रक्तपिशाच्च Sanjay kamble raktpishaachya part-2

चुलीवर यवड तांदुळ शिजवुन आमास्नी खायाला दे.. मजे आंगात वाइस ताकत यईल...आजनं
रस्ता लय दुर हाय."
त्या म्हातारीने तांदुळ घेतले आणी चौघांकडे एक कटाक्ष टाकला, तसा हानमा
म्हाणाला
Raktpishaachya

"अग म्हातारे, खरच किती घाबरतीयास जीवाला.. जरा पाणी दे ... "
ती काहीच न बोलता झोपडीत मागे फिरली आणी प्यायला पाणी देऊन झोपडीत परतली..
चौघेही बाहेरच्या अंगणात विश्रांतीसाठी आडवे झाले .. शुभ्र टपोर चांदण
झाडांच्या पानावर सांडलेल, अगदी त्या झोपडीबाहेर शेणान सारवलेल्या अंगणात
चांदण्याचा सडा पसरलेला... आणी भिकाजी आणी शिरपा गप्पा मारण्यात गुंग होते तर
एव्हान हानमा चा डोळा लागलेला पन गणपत च्या पोटात मात्र भुकेने गोळा उठत
होता..
        बराच वेळ झाला पन आजी बाहेर आली नव्हती..  न रहाऊन गणपत उठला आणी भात
शिजला का ते पहायला निघाला... त्यान कवाडाच्या फटीतुन आत पाहील तर जुने पुराने
कपडे दोरीवर लटकत होते. कोप-यात एक जिर्ण आणी ठिकठीकानी छिद्र पडलेली लाकडी
पेटी होती त्या छिद्रातुन ऊंदीर बिनदीक्कीत ये जा करत होते...
अंगणात बसलेला शिरपा लांबुन गणपत ला अस आत डोकावुन पहाताना न्याहाळत होता. पन
काही न बोलता तो गणपतच्या हलचालींवर नजर ठेवत होता.. अचानक आत पहाता पहाता
गणपत खाली कोसळला... टाचा घासत रांगत तो मागे मागे सरकण्याची केवीलवाणी धडपड
करू लागला. तसा भिकाजी धावत त्याच्या जवळ गेला . गणपत ला ऊठवण्याचा प्रयत्न
करू लागला पण त्याला जागेवरून उठता येत नव्हत... डोळ्यात जबर भिती दाटलेली तर
दातखिळी बसल्याने तोंडातुन शब्द फुटत नव्हते. तो वारंवार त्या कवाडाकडे बोट
करत मागे मागे सरकत होता.. शिरपा न गणपतच्या कमरेत हात घातला आणी उभ करुन
अंगणात नेल पन अजुनही त्याची वाचा गेली होती..
भिकाजी हळुच त्या कवाडापशी गेला आणी आत डोकाऊन पाहील तसा त्याच्याही चेह-याचा
रंग उडाला. क्षणात त्याचा घसा कोरडा पडला... अंग घामान भिजल आणी काळीज छाती
फाडुन बाहेर पडते की काय अस धडधडु लागल... त्याची नजर आत एके ठिकानी स्थिरावली
होती.. चुलीवर एका काळ्या मळकट भांड्यामधे भात रटरट आवाज करत उकळत होता. ती
म्हातारी चुली शेजारीच बसलेली. काळे पांढरे मोकळे सोडलेले केस पाठीवर पसरलेले
होते. आपल्या सुरकुतलेल्या हाताच्या लांबसर बोटांनी चुलीच्या मागे ठेवलेला
दिवा तीनेे उचलुन त्याच्या पिवळसर प्रकाशात उकळत असलेला भात पाहीला.. तो भात
पहाताना दिव्याच्या प्रकाशात तीचा अर्धवट सुरकुतलेला चेहरा आणी लांब बाकदार
नाक आणी बारीक पातळ ओठ खुपच भयान दिसत होत त्याहुन भयान तीचे मोठ विस्फारलेले
डोळे जे खोबण्यातुनही विद्रुप दिसत होते.. तीन आपली नजर तशीच त्या भांड्यात
रोखलेली , रटरटणा-या भाताच्या भांड्यातुन वाफा बाहेर पडतच होत्या  तीन आपला
उजवा हात त्या उकळत्या भांड्यात घातला तसा एक वाफेचा भपका वर उठला... त्या गरम
पोळणा-या भाताचा एक मुटका तोंडात टाकला.. तीच्या सुरकुतलेल्या हाताला
खोपरापर्यंत भाताची शिते चिकटली होती. म्हातारीन आपल्या हातावर डसलेली ती शिते
पाहीलीत आणी तोंडाचा जबडा हळुवारपणे उघडताच तोंडातुन काळीकुट्ट जीभ वळवळत
बाहेर आली आणी जसा बेडुक मटमट करत चिटपाखर जिभेने टीपतो तशी हातावरची शिते
जिभेने चटचट करत टीपु लागली..
भिकाजी डोळे विस्फारून हे पहात होता तोच पुढचे आक्रीत घडले. चुलीतील जाळ
वाढवण्यासाठी तीन आपले पाय त्या चुलीत सरकवले.. चर्रर्रर्रर्रर चर्रर्रर्रर
करत तीचे लाकडासारके पाय खाली पेटत होते तर वर त्या भांड्यात भात उसळु लागला
आणी भांड्यात हात घालुन ती खाऊ लागली....
हे अमानवीय दृष्य पाहुन कुणाच्याही काळजाची थरकाप उडाला असता...
आधीच थोडा भित्रा गणपत या दृष्यान पुरता हादरून गेला. शिरपान त्याच्या तोंडावर
पाणी मारल तशी त्याची वाचा आली. डोळ्यात, चेह-यावर दाटलेल्या भितीला दहशतीला
मोकळ करण्यासाठी त्यान जोराची आरोळी ठोकण्यासाठी तोंड उघडल तस भिकाजी न त्याच
तोंड दोन्ही हातानी दाबुन धरल..
"भिका.. त्याच ताँड का दाबुन धरलयास..आन गनप्या, काय झालय... यवडा का
भ्यालास...?"
शिरपाच्या या प्रश्नाला भिकाजीन दबक्या आवाजात उत्तर दील.
" सांगतो... पर आधी हीतन नीगायच बगा... शिरप्या त्या पिशव्या घे मी गनप्याला
सावरतो... या वाटन सरळ निगायच.. आनं एक.... माग वळायच न्हाय... (बाजुला पाहात
म्हणाला.) त्या हानम्याला उठीव.."
गणपत ला घेऊन भिकाजी झपाझप पावल टाकत निघाला तर पिशव्या खांद्यावर लावत शिरपा
दबक्या आवाजात हानमा ला उठवू लागला..
" ये हानम्या.. आरं ये... लेका उठ की..."
डोळ चोळतच हानमा जागा झाला..
" काय र....भात शिजला व्हय..."
" व्हय .. आणं सपला बी... आरं काय तरी इपरीत वाटतय , लवकर चल.."
क्षणाचाही विलंब न लावता चौघे समोरच्या वाटेने जंगलात जिवाच्या आकांताने धावत
सुटले, कोणी काहीच बोलत नव्हत , त्या किर्रर्रर्र वाटेने सर्व आपला जीव
वाचवायला धावत होते. ती झोपडी मागे मागे पडु लागली आणी दिसेनाशी झाली...
काट्याकुट्यातुन वाट काढत भिकाजी सर्वात पुढ होता, गणपत आणि हानमा ही घाबरट
मंडळी मधे तर धाडशी शिरपा सर्वात मागे होता. ही वाट कुठ जातेय हे कोणालाच ठाऊक
नव्हत ...  पन आपला जीव त्या सैतानाच्या हवाली करुन एक भयान क्रुर मरण कोणालाच
नको होत..
*****
बराच वेळ झाला तरी बाहेरची कसलीच हलचाल जाणवत नव्हती... झोपडीच लाकडी कवाड
बाजुला होताच कर्रर्रर्रर्र्रर कर्ररिरर्रर्र्र आवाज त्या निरव शांततेत घुमला
तशी आपल्या पांढ-या पडलेल्या भुवया आकसत ती म्हातारी बाहेर आली पन बाहेर कोणीच
दिसत नव्हत ... तीचा सुरकुतलेला चेहरा क्रुर होऊ लागला आणी  बाहेर कोणीच नाही
हे पाहुन ती चवताळुन उठली... आकाशाकडे पहात तीन एक कर्णर्कश्य हास्य केल तशी
झाडांवर उलटी लटकणा-या वटवाघळांचा एक मोठा झुंड आकाशात झेपावला... तीच भयंकर
हास्य दुरवर असुनही त्या निरव शांततेमुळ या चौघांच्या कानावर आल तसा
त्यांच्याही काळजाचा थरकाप उडाला...
        धावताना वाटेतील वाळलेला पाला पाचोळा पायाखाली येईल तसा त्याचा
सळसळनारा आवाज काळजात दाटलेली भीती आणखीनच दाट करत होता... त्यातच रात्रीच्या
त्या भिषण वातावरणात घुं घुं करत सुटलेला वारा जणु एखाद्या अमानवीय शक्तीच्या
आधिन असल्यासारखा त्या चौघांवर नजर ठेवत होता... पन आपला जीव वाचाव यासाठी
चौघा मित्रांची धडपड सुरू होती..  पुढ धावत होते पन कोणीतरी त्यांच्या मागे
येत होत ... तीतक्याच वेगाने धावत , पन त्याच्या पायांचा आवाज सामान्य वाटत
नव्हता. जस एखाद हिंस्त्र श्वापद चार ऐवजी आपल्या दोनच पायांवर चालत याव तसच
हे जाणवत होत... ते अगदी जवळ आल होत.. सर्वात मागे राहीलेल्या शिरपाला आपल्या
मागे असलेल्या त्या अमानविय ताकतीची जाणीव झाली होती.. पन मागे पाहुन चालणार
नव्हत. धावायच होत फक्त समोर दिसणा-या त्या पायवाटेवरून.. श्वास वाढलेला , अंग
घामान भिजलेल. डोळ्यात मरणाची भिती अगदी स्पष्ट झळकत होती 
क्रमशः
Next part
 story by sanjay kamble 

