पन मनात लाव्हा उसळत होता... तशी ती पुढे म्हणाली..
" गायत्री...सताड उघड्या डोळ्यांनी ती प्रत्येकाला पहात कधी गतप्राण झाली हेच कळल नाही...तीला मारुन त्यांनी तीथेच एका झाडाखाली खड्डा कढुन पुरून टाकले आणि मलाही असेच मारण्याची धमकी देऊन सोडून दिले... त्या रात्रि घरी परतले आणि college ला आलेच नाही.. पन ते एवढ्यावरच थांबले नाहीत.. चैनीला पैसे कमी पडले की त्या MMS ची धमकी देऊन माझ शरीर विकायला सुरवात केली...मला त्यांनी वैश्या बनवुन टाकल होत रे..."
सुहानी हुंदके देऊन रडत होती, तीची अवस्था समजुन घेण्यापलिकडे होती...
"  गायत्रीची सुटका झाली पन मी रोज मरण यातना भोगत राहिले.... त्यांच्यातले तीघे मेले, बर वाटल, पन त्या दोघानी काल माझ्या छोट्या बहिनीला सोबत आणायला सांगितल तसा माझा नाईलाज झाला.. हे आयुष्याच संपवून या नरकातुन मुक्त व्हायच ठरवल...  पन त्या नराधमानी फक्त माझाच नाही आपल्या college मधील आणखी मुलींचे MMS बनवले होते. .."
तीच बोलण ऐकुन तर माझ सर्वस्वच हरवुन गेल्यासारख वाटल. डोळ्यातून घळा घळा पाणी येत होत... मनाला असह्य यातना होत होत्या.. एक क्षण वाटल की छाती फाडून काळीज काढाव आणि दुर कुठेतरी फेकून द्याव...काय उपयोग होता त्याचा... माझी गायत्री... किती निरागस .. किती हळवी होती. तीच हसण, बोलण सार काही संपल होत... सावत्र आईनही छळ मांडलेला, पन सहन करत होती, कुणाला न सांगता, कुठतरी प्रेमाचा ओलावा भेटु लागला होता पन नशीबान तो ही हिराऊन घेतला, तीच्याकडून....  खुप खुप रडावस वाटत होत, फक्त एकदा तीला घट्ट मिठी मारुन मनातल सार दु:ख बाहेर काढावस वाटत होत...
मला अश्रु अनावर झालेले... मनात म्हंटल...
' गायत्री.... खुप सहन केलस ग तु... पन तुझा अभिमान वाटतोय.... त्या राक्षसांना संपवलस.. तुझ्यावर प्रेम केल ते क्षण आयुष्यभर मनात राहतील...'
     
इतक्यात बाहेर कसलातरी गोंधळ उडाल्यासारख जाणवल.. कोणीतरी आत येण्यासाठी विनवणी करत होत.. काही कळायच्या आत तो मुलगा आत आला.. त्याला पाहून सुहानी भीतीन शहारली आणि माझा हात घट्ट पकडला.. त्या मुलाच अंग घामान भिजल होत... कपडे चिखलाने बरबटलेले आणी ठिकठीकानी फाटले होते.. अंगावर खरचटल्याच्या जखमा आणि एका अनामीक भीतीने डोळ्यातून वहाणार पाणी...
मी त्याला पहाताच ओळखल तसा तो दोन्ही हात जोडत सुहानी समोर गुडघ्यावर बसत रडतच म्हणाला...
"सुहानी... माफ कर मला.... आमच्यामुळे तुझी ही अवस्था झाली .... पन ती आम्हाला जीवंत सोडणार नाही... " 
मला थोड आश्चर्य वाटल तसा तो पुढ बोलु लागला...
" तीन आधी विशाल ला, मग उमेश, अनिकेत संपवल, आणि परवा तुम्ही पोलीसांच्या स्वाधीन केलेला माझा मित्र दिपक... काल  hospital मधे admit दिपक न सर्जीकल ब्लेड ने स्वतावर अनेक वार करून घेतले आणि मग hospital च्या बिल्डिंग वरून ऊडी मारून आत्महत्या केली..पन मला माहिती आहे, हे तीन करायला भाग पाडल...."
त्याच बोलन ऐकुन आम्ही तीघही सुन्न झालो... " क......कोणी केल हे..."
तोच एक थंड वा-याची झुळूक बाजुच्या खिडकीतून आत आली...