रक्तपिशाच्च Sanjay kamble raktpishaachya part-1

रक्तपिशाच्च...
sanjay kamble
           बुधवार असल्याने गावच्या आठवडी बाजारात नेहमीसारखाच गोंधळ, गडबड,
घाई सुुरू होती..
पहाव तीकड समोर मांडलेल्या हिरव्यागार पालेभाजा , लाल लाल टमाटे , काळी पांढरी
वांगी , शेवगा ,पालक, मेथी यांचा ढीग च्या ढीग दिसत होता...
लोक कधी नुसतच पहात पुढ सरकत होतीत तर कोणी 'भाव' विचारून 'भाव ' खात निघुन
जात होता...पहाव तीकडे आपापल साहीत्य विकण्यासाठी लोकांना साद घालणारे
विक्रेते दिसत होते..
त्यातच कडेवर लहान पोराला घेतलेली माय भाव विचारू लागली...
"वांगी कशी हायती ....? पोकळा कसा दिला .?"
सागळ्या माळव्याच दर विचारून घेतल पण काहीच पसंतीस पडत नव्हत.. तीच्या कडेवरच
पोरग मात्र बेकरीतल बटरांच पाकीट पाहीजे म्हणुन रडुन गोंधळ घालत होत...
" गप की कार्ट्या , आसल कुनाच्या आवलादीच झालईस..? एकद बगीतल की पायजे म्हंजे
पायजेच.."
Raktpishaachya

अस अस्सल गावराण शब्द उच्चारत एक धप्पाटा पाठीत घातल पुन्हा म्हणाली..
" जा तुज्या 'बा' कड.."
पोरग्याला खाली उतरवल तस ते धावतच त्याच्या वडलांकडे गेल पन भोंगा मात्र चालुच
होता...
इकड भिकाजी मात्र भाजीचा खप हवा तसा होईना म्हणुन जरा नाराजच होता. दुपार होता
होता शिरपाचे बोंबील ,मासळी , बांगडा संपत आलेले तर गणपाची आंबा फणसाची रास
देखील कमी झालेली, राहीले ते हानमा आणि भिकाजी यांच्या भाज्या मात्र अजुनही
फारशा खपत नव्हत्या ....जो तो भाव विचारून नाक मुरडत निघुन जाई..
'बाजार भोगाव' गावाच्या नावावरूनच समजत की आजुबाजूच्या कित्येक गावातील
लोकांच्या आर्थिक उलाढालीच केंद्र असाव...आणि होतच... कोल्हापुर शहराच्या
पश्चिमेस साधारण ३५ किमी अंतरावर उंच डोंगर दाट जंगल आणि वनराईने नटलेल गाव..
आजुबाजूच्या अनेक गावातील लोक आपल्या संसारूपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी या
ठिकाणी येत तर आपल साहित्य विक्रीसाठीही छोटे मोठे शेतकरी आणि व्यापारी ही येत
असत. त्यातच भिकाजी, हानमा , शिरपा आणी गणपत ही एकाच गावची चौकडी आपापल
साहीत्य विक्रीसाठी या ठिकाणी येऊन दिवसभरात झालेल्या मिळकतीतुन आपल्या
संसाराला लागणा-या चिजवस्तु घरी नेत... यांच गाव तस दुर होत पन एकमेकांची सोबत
असल्यान वाट कधी सरते ते लक्षात येत नसे.. आज ही ते दर आठवड्याप्रमाणे आपापल
साहीत्य घेऊन आले होते.
         सांज व्हायला आली तरी भिकाचा माळव्याचा ढीग काही उतरत नव्हता.
लोकांची ये जा कमी होऊ लागली.. पुरेसे पैसेही मिळाले नव्हते त्यामुळे पुढच्या
आठवड्याचा गुजारा कसा करायचा याचा विचारही त्याला पडलेला...
बाकी तीघांनी घरी परताण्या आधी लागणार साहीत्य खरेदी केल..
" आगा ये भिक्या.. रात व्हयाला आली.. निगायच का रात हीतच घालीवतुस..."
शिरपान हातातली पिशवी उचलत साद घातली..तसा भिकजी म्हणाला...
" थांब गा... भाजीच्या चार पेंड्या इकतो मग निगु.. तवर हे दुकानातल सामान घे..
"
पोरान लिहुन दिलेली चुरघळलेली पांढरी चीठ्ठी खिशातुन काढत शिरपाला कामाला
लावल...
भिकाजची भाजी विकता विकता चांगलाच वेळ झाल... आणी बाजारात लोकांची गर्दीही
नाहीशी झाली... जो तो आपापली शिल्लक राहीलेली भाजीची पोती , ठीक्की दुरड्या
डोक्यावर घेऊन परतीच्या मार्गाला लागला.
" हानम्या ... ते बग... त्या दुकानातल्या घड्याळात...साडेआट वाजुन गेल आजुन
वस्तीची गाडी कशी न्हाय आली गा.." भिकाच्या या प्रश्नाने हानमा आपल्या जवळची
पिशवी खांद्यावर घेत उत्तरला..
" लेका नीट बग..साडेआट न्हाय... साडेनव वाजल्याती.. तुज्यापाई एसटी बी
चुकली...वडाप बी गावना झालय...''
तोवर शिरपा आणि गणपत चालत समोरून आले. मान तीरकी करून तोंडातल्या पानाचा
पिचकारी बाजुला मारत म्हणाला
" आगा वडाप बी न्हाय.. चालतच जायाला लागणार..."
सुपारीचा खांड तोंडात टाकत पिशवी ऊजव्या खांद्याला अडकवत गणपत म्हणाला...
" आता कुनाची वाट बगायची...? चला ... वाटला लागू.."
दिवस भर विक्री करताना घडलेल्या मजेशीर गप्पा मारत चौघांचा पायी प्रवास सुरू
झाला.. त्याच गाव त्या ठिकाणाहून आठ ते नऊ किमी असेल पन गावच्या त्या रांगड्या
गड्यांना याची सवयच होती...
उन्हाळ्याचे दिवस ... आभाळ चांदण्यात न्हाऊन निघाल होत.. चंद्राची कोर आकाशात
बरीच वर आलेली... पौर्णिमा दोन चार दिवसांवर असेल अस नितळ चांदण पडलेल...
गावचा तो मुख्य रस्ता धरला तर पोहचायला बराच वेळ लागेल त्यामुळे त्यांनी
डोंगरातुन जाणारा दुसरा कच्चा रस्ता पकडला..
एक जाड लांब काठी आणी बाजाराच्या पिशव्या घेऊन त्या चिंचोळ्या पायवाटेवर
पसरलेला पाला पा़चोळ पायाखाली तुडलत चालताना कोल्हापुरी चपलांचा
कर्रर्रर्रर्रर कर्रर्रर्रर्रर असा आवाज चोहोबाजुने घुमत होता. चौघांच्या
गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. त्यातच भिकाजीचा मजेशीर स्वभाव असल्याने एक
विनेदी किस्सा सांगितला तसे तीघेही पोट धरून हसु लागले... चालता चालता ते बरेच
दुर आले... भिकाजी ला काहीतरी वेगळेच जाणवले तसे हसत असणा-या आपल्या मित्रांना
गप्प रहाण्यास सांगुन जागेवर थांबला... सर्वच एकदम शांत झाले... शिरपा आणी
हानमा दोघ भिकाजीकड पहात हाताने खाणाखुणा करत काय झाल विचारू लागले तसा
हातानेच स्वताच्या काना कडे बोट दाखवत कसलासा आवाज ऐकण्याचा इशारा केला...
तीघांच्या गंभीर चेह-याकडे पहात गणपत मात्र भितीन अर्धा झाला... आता चौघेही
श्वास रोखुन ऐकु लागले... आजुबाजूच्या दाट झाडीतुन रातकिड्यांची
किर्रर्रर्रर्रर्र किर्रर्रर्रर्रर्र आणी घुंsssss घुंssss असा घोंघावणारा
वारा इतकाच आवाज येत होता. तीघेही गंभीरपने भिकाजीकडे पाहुन आजुबाजूच्या
परिसराकडे पाहु लागले. भिकाजीन त्या समोरच्या चिंचेळ्या पायवाटेकड पाहील.
"कोणीतरी आपल्या संग चालत यत आसल्यावाणी वाटतया र.."
भिकाजीच्या त्या वाक्याने तीघेही थोडे घाबरले..
" गड्या.. जंगली जनावर आसतील.. बीगी बीगी पाय उचला न्हायतर इपरीत व्हायच.."
त्यासरशी चौघही झपाझप पावल टाकु लागले..
दोन्ही बाजुला झाडांच्या आकृत्या वा-याच्या मंद झोक्याबरोबर हालत होतीत. शुभ्र
चांदण्यात उजळुन निघालेली ती वेडीवाकडी पायवाटेने एका गुढ रहस्याकडे घेऊन जात
असल्या सारख वाटत होत...
" ये शिरपा.. रस्ता चुकलाय का बगा की र.. कीती यळ झालाय पर आजुन बी कंच गाव
दिसना.. आणं भुक बी जोरात लागलीया."
चालुन चालुन सर्वच थकले होते. बाजुच्या एका दगडावर बसत शिरपा न हातातली पिशवी
खाली ठेवली तसे गणपत आणी हानमा त्यांच्या जवळ जाऊन बसले. भिकाजी मात्र तसाच
त्या वाटेवर ऊभा आजुबाजूला पाहू लागला.. त्याला दुरवरून निघणारी एक धुराची
पांढरट रेषा आकाशात वर वर सरकताना दिसली.
"गड्यांनो.. गाव तरी जवळ आल्यासारख वाटतय.."
म्हणतच तरातरा चालत थोडा वर गेला आणी आपल्या मित्रांना वर येण्यासाठी साद
घातली.. तीघेही डोंगरमाथ्यावर पोहोचले तसे भिकाजी पहात असलेल्या ठिकाणी पाहु
लागले. डोंगराच्या माथ्यावर अगदी तुरळक झाडे होती आणी तीथेच साधारण ५० ते ६०
पावलांवर एका छोटीशा झोपडीमधुन लुकलूकणारा दिव्याचा किंचीत प्रकाश बाजुच्या
खिडकीतुन दिसत होता.. झोपडीवर असलेल्या छोट्या धुराडीमधुन निघत असलेली धुराची
पांढरट रेषा मोकळ्या आकाशात उंच पसरत वेगवेगळ्या आकृत्या तयार करत होती...
भुकेने व्याकुळ झालेले चौघेही त्या झोपडीच्या दिशेने चालु लागले.. पायाखाली
सुकलेला पाला पाचोळा तुडवत चौघेही झोपडीजवळ पोहोचले, तीघे बाहेर छोट्याशा
अंगणात थांबले तर भिकाजी पुढे झाला, हातातल्या बटव्यातुन सुपारीच एक खांड
तोंडात टाकुन चघळत मान किंचीत उंच केली आणी कवाडा शेजारी हात ठेवत हाक दिली..
"कुणी हाय का घरात"
सर्वत्र निरव शांतता पसरली प्रत्येक जण आतुन काही प्रतीसाद येतो का हे श्वास
रोखुन ऐकत होते..
आणखी तीन चार हाका दिल्या तशी आत काहीतरी हलचाल होत असल्यासारख जाणवल..
खळखळणा-या बांगड्याचा आवाज जाणवला
"कोण हाय.."
आतुन ऐकु आलेले ते एका वयस्कर स्त्रीचे जड  मोजकेच शब्द आतुन कानावर पडले तसा
सर्वाना धीर आला..
आवाजावरून वयस्कर स्त्री असावी अस वाटत होत.. तीच्या प्रश्नाला भिकाजीने लगेच
उत्तर दिले
तसे हल्केच तीने कवाड बाजुला केले...तशी एक अतीशय वयस्कर वृध्द स्त्री समोर
उभी होती.. किंचीत पांढरे केस, अंगावर मळकटलेल नऊवारी लुगड, पांढरी सुरकुतलेली
त्वचा जी हाडांना पुर्णपणे चिकटलेली,
बाहेर पहात ती म्हातारी बोलु लागली.. डोळ्यांच्या खोलवर गेलेल्या खोबनीतुन
किलकील्या नजरेन पहात तीन विचारल
" तुमी चोर ,डाकु आसलासा तर माज्या घरात तुमास्नी कायबी गवसायच न्हाय."
"आमी चोर न्हाय ग म्हातारे.. वस्तीची गाडी चुकली म्हणुन चालत गावाला निगालोया.
हे घे.. (हातातल्या पिशवीत हात घालुन प्लास्टीक कागदात बंधलेले तांदुळ दीले )
चुलीवर यवड तांदुळ शिजवुन आमास्नी खायाला दे.. मजे आंगात वाइस ताकत यईल...आजनं
रस्ता लय दुर हाय."
क्रमशः 
story by sanjay kamble 