माझ बोलण ऐकुन त्यान माझ्या कडे पाहिल तस तो शहारला.. डोळ्यात एक भीती दाटली...  तसाच हात जोडत तो रडू लागला...
" गायत्री.... माफ कर मला..... पुन्हा कुठल्याच मुलीच्या इज्जतीशी खेळणार नाही...."
मला काही समजत नव्हत... तो माझ्याकडे बोलून का बोलतोय...
तसा तो पुन्हा बोलु लागला...
"संजु ,ती तुझ्या जवळच आहे...... गायत्री..."
आम्ही तीघेही  म्गे पहात एकमेकांकडे प्रश्नार्थी नजरेन पहील तसा तो ओरडला...
" प्लीज... मला जिवंत सोड.." आणी
क्षणात त्याच्या चेह-यावरील भाव बदलले... अचानक त्याचा चेहरा रागिट झाला, डोळ्यातून जणु लाल रक्तच... त्याच हे भयान रुप पाहील तशी माझ्या मागे उभी वर्षा किंचाळली... तीचा आवाज ऐकुन बाहेर उभे डॉक्टर, नर्स धावतच आत आले... काही समजायच्या आत त्यान टेबलवरची कात्री उचलली आणि खसाखस स्वताच्या पोटात घुसवली, तसे आम्ही सर्वच थक्क झालो.. तो रडत, ओरडत स्वताला वाचवण्यासाठी विणवनी करत होता आणि दुस-याच क्षणी ती कात्री एकसारखी पोटात घुसवून घेऊ लागला... ते दृष्य पाहुन त्याला पकडायला कंपौंडर आणि वॉर्डबॉय धावले पन तो मागे धावत सुटला आणि खिडकीची काच फोडून तीस-या मजल्यावरून खाली उडी मारली... पडताना त्याच्या शरीरातुन एक पांढरट आकृति बाहेर पडली आणि थंड
वा-याची झुळूक बाजुच्या खिडकीतून आत आली... तसा अंगावर काटा आला...पन हा स्पर्श माझ्यासाठी नवा नव्हता...
*****
" साहेब एका मुलान वेडाच्या भरात हॉस्पिटलच्या खिडकीतुन उडी मारून आत्महत्या केलीय.... हो लवकर या..."
डॉक्टर फोनवर बोलत होते... 
वैज्ञानिक दृष्टीकोनातुन डॉक्टर मिळुन
त्याच्या आत्महत्येच विश्लेषण करत होते.. 'Hallucinations,  Schizophrenia and Multiple Personality Disorder' असे काही जड शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होते...  
  वर्षाने सुहानीचा हात तसाच घट्ट पकडून धरत म्हणाली ...
" तिचा बदला पुर्ण केला. आणि तु स्वताला एकट समजु नको... आम्ही आहोत ना...." तीचा निरोप घेऊन अश्रु लपवतच बाहेर पडलो.... काळीज फाटुन चिंधड्या झालेल..
' का तीला संपवल असेल...? आई बाबाच्या प्रेमाला पोरकी झालेली माझी गायत्री , का तीची थोडीशीही दया त्या नरपिशाच्च्यांना आली नसेल... तीच गोड, निरागस रुप आता कायमच नजरेआड झालय. पन या मनाला कस समजाऊ... एक क्षण तीच्यापासुन दुर राहण्याचा विचार सहन होत नव्हता आणी आता तर हे एवढ मोठ आयुष्य कस जगायच... एकट्यान.... एकच मार्ग आहे,.... हो ..... एकच मार्ग... 'गायत्री' तुझ्यासाठीच ..'
नाव मनात उमटल आणी निश्चय पक्का झाला..
अंत करायचा..तिच्याशिवाय निरर्थक अशा या आयुष्याचा.... चालत एव्हाना तळमजल्यतल्या
पार्किंग मधे पोहोचलो... खुपसारी वाहन दुचाकी एका रेषेत दिसत होत्या . ट्युबच्या प्रकाशात सर्व काही स्पष्ट दिसत होत... पर्किंगमधे कोणीच नव्हत दुर गेटजवळ वयस्कर वॉचमन तेवढा पांढ-या फायबर खुर्चीत शरिर गोळा करून बसलेला... मी चालत गाडीपाशी येत वर्षाला विचारल..
" खर प्रेम करणारा शेवटी एकटाच का रहातो ग ...?."
बोलता बोलता मला गहीवरून आल.
"का अस होत ग... ?  पन जरी ती या जगातुन गेली असली तरी मनातुन कधीच जाणार नाही.....!!! ." 
तीच्याकडे काहीच उत्तर नव्हत... मागुन येत तीन फक्त माझा हात घट्ट पकडत थोडा धीर दिला आणी दुस-या क्षणी माझ्या कानात हळूवार पने कोणीतरी पुटपूटल..
" जगासाठी या जगी नसले तरी तुझ्यासाठी तुझ्यापाशी असेन मी...."
तो आवाज गायत्रीचा होता... हो..... गायत्रीचाच... मी चटकन ओळखल, तीच्या तोंडुन कळत नकळत बाहेर पडलेले शब्द जणु माझ्या गायत्रीचेच होते...गर्र कन मान वळवून मागे वर्षाकडे पाहील, पन माझा स्वताःवर स्वता:च्या नजरेवर विश्वास बसत नव्हता... ती बोलत होती आणी मी मात्र आश्चर्याने तीच्याकडे पहात होतो..माझा हात आपल्या हातात घेत म्हणाली..
" प्रेम करते तुझ्यावर, म्हणुन आजही मला मुक्ती नाही भेटली, रोज तुझ्या रुममधे बसुन तुला पाहते, मला भेटायला तुझ्या मनाची तडफड जाणवते, पन नशीब नव्हत माझ, तुझ्याकडुन प्रेम मिळवायच..."
तीचा आवाज मी ओळखला..
" गायत्री.....?
" हो रे... मी.......गायत्री... तुझी 'प्रेमिका'...  फक्त एक करशील का रे माझ्यासाठी...." <

घात. Ghaat marathi horror story part-6

का रे....? काय झाल..?" सचिन झटकन उभा रहीला..
सगळे माझ्याकड पहु लागले...
Ghaat

******
हॉस्पिटलमधे रुग्णांची आणी नातेवाईकांची नेहमीची वर्दळ होती.  आमचा आठ दहा जणांचा ग्रुप एकदम आत शिरला..
" मॅडम..... "
रिसेप्शनिस्ट काउंटर वर उभ्या मुलीला सचिनन् पेशंटच नाव सांगितल...
" दुसरा मजला...." तेवढ ऐकताच सर्व पाय-या चढुन वर आलो..
समोरच लाकडी बाकावर तीची बहीण आईच्या कुशीत डोक खुपसुन रडत होती तर आई सुन्न झाल्यासारखी शुन्यात पहात होती पन अश्रु मात्र एकसारखे वहात होते... तीचे वडील डॉक्टरांना विनवण्या करुन आपल्या मुलीचा जीव वाचवा म्हणत धाय मोकलुन रडत होते... आम्ही मित्र पुढे गेली तसे त्यांना जास्तच गहीवरुन आल... त्यांना धीर देत ICU च्या काचेतून आत पाहील तर ती बेशुद्ध अवस्थेत होती... आणि तरीही तीचे अश्रु तीच्या गालांवरुन ओघळत होते... तीला पाहुन वर्षाला तर हूंदकाच आला.
खुप प्रश्न माझ्या मनात होते आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त तीच देऊ शकत होती... आम्ही सगळेच तीचा जीव वाचावा यासाठी देवाचा धावा करत होतो..
डॉक्टर रुम मधुन बाहेर येत म्हणाले
" विष पुर्ण शरीरात पसरलय.. येत्या ४८ तासात काही होऊ शकत...  तीच्या मनावर एक भयंकर दडपन आहे. म्हणूनच तीन विष खाल्ल असनार.. तीच मन हलक व्हायला हव.."
आम्ही समजुन गेलो होतो तीन अस का केल.. आणी तीच्या आई बाबांना धीर देत तीथुन बाहेर पडलो...
****
    college मधील त्या मुलांकडून समजलेले सत्य राहून राहुन मन विचलित करत होते... मनात विचारांच काहुर माजलेल. एक एक भयान सत्य राक्षसी जबडा पसरुन ऊभ रहात होत.. आणी पुढ काय वाढुन ठेवलय हे विचार करण्याचही धाडस होईना...
तोच मोबाईलच्या रिंगचा आवाज आला...
वर्षा होती...
" बोल ना..." उदासवाण्या आवाजात मी मंटल
" ती शुद्धीवर आलीये आणी तुझ्यासोबत बोलायच आहे.."
क्षणाचाही विलंब न करता college मधुन वर्षाला घेऊन तसाच hospital मधे गेलो. ती शुद्धीवर आली होती पन कोणाशीच बोलत नव्हती...