काला जादू black magic

काला जादू  black magic

काला जादू

काला जादू पारम्परिक रूप से पराप्राकृतिक शक्तियों अथवा दुष्ट शक्तियों की सहायता से अपने स्वार्थी उद्देश्यों को पूर्ण करने के लिए किया जाने वाला एक जादू है। काला जादू एक ऐसी बुरी शक्ति या बुरी ऊर्जा जो किसी पर बुरा प्रभाव डालती है यह एक प्रकार नकारात्मक दृष्टि है और इस नकारात्मक दृष्टि से बचाने के लिए वास्तुशास्त्र में सकारात्मक ऊर्जा को बढ़ने के लिए प्रावधान है वास्तुशास्त्र के अनुसार ये सकारात्मक ऊर्जा कला जादू और नकारत्मक ऊर्जा का प्रभाव काम करती है सकारत्मक ऊर्जा को बढ़ाने के लिए वास्तुशास्त्र मे कई प्रकार के प्रावधान भी इंगित है जैसे उदहारण के लिए किसी भी प्रकार के वास्तु दोष को दूर करने के लिए घर की छत या छाजे पर उत्तर पूर्व दिशा में पांच तुलसी के पौधे लगाना चाहिए। अगर पांच नहीं लगा सकते तो कम से कम एक तुलसी का पौधा इस दिशा में जरुर लगाएं। इससे घर में आने वाले नकारात्मक प्रभाव में कमी आती है। वास्तुविज्ञान और वास्तुशास्त्र में विस्तार से बताया गया है बाहर से घर में आने वाले लोग भी कई बार कोई नकारात्मक उर्जा को अपने संग लेकर आते हैं। और वास्तु विज्ञानं के आधार पर जिनके घर के प्रवेश द्वार पर तुलसी का पौधा होता है उनके घर में इस तरह के नकारात्मक उर्जा का प्रवेश नहीं हो पाता है

भुतांचे प्रकार. types of ghosts

भुतांचे प्रकार 

Ghost

1)अवगत : विधवा स्त्रीचे भूत. हे आवळा किंवा नागचाफ्यावर वास करतात.

2)अलवंत : बाळंत होताना मृत्यू आल्यास स्त्रीचे ‘अलवंत’ नावाचे भूत होते.

3)आसरा :

4)कालकायक : कालकायकांची भुतं ही भैरवाच्या अंकित असल्याने, ती जास्त त्रास देत नाहीत. त्यांना तृप्त केल्यावर ती प्रसन्न होतात. त्यांची कृपा लाभलेला माणूस १२ वर्षे आनंदी व आरोग्यदायी जीवन जगतो. त्यानंतर त्याचा नाश होतो.