   भीतीपोटी ती आई वडीलाशी काहीच बोलली नव्हती... तीच्या वडीलानी आम्हाला आत जाण्यास खुणावल...
  आत जाताच वर्षाने तीचा हात आपल्या हाती घेतला आणि  म्हणाली...
" सुहानी....."
हळुवार पणे तीन डोळे उघडले... आम्हाला पहाताच तीच्या डोळ्यातून घळ घळ पाणी येऊ लागल... मला पहात आपले हात जोडत म्हणाली...
" प्लिज...मला माफ करशील का रे. खुप त्रास दिला मी तुला.... खरी मैत्री आणि खर प्रेम नाही ओळखता आल मला... "
माझेही डोळे पाणावले.. पुढे जात तीचा हात आपल्या हाती घेत तीला थोड धीर दिली.... तशी ती पुढे म्हणाली..
" खुप प्रेम करतोस ना रे गायत्री वर.."
पाणावलेल्या डोळ्यानी मी मान हालवत म्हणालो...
" हो .... खुप...शब्दात नाही सांगता येणार इतक..."
" माहिती आहे मला... पन त्या राक्षसांनी आमच आयुष्य उद्धस्त करून टाकल रे.." बोलता बोलता ती हुंदके देत होती
" जे घडल यात तुमची चुक नाही... पोलिस त्यांना नाही सोडणार... मी गायत्रीला जशी असेल तशी स्वीकारीन.... पन प्लीज सांग कुठ आहे ती... मी तीच्यासोबत खुप म्हणजे खुप दुर निघुन जाईन... या वाईट जगापासून खुप दूर...आणि जर मी तीला आवडत नसलो तरी पन फक्त एकदा तीला भेटायच आहे ग..."
माझे शब्दही अडखळत होते..  बोलता बोलता मला गहिवरुन आल.. वर्षाने माझ्या खांद्यावर हात ठेवला.....  तशी सुहानी पुढे म्हणाली...
" तीचाही खुप जिव होता तुझ्यावर... पन सगळ माझ्यामुळे संपले रे... तीनं खुप सहन केलेल लहान पनापासुन.... आधी आईच्या प्रेमाला पोरकी झाली मग वडीलही गेले... सावत्र आईन खुप त्रास दिलेला...अक्षरशाः जगण नकोस झालय म्हणायची,  पन तु भेटल्यावर ती ख-या अर्थान जगु लागली... काही झाल तरी तुला गमवायच नव्हत तीला.. खुप स्वप्न पहायची... तुझ्यासोबतच्या भावी आयुष्याची....."
मला तीच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता...       
" गेली रे ती , आपल्याला सोडून हे जग कायमच सोडुन गेली... संपली ती.."
काळीज फाडुन टाकणारे सुहानीचे शब्द ऐकताच मी कोसळलो...  कुणीतरी शरीरातील प्राण काढुन घ्याव अस वाटल...डोळ्यात पाणी कधी ओघळु लागल ते ही समजल नाही..
" संजु college सुरू व्हायच्या च्या आतल्या दिवशी माझा birthday होता रे.. माझी बेस्ट friend गायत्रीसोबत करायचा होता म्हणून तीला मी आधीच माझ्या घरी यायला सांगितल होत... माझा boyfriend उमेशन मला भेटायला बोलवले आणि सोबत तीलाही घेऊन यायला सांगितल. सोबत गायत्री आहे हे त्यांना माहितीच होत... आमचा ब्रेकअप झालेला म्हणुन मी नकार दिला तसा माझा चोरुन बनवलेला MMS मला whatspp वर पाठवला.. त्या वेळीच संपले रे मी... तो MMS पाहताच आयुष्यच संपलय अस वाटल... "
तीला भरून आल होत... तीच्या शेजारीच बसुन तीचा हात हातात घट्ट धरला होता.. वर्षा सुन्न मनाने सगळ ऐकत होती तशी सुहानी पुढे म्हणाली..
" एक मुलगी जेव्हा मनापासुन प्रेम करते तेव्हा ती त्या मुलावर आपल्या जन्म दात्या आईबाबांपेक्षा आणि देवापेक्षाही जास्त विश्वास ठेवते .. पन त्यानेच माझा 'घात' केला... मला जगासमोर अस उघड करुन टाकल रे.. त्याने त्याच्या birthday दिवशी खाण्यातून मधून गुंगीच औषध देऊन माझा अश्लील MMS बनवला . "
तीला गहीवरुन आल होत..
"आम्ही मुली कितीही मॉडर्न तरी मनाने हळव्याच रहातो....."
तीचे शब्द ऐकुन मन सुन्न झाल होत.. आणि  भरुनही आल होत... पन तसाच तीच बोलण ऐकू लागलो... बाजुच्या उघड्या खिडकीकडे पहात ती नजर चोरुन बोलत होती
  " माझा नाईलाज झाला.. गायत्रीला खोट सांगुन सोबत घेतल, आम्ही माझ्या गाडीवरुन त्यांनी बोलवलेल्या जागेवर गेलो.. सायंकाळ होत चाललेली, सुर्य केव्हाच अस्ताला गेलेला.. ढगांवर सायंकाळच्या तांबुस छटा पसरलेल्या.
रस्ता तसा सुनसानच होत, उमेश एकटाच दिसला..... जीथे उमेशचा खुन झाला होता तीथेच त्यान आम्हाला बोलवल होत... गायत्री रस्त्यावरच गाडीशेजारी उभी राहीली, मी त्याच्या जवळ गेले .. तसा माझ्या हातात हात घालुन तो आत जंगलात नेऊ लागला , मी त्याला MMS काढून , डिलीट करुन टाक म्हणून विणवण्या करु लागले.. खुप रडले रे.. त्याच्या समोर हात जोडले.. पायावर डोक ठेवल रे... पन त्याला नाही दया आली माझी .... इतक्यात तीथेच लपुन बसलेले त्याचे ते मित्र बाहेर आले..."
बोलता बोलता तीला हूंदका आवरेणासा झाला. आम्ही दोघे शांतपने तीच बोलण ऐकत होतो तशी ती पुढे म्हणाली...
"तीथला प्रत्येकजनच, आपापल्या मोबाइल वर कधी तो video पहायचे तर कधी एका वासनेन भरलेल्या नजरेन मला पहायचे... आपल अंग चोरुन मी खाली मान घातल हूँदके देत रडत होते... त्यांच्या नजरा पाहून अंगावर कपडे असुनही नसल्या सारखे वाटत होते . माझ तर सर्वस्वच हरवुन गेल होत रे..."
बोलता बोलता सुहानी हूंदके देत ढसा ढसआ रडू लागली....
"त्या दिवशी video ची भिती दाखवून तीथल्या प्रत्येकान माझ्यावर बलात्कार केला...प्रत्येकान हव तस मला चुरघळुन टाकल , यातनेन मी रडत होते तस माझा आवाज ऐकुन गायत्री आत आली.. "
काळजावर दगड ठेऊन सगळ ऐकत होतो... सुहानीच्या डोळ्यातुन एकसारख पाणी येत होत... तीचे शब्दही थरथरत होते..
" माझी अवस्था बघुन गायत्रीच्या सर्व अंगावर सर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर कन काटा आला... मी ओरडले गायत्री पळुन जा इथुन... पन गायत्री सुन्न झाली होती... तीन तीथलीच एक काठी उचलली आणि त्यांना मरुन मला सोडवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली.. पन नराधमानी तीच्यावर झडप घातली...  मी त्यांच्या पुढे हात जोडले रे तुझ्या गायत्रीला सोडण्यासाठी पन नही दया आली कोणालाच... त्यांनी तीला लाथा बुक्यांनी मारल रे..  "
तीचा प्रत्येक शब्द अंगावर शहारा आणत होता... तर भीतीने अचानक ती ही शहारुन जायची.. पन तीच यातनानी भरलेले शब्द पुन्हा बाहेर पडू लागले...
" एकाने video recording चालु केल आणि बाकीचे तीला उघड करत तीचा देह चुरघळुन टाकत होते..
वेदनेन कळवळ ती पडून होती प्रत्येक जन आपली वासना शमऊन बाजुला व्हयचा... सगळ्यांची वासना शांत झाली तसे तीच्या उघड्या देहाचे पुन्हा recording करु लागले... पन कपडे सावरत रडतच ती म्हणाली...
'काही करा...पन मी तुमच्यापैकी कुणालाच सोडणार नाही .... पोलिसाना सर्व सांगनार..." रडत , हुंदके देत ती जणु त्यांना चेतावणी देत होती, तसा प्रत्येकजन एकमेकाकडे पाहु लागला. त्यात उमेश रागाने वेडा झाला... गायत्रीला चार शिव्या हासडतच पुढ सरसावला. जोरजोरात तीच्या मुस्का
To be continue 
Story by sanjay kamble