5)गानगूड :

6)गिर्‍हा : गिऱ्हा हे भूत कोकणाप्रमाणे घाटावरही नाव कमावून आहे. ते पाणवठ्यावर राहात असे आणि माणसाला पाण्यात ओढून नेऊन त्याची नाना प्रकारची चेष्टा करीत असे. ‘काय गिऱ्हा लागलाय मागे?’ हा वाक्प्रचार या गिऱ्हामुळेच रूढ झाला असावा.

7)खवीस : खवीस हे भूत दोन-तीन प्रकारचे आहे. खवीस जसे महारा-मातंगांचे असते, तसेच ते ॲबिसियन लोकांचेपण असे. हबशी किंवा सिद्दी जे कोकणात स्थायिक झाले, त्यांची भुते पण चौदाव्या-पंधराव्या शतकापासून कोकणात दिसायला लागली.

8)चकवा : चकवा हा अनेक गावांच्या सीमांवर राहतो, आणि रात्रीच्या वेळी वाटसरूंना भटकवत ठेवतो. चकव्यालाच मनघाल्या म्हणतात

9)चिंद : घाटावरचे हे भूत महिलेच्या पोटी जन्म घेऊन तिच्या वाट्याचे अन्न खाते, असे म्हणतात.

10)चैतन्य :

11)छेडा : छेडा म्हणजे अविवाहित महाराचे भूत. छेडा मुख्यत्वे वेशीवर राहात असते. शूद्रांची अर्थात महारा-मातंगांची भुते वर्षातून एकदा नारळ, केळी, साखर, कोंबड्यांचा किंवा बोकडाचा बळी दिल्यावर त्रास देत नाहीत. कधी कधी ही भुते होळीवर, डोंगरात किंवा जंगलात वावरत असत.

12)जखीण : सवाष्ण स्त्री मेल्यावर भूत झालीच तर ‘जखीण’ होते.

13)झोटिंग : कोळ्यांच्या किंवा मुसलमानांच्या भुतांना झोटिंग म्हणतात. झोटिंग किंवा खवीस हे जर अहिंदू असतील तर त्यांची बाधा दूर करणे, हे हिंदू देवऋषांच्या अावाक्यात नसते, अशी धारणा आहे.

14)झोड :

15)तलखांब : अविवाहित शूद्र पुरुष मेल्यावर भूत झालाच तर त्या भुताला ‘तलखांब’ म्हणतात.

16)दाव : कुणब्याच्या भुताला ‘दाव’ म्हणतात. हे बहुधा एकाकी भटकते.

17)देवाचार : लग्न झाल्यानंतर अल्पावधीत जो शूद्र मरतो, तो ‘देवाचार’ होतो. देवाचार भूत गावकुसाबाहेर चारी दिशेला राहते.

18)पीस :

19)ब्रह्मग्रह : वेदविद्यासंपन्न, पण ज्ञानाचा गर्व असलेल्या ब्राह्मणाचा आत्मा जेव्हा भूत होतो, तेव्हा अशा भुताला ‘ब्रह्मग्रह’ म्हणतात.

20)ब्रह्मराक्षस : ब्रह्मराक्षस हे पिंपळावर राहणारे सर्व भुतांमधील शक्तिशाली भूत असते. याच्या कचाट्यात कुणी सापडला, तर तो सुटणे अशक्य असते. ब्राह्मणांचा द्वेष करणारे, त्यांच्या कर्तव्यास हीन लेखणार व त्यांची चेष्टा करणारे अतृप्त आत्मे ‘ब्रह्मसमंध’ या भूतयोनीत जातात.

21)महापुरुष भूत : वेदपारंगत ब्राह्मणाच्या भुताला ‘महापुरुष भूत’ म्हणतात.

22)मुंजा : मुंज झाल्यानंतर सोडमुंज होण्याअगोदर एखादा मुलगा मरण पावल्यावर तो मुंज्या होतो. त्याचा आत्मा पिंपळावर किंवा विहिरीत वास करतो. उपनयन संस्कार त्रैवर्णिकात होत असल्याने ब्राह्मणांखेरीज क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातही मुंजे असतात.

23)राणगा : विधुर माणसाचे भूत

24)लावसट : ‘अवगत’सारखेच विधवा स्त्रीचे भूत. हेही आवळा किंवा नागचाफ्यावर वास करते.

25)वाघोबा :

26)वीर श्रेणीतील भुते : ‘वीर’ श्रेणीतील भुते, ही अविवाहित क्षत्रियांची असत. कधी ती अ-मराठी किंवा परप्रांतीय क्षत्रियांचीही असत.

27)शाखिणी : अविवाहित स्त्रीचे भूत.

28)समंध : समंध ही दोन प्रकारची भुते असतात. पहिल्या प्रकारातील समंध हा संतती न झाल्यामुळे, आणि उत्तरक्रिया न केल्यामुळे होतो. त्याच्या नात्यातल्यांनीच त्याची इच्छा पूर्ण केल्यावर तो शांत होतो आणि आप्तांना मदतसुद्धा करतो. दुसऱ्या प्रकारातील समंध हा जिवंतपणी लोभी आणि इच्छापूर्ती न झालेला संन्यासी असतो. समंध झाल्यावर, तो पैसेवाल्यांना संपत्तीचा उपभोग घेऊ देत नाही.

29)सैतान :

30)हडळ : स्त्री बाळंत होऊन दहा दिवसांच्या आत मृत्यू आल्यास ती ‘हडळ’ बनते. हडळीलाच हेडळी, डाकण, सटवी असेही म्हणत

पिशाच्च क्या हैं. what is Pishaachya


पिशाच कल्पित प्राणी है जो जीवित प्राणियों के जीवन-सार खाकर जीवित रहते हैं आमतौर पर उनका खून पीकर. हालांकि विशिष्ट रूप से इनका वर्णन मरे हुए किन्तु अलौकिक रूप से अनुप्राणित जीवों के रूप में किया गया, कुछ अप्रचलित परम्पराएं विश्वास करती थीं कि पिशाच (रक्त चूषक) जीवित लोग थे।
Pishaachya


लोककथाओं के अनुसार, पिशाच अक्सर अपने प्रियजनों से मिला करते थे और अपने जीवन-काल में जहां वे रहते थे वहां के पड़ोसियों के अनिष्ट अथवा उनकी मृत्यु के कारण बन जाते थे। वे कफ़न पहनते थे और उनके बारे में अक्सर यह कहा जाता था कि उनका चेहरा फूला हुआ और लाल या काला हुआ करता था। यह 19वीं सदी के शुरूआती दौर में आरंभ होने वले आधुनिक काल्पनिक पिशाचों के मरियल, कांतिहीन चित्रण से स्पष्ट रूप से भिन्न था। हालांकि पिशाचीय सत्ता अनेक संस्कृतियों में मिलती है फिर भी पिशाच शब्द 18वीं सदी के आरंभ तक लोकप्रिय नहीं हुआ था। पश्चिमी यूरोप में पिशाच के अंधविश्वास का एक अन्तःप्रवाह चला जैसे कि बाल्कन प्रदेशों एवं पूर्वी यूरोप,में जनश्रुतियों में पिशाच की लोककथाएं बार-बार दुहराई जाती रहीं जबकि स्थानीय अंचलों में लोग पिशाच को अलग-अलग नामों से जानते थे, जैसे कि सर्बिया में वैम्पिर (вампир), ग्रीस में राइकोलाकस (vrykolakas) तथा रोमानिया में स्ट्रिगोई (strigoi). यूरोप में पिशाच अंध-विश्वास के बढ़े हुए स्तर से जन उन्माद उत्पन्न हुआ और कुछ मामलों में शवों को दांव पर लगा दिया गया तथा लोगों पर पैशाचिकी का आरोप लगाया जाने लगा।

आजकल पिशाच आमतौर पर कल्पित सत्ता के रूप में समझे जाते हैं, हालांकि कुछ संस्कृतियों में इससे संबंधित प्राणियों जैसे कि 'छुपाकाबरा ' (chupacabra) में लोगों का विश्वास अभी भी कायम है। प्राक् औद्योगिक समाज में मृत्यु के पश्चात् शव के विघटन की प्रक्रिया के संबंध में पिशाचों में आरंभिक लोककथाओं के विश्वास का कारण अज्ञानता को ठहराया गया है। आनुवांशिक असामान्यता को भी 20वीं सदी में लोककथाओं की पैशाचिकी से जोड़ा जाता था जिसे मीडिया ने भरपूर उजागर किया, लेकिन इस कड़ी को उस समय से व्यापक रूप से बदनाम किया गया।

सन् 1819 में जॉन पोलिडोरी कृत रचना द वैम्पायर के प्रकाशन के साथ ही आधुनिक कथा-जगत में करिश्माई और कृत्रिम पिशाच का आविर्भाव हुआ। यह कहानी काफी सफल रही और 19वीं सदी के आरंभ में निर्विवादित रूप से पिशाच पर सबसे सफल प्रभावशाली रचना मानी गई। हालांकि ब्रैम स्टोकर के सन् 1897 में प्रकाशित उपन्यास ड्रैकुला को सर्वोत्तम उपन्यास के रूप में याद किया जाता है जिसने पिशाच कथा-साहित्य की पृष्ठभूमि तैयार की। इस पुस्तक की सफलता ने पुस्तकों, फिल्मों, वीडियो गेम्स और टेलीविज़न शो के जरिए एक विशिष्ट पिशाच शैली को जन्म दिया जो 21वीं सदी में अब भी लोकप्रिय है। अपनी विशिष्ट संत्रास (भय) की शैली में पिशाच एक प्रभावशाली चरित्र है।

मृत्युचा जबडा. Marathi horror story part-2

त्यावर गुरव म्हणाले, " हीतन पाच कोस लांब . 'भुताच्या जाळीत.' तुझ धाडस तुला तारल, तुझ भ्या तुला मारल." 
एवढ बोलून गुरव शांत झाले. (भुताची जाळी हे इथल्या जंगलातील पिशाच्च्याचा ताबा असलेले ठिकान, जिथ इतकी गर्द झाडी आहे की दिवसा देखील सुर्य दिसत नाही)
ghost

'भुताची जाळी' नाव ऐकल्यावर सर्वच भयभीत नजरेन एकमेकाकडे पाहू लागले. काय कराव कोणालाच समजत नव्हत. तीथ जाणं म्हणजे मरणाच्या दाढेत स्वता:हून जाण...  रात्र पुढे सरकत होती. सगळे आपसात कुजबूजत होते, तेवढ्यात आजोबा ताडकन उठून उभे राहीले
" कोन यणार माज्या संग...?"
थोरला भाऊ बोलतोय म्हणजे चौघे भाऊ पण उठले तसे आजोबांचे दाजी व गावची दहा ते बारा गावकरी पण जाण्यासाठी तयार झाले.
" समद्यानी देवी म्होर साकड घाला. आण निघा. रात मध्यान व्हायला आलीया. तुमी परत इयीस्तवर म्या देवीला गा-हान घालीन."
देवीसमोर नतमस्तक होऊन आणि गुरवांच्या पायाला हात लाऊन देवळातुन बाहेर पडले. आजोबा सर्वाना उद्देशून म्हणाले ,
" तयारी करुन लगेच निगूया".
सगळे आपापल्या घरी परतले आणि निघण्याची तयारी करू लागले. आजोबा पुन्हा बहीणीच्या घरी परतले. स्त्रीयांना काहीच न बोलता हातातली काठी दारा मागे ठेवली. आजोबांनी डोक्यावरचा फेटा काढला आणी डोके आणि चेह-या भोवती असा बांधला जेणेकरून फक्त डोळे उघडे राहतील, डाव्या हातात मशाल पेटवून घेतली आणि उजव्या हातात तीन फूट लांबीचा धारधार कोयता.
त्यांच्या दाजीनी कु-हाड कमरेला लावली आणि कंदिल पेटवून घेतला. रात्र मध्यावर आली होती. ठरल्याप्रमाण पारा जवळ सर्वजन एकत्र आले,पंधरा ते सोळा जण आसतील, झाकलेले चेहरे, हातात पेटत्या मशली, कंदिल, कु-हाडी, धारधार कोयते आशा तयारीने गावाबाहेर पडले. सर्वजण एकमेकाशी काही न बोलता चालत होते. वातावरण कमालीच गंभिर बनलेल, गाव थोड मागे पडल तशी जंगलातून जाणारी एक चिंचोळी पायवाट लागली... आजुबाजूला दाट, गर्द झाडी, मध्यरात्रीची निरव शांतता, प्रत्येकाच्या पायातील चामड्याच्या कोल्हापुरी चपलाचा कर्र कर्र असा येणारा आवाज, रात किड्यांच्या किर्र आवाजाने भेदत चाललेली शांतता, आणी रात्रीच्या त्या भयान काळोखाला मागे सरकायला भाग पाडणा-या पेटत्या मशाली घेऊन त्या घनदाट जंगलात शिरणारे ते लोक.
सर्व काही एखाद्या military rescue operation सारखे सुरू होत.
                   *****
सर्व डोंगराच्या माथ्यावर पोहोचले , मध्यरात्री निरभ्र आकाशातल ते टपोर चांदण आणी नदीकाठचा काजव्यांनी एकदम उजळुन निघणारा परिसर . रात्रीच्या भिषणतेती तीच सौंदर्य खुलुन दिसत होत..  गांव आता खुप मागे राहील.. डोंगराचा चढ उतार सुरू झाला. काही अंतर पुढ येताच यांच्यातला एक जन एकदम थांबला...
" थांबा... कसलासा आवाज यतोय.."
सर्व जागेवर थांबले...
" व्हय... कोणतरी हाक देतय..."
"शिरपा, कोणतरी मदत मागतय..." 
सर्व जागेवरच थांबले आणि आवाजाची चाहूल घेऊ लागले. खरोखरच आवाज येत होता. कोणीतरी कन्हत असाव असा आवाज होता. सर्वजण शांतपने कान लाऊन ऐकू लागले, पण आवाजाची दिशा समजत नव्हती..
हळुहळू ते शब्द स्पष्ट होऊ लागले..
" आगा ये, मला वाचीव की गा... म्या हीत , हीत हाय." कन्हत कन्हत तो आवाज पुन्हा घुमला तसे सर्वच चक्रावले. तेवढ्यात आजोबांचे दाजी म्हणाले.
" कुनीबी जागच हालू नगा, ह्यो चकवा हाय. आपली वाट धरा, न्हायतर ह्यो आपल्याला रातबर हीतच फिरवील."
सर्व पून्हा चालु लागले पण तो आवाज त्यांच्या पाठोपाठ येतच होता...
" ये.. आर मला वाचवा की र..."
आवाज मागुन येतच होता पन त्या कडे लक्ष न देता सगळे चालत होते. चालण्याचा वेग वाढला तसा तो आवाज मागे पडू लागला. आता समोर काही अंतरावरच भुताच्या जाळीची हद्द सुरू होत होती.. तेच एका आवाजान प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहीला...
"ए.....हीत वाचलासा रे पण तिथ न्हाय वाचनारा."
मागुन आलेल्या या जोराच्या किंकाळीने सर्वच हादरून गेले. एकमेकाकड भयभीत नजरेन पहात एक एक पाऊल पुढ सरकु लागले.. पिशाच्चा ची हद्द सुरू झाली. गर्द झाडी, काटेरी झुडपे अशा या भुताच्या जाळीत सर्वजण पोहोचले. गुरवांनी सांगितलेली जागा आली होती, मशालीच्या प्रकाशात आता मुलीचा शोध सुरू झाला. काटेरी झुडपात कधी एखाद्या घुबडाच घरट दिसायच,तर कधी झुडपातून एखादा विषारी साप सळ सळ करीत वाटेतून बाजूच्या झुडपात शिरायचा... कोल्ह्या लांडग्यांचे चकाकणारे डोळे काळजाच पाणी करायचे... वाट काढत ते आता बरेच आत आले होते. तेवढ्यात त्यांना कसला तरी आवाज येऊ लागला. एखाद्या हिंस्र श्वापदाच आपल्या शिकारीवर झडप घालण्या आधीच गुरगूरण्या आवाज. सर्वच थरारले. हातातील हत्यारे आणि मशाली पूढे करून करवंदाची काटेरी झुडपे कापत वाट करत सर्व त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. घरघरणारा तो आवाज आता वाढू लागला. आणि एकदम सगळ वातावरण शांत झाल. घरघरणारा तो आवाज अचानक बंद झाला तसे सगळेच आपापल्या जागेवर तसेच थांबले. तोवर एका मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ती विव्हळतच बोलू लागली,
" बाबा, कूट हायीस गा. म्या हीत हाय. मला हीतन न्हे की गा..... बाबा. "
ती रडत होती
आजोबांनी आपल्या मुलीचा आवाज ओळखला, त्यांच्या डोळ्यात पाणिच आले. पण काही न बोलता ते आवाजाच्या दिशेने पुढे निघाले. आता आवाज खुप जवळून येत होता. " ए बाबा, आलास व्हय गा."
एवढ बोलून ती गप्प झाली. पुन्हा वातावरण शांत झाल. ती त्यांच्या जवळच कुठतरी होती. सगळे मशालीच्या पिवळ्या तांबुस प्रकाशात ती कुठे दिसते का ते पाहू लागले... इतक्यात आजोबांची नजर समोर ऊभ्या असलेल्या जांभळीच्या झाडावर गेली आणी त्यांच्या सर्वांगावर काटा आला. आजोबांना दरदरून घाम फुटलेला, त्यांची नजर एका ठिकानी स्थिरावलेली..  सर्वाची नजर त्या झाडाकडे गेली. गर्द काटेरी झुडपात ते जांभळीचे झाड. झाडाच्या एका फांदीवर बसली होती..  एकसारख पायांना झोके देत ती एका हाताने झाडाच्या फांदीला नख्यांनी हळुवारपने ओरबडत होती... विस्कटलेल्या केसांनी चेहरा पुर्ण झाकला होता. ती आपल्याच तंद्रीत खाली मान घालून एकसारखी डुलत होती. तीच्या आवाजातील घर घर अगदी स्पष्ट ऐकु येत होती..
धडधडत्या काळजान आजोबा तीच्याकड पहात म्हणाले...
"पोरी खाली उतर आमी तुला न्ह्याला आलोय." आजोबांच शब्द ऐकताच ती एकदम शांत झाली. पाय हालवणे बंद करून काही क्षण तशीच बसली. फक्त झाडावर नखांच ओरखडे सुरु होते. संथपने... सगळे तीच्या दिशेने चालू लागले तशी ती जोराने किंचाळली.
"ए थांो तीतच."
अचानक तीचा आवाज घोगरा झाला. सगळे थबकले. तीने झाडावरून उडी मारली आणि झुडपात तशीच उभी राहीली. पुन्हा तीच्या आवाजातील घरघर्र वाढू लागली,
"आल्या मार्गी परत जा न्हायतर यकाला बी जीत्ता न्हाय सोडणार."
एक सहा , सात वर्षाची मुलगी हिंस्त्र घोग-या आवाजात बोलत होती. सगळे थक्क झाले. थोड धाडस करून आजोबा पुढ गेले, मशालीचा प्रकाश पाडून पाहील आणि काळीजात चर्रर्रर कण झाल , आपली मुलगी समोरच्या झुडपात अवघ्या पंधरा , वीस फुट अंतरावर उभी होती. काटेरी झुडपामुळे अंगावर काही जखमा झालेल्या, अंगातला फ्रॉक थोडा फाटला होता, लाल रक्ताळलेल्या डोळ्यांनी ती पहात होती. काय कराव कोणालाच सुचत नव्हत. आजोबा पुढ जाणार इतक्यात ती दात ओठ खात रागात बोलु लागली..
" ए..... तु हीला न्ह्यायला आलास, माझ्या तोंडातला घास काढून न्हेनार व्हय र.. इsssह इsssह इssssह" 
एवढ बोलुन तीन बोंब ठोकली..  जांभळीच झाड दोन्ही हातानी गदा गदा हालवू लागली.. सर्वाची भितीन गाळण उडाली, पाय जमिनीत रुतल्यासारखा जो तो समोरच ते भिषण दृष्य पहात होता ... जोरात ओरडत एक हात तोंडावर बडवत होती तर दुस-या हाताने गदागदा झाड हालवत होती... सहा सात वर्षाची मुलगी एक दोन फुटांचा घेर असलेल झाड एका हातान हावलत होती आणी हेलकाव घेणार ते ते झाड पाहुन सगळ्यांची बोबडीच वळली. समोरच भीषण दृष्य पाहून सगळेच थरारले... गर्भगळीत होऊन फक्त एकमेकाकडे पहात होते... आजोबांनी आपल्या हातातला कोयता कंबरेला आडकवला आणी सगळ्यांना आपल्या मागे येण्यास खुणावल, आजोबा तीच्या जवळ पोहोचले झाडाला गच्च पकडलेला तीचा दंड पकडला तशी ती थांबली. ओरडण किंचाळण साार काही शांत झाल...  तीचा दंड पकडुन तीला त्या झुडपातुन बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले, तस तीन झटकन आपली मान वळवली आणी रक्ताळलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहील...
केसांनी झाकलेल्या जखमी चेह-यावरून रक्त येत होत...  स्वता:च मरण स्वता: पहाव तसे सर्व थरारले. तीने जोराचा हिसडा मारून हात झटकला आणि जमीनीवर बसुन झाडाखालच्या एका दगडावर आपल डोक आपटू लागली. सर्वच घाबरले, आजोबा सगळ्यांकडे पाहून म्हणाले
" समद्यांनी हत्यार कंबरला लावा, यका हातात पलीता (मशाल) धरा. समद्यांनी जोर लावून हीला ह्यातन भाइर वडायची आण झटक्यात माग परतायच."
सगळे तयार झाले. ती अजुनही त्या दगडावर डोक तसच आपटत होती. जखमी होऊन डोक्यातून रक्त वाहत होत. आजोबांनी मन घट्ट केल. हळुच तीच्या मागे आले, तीचा हात पकडला तशी तीन आपली मान गर्रकन वळवली आणि हसु लागली, पेटत्या मशालीच्या लाल तांबड्या प्रकाशात तीचा चेहरा अधिकच भिषण वाटत होता. कपाळावरील जखमेतून येणार रक्त तीच्या पुर्ण चेह-यावर पसरलेल.  तीच भयान हास्य काळजाचा थरकाप उडवत होत. आजोबांनी जोरात तीला बाहेर ओढायला सुरवात केली तसे सोबतच्या लोकांनीही तीला खेचायला ताकत लावली... तशी ती जोराने किंचाळली,
" तुमच मराण तुमास्नी हीथ घीऊन आलय..." डोळे विस्फारून सर्वांकडे पाहु लागली जशी ती एका एकाला कच्चा खाऊन टाकेल... झटकन तीन मागे एका हातान ते झाड पकडल आणि या सर्वाना आत खेचू लागली तसे ते सर्वजन तीच्याकडे ओढले जाऊ लागले, एक लहान मुलगी पंधरा ते सोळा पुरूषांना भारी पडत होती. पण हे सर्व पिशाच्य करत होत.  आजोबांनी अंगातली सारी शक्ती एकवटली. तीच्या रक्ताळलेल्या डोळ्यात डोळे घातले
आणी ओरडले..
" ए सैताना, काय वाटल तुला. तु माज्या पोरीच लचक तोडून खायाला म्या पैदा केलय व्हय तीला, हे चामुन्डा देवी धाव ग....धाव." 
आजोबांच्या आवाजान सार गगन भेदल, तोंडावर बांधलेला फेटा काढुन तीच्या चेह-यावर टाकला आणी झटकन तीचा दंड पकडला.. एखादी शक्ति अंगात संचारावी तसा सगळ्यांनी जोर लावला आणि एका झटक्यात तीला बाहेर खेचल.ती किंचाळू लागली, हात झटकून पळायचा प्रयत्न करत होती. पण आता ते शक्य नव्हत.. सर्व गावच्या दिशेने धावत सुटले आणी मागे पडत चाललेल्या ' भुताच्या जाळीतुन ' गगनभेदी किंकाळ्यांनी सार जंगल हादरून जाऊ लागल... सर्वांचच काळीज भितीन धडधडत होत... पन आता गावचा रस्ता दिसु लागलेला... आजोबा सर्वांना म्हणाले..
" कुणीबी माग बगु नका...कोंबड आरवायला थोडाच यळ -हायलाय, हीतन भाइर पडा लवकर"
हातातील मशाली धरून गावाच्या दिशेन निघाले. त्या रात्रि पहाटे सर्व परतले ते गावच्या हद्दीत आले आणि कोंबडे आरवले....
     सगळे जन तसेच धावत देवळात पोहोचले, गुरव अजुन देवी समोर बसुन मंत्र पुटपुटत होते... आजोबानी आपल्या मुलीला देवी समोर ठेवली तसे सर्वानीच देवीपुढ लोटांगन घातल... तीच ओरडण, किंचाळण सार काही थांबलेल..
गुरव शांत पने म्हणाले...
" तुझी मुलगी गावात आलीच नव्हती.. तीला त्या पिशाच्च्याने जंगलातूनच आपल्या सोबत नेल होत..."
आजोबांनी आपल्या मुलीच्या तोंडाभोवती गुंडाळलेला तो फेटा काढला.. ती डोळे बंद करून पडली होती, शांत. स्थीर... सकाळी तीला जाग आली... पन जे घडल त्यापैकी तीला काहाच आठवत नव्हत... सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला...
... अशा त-हेने एका भीषण युद्धाचा अंत झाला....
समाप्त..
story by sanjay kamble 
      तुम्हला ही स्टोरी कशी वाटली ते आम्हला कॉमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा